📌 करुणाने सर्व जगभर हाहाकार माजवलाय. जानेवारी २०२० पासून तर त्याने सर्व भारतात हाहाकार माजवला.हे वादळ शहरांपासून ,गावागावात , पोहचले. आणि अनेकांची प्राणज्योत मालवली. २०२० पेक्षा त्याने २०२१ च्या दुसऱ्या लाटेत रौद्र रूप घेतले. त्याचं प्रत्यंतर अत्यंत विदारक असं होतं. गेल्यावर्षी आपलीच माणसे आपल्यातून आपल्या डोळ्यासमोर कायमची आपल्याला सोडून गेली.यावर्षी दुसऱ्या लाटेत तर हजाराचा आकडा लाखोंच्या घरात गेला. दररोज ३ लाखाच्या वरती रुग्णांची संख्या भारतभर वाढू लागली. हजारोच्या संख्येने लोकांचे प्राण गेले लोकांना ऑक्सिजन कमी पडू लागला. आणि ऑक्सिजनविना अनेकांचे प्राण निघून गेले. ऑक्सिजन अनेक ठिकाणावरून आयात करावा लागला.काही ठिकाणी हॉस्पिटलला आगी लागल्या.ऑक्सिजनची गळती झाली.याच्यामध्ये अनेकांनी प्राण गमावले. माणूस माणसापासून दूर जाऊ लागला.अंतिमक्षणीही , आपल्या गेलेल्या घरच्याच माणसांना साधा स्पर्शही करताआला नाही.स्पर्श राहिला शेवटचं दर्शन ही घेता आलं नाही.याचा कळस म्हणून की काय माणसाच्या रक्षेला सुद्धा २५ पेक्षा जादा लोकांना हात लावता आला नाही. इतकं विदारक चित्र या करोनाने सर्वत्र केलं.आणि माणसांने या करोणाच्या पुढे हतबल होऊन हात टेकले.शेवटी त्याला हाक दिली की .....हे करोणा बस झाले.आता नको पुरे झाले. कायमचा निघून जा. आम्हाला पूर्वीसारखं जगू दे ! 🙏
ही माणसाची हतबलता या कवितेतून व्यक्त केली आहे..........✍️
👹करोणा....करुणा कर आता.😥
पहिली ,दुसरी आणि आता
तिसरीही तुझी लाट येणार,
या तुझ्या लाटांनी हैराण झालोय आम्ही.
बस कर , आता पुरे झाले....
सोन्यासारखी लाखो माणसं आमची,
आमच्यातून घेऊन गेलासं.
अश्रूंचे बांध आमचे आजून ,
तसेच ओले असताना.
भुक तुझी वाढतेच आहे.
सोबत तू आजही घेऊन जातो आहेस.
या तुझ्या वादळात ,
कुणाचे आई- बाप , मुलगा - मुलगी,
मामा- मामी ,काका- मावशी........ अशा

No comments:
Post a Comment