▪️ आर्यन खान की आज की रात भी जेल में ही गुजरेगी। दरअसल शाम 5.30 बजे तक रिलीज #ऑर्डर की कॉपी जेल नहीं पहुंची। ऐसे में कल सुबह 11 बजे के बाद ही आर्यन की रिहाई संभव है।
▪️ #मन्नत के बाहर फॅन्स ने किया आर्यन का स्वागत
क्रूज ड्रग्स केस में 28 दिन जेल में बिताने के बाद आर्यन खान को अब घर के दर्शन हुए हैं। वहीं शाहरुख के फॅन्स मन्नत के बाहर वेलकम बैक का बैनर लेकर खड़े हैं। इससे पहले भी फॅन्स ने लगातार शाहरुख के सपोर्ट में अपनी आवाज बुलंद की थी।
▪️#आर्यन तुरुंगातून बाहेर आल्यानंतर #शाहरुख खानची मुलगी आणि आर्यनची बहीण सुहाना खान न्यूयॉर्कमध्ये सेलिब्रेशन करत आहे. सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे....वगैरे- वगैरे
या आणि अशाच अनेक #आर्यन खान याच्याशी संबंधित बातम्या प्रसार माध्यमातून आणि विविध दैनिकातून आणि #टिव्ही #चैनल वरून एक महिना होत आला या बातम्यांचा भडिमार सतत सुरू होता आणि आहे.
आर्यन खान हेच काही सर्वस्व आहे अशा पद्धतीने मीडियामध्ये या बातम्या सतत झळकत होत्या.
मुंबईतील #कोर्डेलिया या अलिशान क्रुझवर एका शनिवारची रात्र पार्टीने रंगली होती. या पार्टीदरम्यान, एनसीबीने छापा टाकला आणि पार्टीचं ड्रग कनेक्शन समोर आलं. अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याचाही सहभाग असल्याचे दिसताच त्याला अटक झाली. #एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यन खानला अटक केली होती.सध्या तो जामिनावर विविध अटींच्या अधिन राहून मोकळा आहे.
हे प्रकरण कोर्टात असून आर्यन खान या प्रकरणात दोषी आढळणार की नाही हे आता येणाऱ्या काळातच समजणार आहे.
मात्र या प्रकरणाने त्याच्या बातम्यांचे पेव फुटले.......याच्या अटकेशिवाय आणि सुटकेशिवाय जनतेसमोर समस्याच नाहीत.
अरे बाबांनो #महाराष्ट्राचे आणि #देशाचे अनेक प्रश्न आहेत.
सर्वसामान्यांच्या जगण्यामरण्याचे,जिव्हाळ्याचे #प्रश्न आहेत,कोरोनाने कुटूंबच्या - कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत त्यांचे अनेक प्रश्न आहेत. अनेक व्यापाऱ्यांनी आपले हात टेकलेत ,हतबल झालेत त्यांचेही अनेक प्रश्न आहेत.एस.टी कामगार गाडीलाच फास लावून घेतायतं त्यांचे अनेक प्रश्न आहेत ,त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत,शेतकरी ,खाजगी कर्मचारी, पेन्शन धारक, #पेन्शन बंद झालेले कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे,लघुउद्योजक,कारागीर ,विद्यार्थी ,#शाळा ,शिक्षक,#शिक्षण ,#रस्ते, भौतिक सुविधा अशा एक ना अनेक ,अनेकांच्या अनेक समस्या आहेत.
यावर कुठे आवाज नाही , या वरती कुठेही चर्चा होताना दिसत नाही.
ऊस उत्पादक #शेतकरी ,#FRP, अनेक ठेवीदारांच्या पतसंस्था, बँका यामधून ठेवींची लागलेली वाट,#बेरोजगार तरुणांची बेरोजगारी, वाढणारी #गुन्हेगारी ,शेतकऱ्यांच्या मालकीचे साखर कारखाने कुणी,कसे घशात घातले ❓
असे एक ना अनेक प्रश्न सभोवताली घोंगावताना दिसत आहेत , यावर मात्र समाजातून आणि समाज माध्यमातून या काळात ब्र निघत नव्हते ,नाही ,उठ - सूट एकच #आर्यन खान........
शेतकऱ्यांचे तर पिढ्यानपिढ्या झाले तरी अनेक प्रश्न अनुत्तरीतच आहेत , त्याचे कंबरडे मोडून गेले आहे.ऐन दिवाळीच्या सनात , अनेकांच्या घरी शिमगा सुरु आहे.अनेक शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेली पिके होऊन गेलेल्या #अतिवृष्टीने मातीमोल झाली. काहींच्या शेतातील मातीही जागेवर राहिली नाही , ती ही वाहून गेली .#पेरणी करायला मातीच उरली नाही.
त्याच सगळं आभाळचं फाटलयं ,ठिगळं लावायचं कुठं❓अशी त्याची दयनीय अवस्था याच कुणालाच देण - घेण उरलचं नाही. जो - तो आपल्या पुरत पाहतोयं आणि नको त्यालाच जास्त महत्त्व देतोयं.
एकूणच आर्यन खानच्या अटकेला आणि सुटकेला किती महत्त्व द्यायचं ❓याचं काय मोलच राहिले नाही. गेल्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये कोणतेही चैनल घेतलं आणि कोणताही #पेपर उघडला तर आर्यन खान याचीच बातमी समोर दिसत होती. आर्यन खानच सर्वांच्या ,सर्व प्रसारमाध्यमांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनला होता की काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत होता.
#चंदेरी दुनियेतील अनेक #कलाकार आणि त्यांचे कुटुंबीय आजवर वेगवेळ्या प्रकरणांमध्ये विशेषत: #अमली पदार्थ सेवन व सोबत बाळगने या संबंधाने येणारे संबंध अशा प्रकरणात आढळून आले आहेत असे बातम्यातून तर पुढे येते , येत होते.अभिनेता #शाहरूखखान चा मुलगा आर्यन खानचे सुद्धा एनसीबीने टाकलेल्या छाप्यामद्धे अशाच पार्टीचं ड्रग कनेक्शन समोर आलं अस प्रसिद्ध माध्यमातून चित्र पुढे आले.
बॉलिवूडचा #बादशाह असलेल्या शाहरुख खानचा मुलगा ड्रग्ज प्रकरणात सापडल्याने चाहत्यांमध्ये नाराजी आहे. तर अनेकजण शाहरुख आणि त्याच्या मुलावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. मात्र अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आर्यन खानची प्रसिद्धि वाढत असल्याचे दिसते आहे. १.४ दशलक्ष पर्यंत असलेल्या आर्यन खानच्या #Instagram फॉलोअर्सची संख्या १.५ दशलक्ष एवढी झाली. त्यामुळे एकीकडे टीकेचा धनी ठरत असलेल्या आर्यन खानला दुसरीकडे मीडियावर खूपच प्रसिद्धि मिळतेय.
एकूणच, शेवटी म्हणावेसे वाटते की.......
चारोळी.....
प्रश्न आहेत भरपूर, शेतकऱ्यांचे, समाजाचे
आणि अशाच साऱ्या घटकांचे
आर्यनखान पेक्षाही, जिव्हाळ्याचे.......
- धनाजी माने.......✍️
No comments:
Post a Comment