Tuesday, May 11, 2021

कोरोणाचे संकट

#कोरोणा चे #संकट आले आहे.
हे अगदी खर आहे. त्याच्यासाठी कोण कारणीभूत आहे.यावर आपणच थोड  #चिंतन करायला हवे. करोणाला हरवायचं असेल तर ,ज्या #गोष्टी आपल्या #हातात आहेत,त्या आपण प्राधान्याने केल्याच पाहिजेत वेळोवेळी सरकारकडून येणाऱ्या सूचनांचा #अंमल आपण केला पाहिजे. यासाठी सॅनिटायझरचा #वापर , तोंडाला #मास्क , #सुरक्षित अंतर या साध्या- साध्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. संपूर्ण राहिला थोडाफार का होईना आपण करोणापासुन बचाव करू शकतो. माणसानं निसर्गावर अतिक्रमण करून झाडांची #कत्तल करून,प्राण्यांची #हत्या , प्रदुषण अशा मार्गाने निसर्गावर अतिक्रमण केले आहे.याचेच तर हे दुष्परिणाम नसतील ना? यावर आपण थोडस चिंतन करून, भविष्यात असे प्रश्न निर्माण होऊ नयेत.म्हणून #निसर्गचक्र अबाधित ठेवले पाहिजे.या वादळात आपण सुदैवाने वाचलोच तर, या कोरोणापासून धडा घेऊन, प्रत्येक पावसाळ्यात किमान प्रत्येकाने #एक तरी #झाड लावले पाहिजे आणि ते जगवले पाहिजे असे वाटते.......✍️





कोरोणाचे संकट

कोरोणाचे #संकट आले आहे,
हे अगदी खरं आहे.
म्हणून का ते असे ,
कायमचे #थांबणार आहे.


यावर आपण एकच #उपाय,
सर्वमिळून करणार आहे.
आहे तिथेच, आहे तसे,
#सुरक्षित अंतरावर ,
#काळजी घेत राहणार आहे.


आहो काळजी नुसती करुन,
काळजी करण्यात काय अर्थ आहे?
सरकार सांगले तसे,काळजी घेऊन,
हा #प्रश्न नक्कीच थोडाफार सुटणार आहे.


यासाठी एवढचं आपण करुया,
आपण आपल्या घरातचं राहूया.
सारख्या ,सारख्या त्याच बातम्या पाहून,
प्यानिक होण्यापेक्षा,
आपण-आपल्या माणसांना,
#आधार देत राहूया !


#जग सार या खायित लोटल आहे,
हे अगदी खरं आहे.
मिळालेल्या एकांतात ,
#चिंतन थोड करूया.


कोरोणाला कोण आहे कारणीभूत ?
याच्यावर थोडा विचार करुया.
#भविष्यात येणार नाही #संकट,
असे उपाय आपण शोधूया.


#नशीबाने जगलोच आहेआपण,
तर एक काम करूया.
या पावसाळ्यात,एक तरी #झाड🌲
मनापासून ,जगवूया
#निसर्ग वाचवूया !🍂


- धनाजी माने...✍️
🍀 ९४०३९६३९३४

2 comments:

Unknown said...

सर कविता खूपच छान आहे दररोज आपण काही ना काही कविता लिहीत असता व लोकांचे प्रबोधन करण्यासाठी आपण आपल्या खूप छान प्रयत्न करत आहात त्याचे खरोखरच कौतुक वाटते असेच काम करत राहा

JAYHO-DHANANJAYA said...

🙏 धन्यवाद !
आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन आपल्या प्रतिक्रिया दिल्यात.
याच प्रेरणा ,लिहण्याचे आणि व्यक्त होण्याचे बळ देतात.
Tho a lot !

भैरवनाथ यात्रा अंकोली ता.मोहोळ जि.सोलापूर

भैरवनाथाच्या नावानं चांगभल....... #मोहोळ तालुक्यातील मौजे #अंकोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी शुक्रवार ...