Wednesday, May 12, 2021

महाराष्ट्र दिन

 











२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती.
प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट 

स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला.  पोलिसी ताकद वापरून मोर्चा उधळून लावण्यासाठी पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले............✍️


◾१ 'मे ' महाराष्ट्र दिन◾


मराठी माणूस  पेटून उठला
जेव्हा महाराष्ट्रात मुंबई नाही .
त्याचा हा हक्काचा अधिकार
तेव्हा आयोगाने नाकारला.

छप्पन साली,नोव्हेंबरचा
एकवीसावा दिवस उगवला.
मुंबईचा तो फ्लोराफाऊंटन,
हुतात्म्यांच्या रक्ताने लालेलाल झाला.
महाराष्ट्राच्या निर्मितीचा ,
तोच पाया ठरला.

एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानाने
मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला.
मोडून काढण्या मोर्चा सारा,
पोलीसांचा लाटीचार्ज झाला.
तरीही मोर्चेकरी लढवय्या,
तसूभरही मागे नाही हटला.

गोळीबाराचा शासनाचा आदेश झाला.
एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानाने,
इतिहास असा रचला.
तेव्हा एक, मे,साठला मुंबईसह,
महाराष्ट्र निर्माण झाला.

गुरव, पुजारी ,पाटील.....
खवळे,सय्यद कासम
पटेल,लोहार ,राठोड,बिनुगडे
चौगुले, शिंदेमोरे.....
साळवे ,सावंत ,साळुंखे
असे सारे लढवय्ये,
महाराष्ट्राच्या निर्मितीला कामी आले.

त्यांचे थोडे स्मरण करुया.
जे एकसे सहा ,अमर हुतात्मे झाले.

 - धनाजी माने


dhanajimane123@gmail.com

No comments:

🇮🇳 सीमेवरील सैनिकांसाठी कोरेगावच्या विद्यार्थ्यांनी बांधला प्रेमाचा धागा...

🇮🇳 सीमेवरील सैनिकांसाठी कोरेगावच्या विद्यार्थ्यांनी बांधला    प्रेमाचा धागा..... .🇮🇳 ======================================= देशाच्या सी...