◾'शब्दअंतर्यामी '-अनुत्तरित...धनाजी माने..✍️◾
📌 प्रकाशन सोहळ्याप्रसंगी - ज्येष्ठ साहित्यिक दि.बा. पाटील ,कार्यकारी संपादक ॲड. बी एस .पाटील,इस्लामपूरच्या माजी नगराध्यक्षा प्राध्यापिका सौ.अरुणादेवी पाटील,शिवाजी विद्यापीठाचे व्यवस्थापन समितीचे सदस्य ॲड.धैर्यशील पाटील,प्रा.डाॅ .दीपक स्वामी, आदी मान्यवर उपस्थित होते .
◾"नवोदित साहित्यिकांनी शाश्वत साहित्याची निर्मिती करावी हे साहित्य निरंतर राहील.असे मत ज्येष्ठ साहित्यिक दि.बा. पाटील यांनी व्यक्त केले.
ते वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटी इस्लामपूर येथे वाळवा शिक्षण व साहित्य प्रकाशन संस्थेच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी , स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी समयी, केलेल्या शब्द अंतर्यामी विशेषांकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी इस्लामपूरच्या माजी नगराध्यक्षा प्राध्यापिका सौ.अरुणादेवी पाटील अध्यक्षस्थानी होत्या.
सौ.पाटील म्हणाल्या 'नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ निर्माण करून देण्याची काम संस्थेने केले आहे.'
यावेळी कार्यकारी संपादक ॲड. बी एस .पाटील म्हणाले ' साहित्यक्षेत्रात विद्यार्थी व शिक्षक यांनी लिहिते झाले पाहीजे अशा साहित्यातून दर्जेदार साहित्याची निर्मिती होऊन ती वाचकाच्या मनावर ठसा उमटवेल.'
यावेळी शिवाजी विद्यापीठाचे व्यवस्थापन समितीचे सदस्य ॲड.धैर्यशील पाटील म्हणाले ' साहित्य निर्मितीसाठी केलेल्या व्यासपीठाच्या माध्यमातून नवोदित लेखक विचारवंत, यांचे साहित्य प्रकाशित करून समाजाला दिशा देण्याचे काम करावे.'
तर प्रा.डाॅ .दीपक स्वामी म्हणाले ' शब्दअंतर्यामी च्या माध्यमातून शब्द प्रतिबिंब करण्याचे काम केले आहे.'शब्दअंतर्यामी' मधील धनाजी माने यांच्या 'अनुत्तरीत 'ने वास्तव उभे केले.त्यांनी आपल्या साहित्यामध्ये अशीच दर्जेदार लेखनाने भर घालत राहावे.'
यावेळी माजी मुख्याध्यापक कुमार निकम, सत्वशील पाटील प्राचार्य अंकुश बेलवडकर, प्राचार्य राम शिंदे, अरुण गायकवाड, कोमल श्रीखंडे, धनाजी माने आदी मान्यवर उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक विजय शिंदे यांनी केले सूत्रसंचालन मुख्याध्यापिका ईरफाना संदे यांनी केले. आभार दिलीप क्षीरसागर यांनी मांनले.
- धनाजी माने......✍️

1 comment:
खुपच छान सर. शब्द अंतर्यामी प्रकाशन सोहळ्याप्रसंगी माने सर तुमच्यामुळे मला ही उपस्थित राहता आले ,त्याबद्दल तुमचे आभार. अनुत्तरीत ही तुमची कथा खरच खूपच मनाला भावणारी असून वास्तव जीवनाचे दर्शन देणारी आहे. अशीच तुमची साहित्य क्षेत्रातील लेखणी प्रकाशित होत राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Post a Comment