Monday, May 24, 2021

सुखही येईल ...आशा घेऊन जगतो आहे.

 सन २०२० /२१ मद्धे करोणामुळे झालेले #लाॅकडाऊन......

 या काळात आपण खेडेगावापासून मोठ- मोठ्या शहरांमध्ये  पाहिले, तर अनेकांचे येणे #बंद झाले होते.  हातावर #पोट असलेल्यांचे होणारे हाल पाहून #मन व्यथित झाले.

बसस्टँडवर विविध वस्तू विकणारे, #फुलवाले, #हमाल,#नाभिक, #प्लंबर, #धोबी, #भेळ-समोसा-वडा वगैरे रस्त्यावर, #रेल्वे स्टेशन,  #मॉल, #सिनेमा याठिकाणचे #विक्रते, दुकानातील, खासगी कार्यालयातील कंत्राटी कामगार असे अनेक #स्वयंरोजगार करणारे व #मजुरी करणारे कामगार अडचणीत आले होते.
कमी #जमीन असलेले बहुसंख्य #शेतकरी
, #कोरडवाहू #शेती करणारे, हंगामी #स्थलांतर करून मजुरीवर #आयुष्य जगणारे. त्यांनाही हाताला काम नव्हते, म्हणजे #कमाई  बंद होती .  या अशा #संघर्षमय काळात 
निर्माण झालेली #व्यथा या कवितेत मांडली आहे......



सुखही येईल ...आशा घेऊन #जगतो आहे.

कुठ-कुठ  #ठिगळं लावणार,
सार आभाळच फाटलयं.
#वर्षा  मागून वर्ष सरले
दुसरेही आता #अर्ध्यावर आले

तरीही आजून #कोंडून घेतलयं
होत ,नव्हत तेवढ ...
आता सार....
संपत आलयं.

ठेवणीत ठेवलेलं नानं आणि
राशितील दाणंही  संपत आलेत.
वातीत घालावे  एवढ्याच 
तेलात,
फोडणी देऊन ,काटकसरीन #जगाव लागतयं.

हातावरचे पोट असुनही,
हाथ आता बंद आहेतं.
#LOCKDOWN चे #बंध मात्र,
आजूनही #घट्ट
आहेत.

गेलेल्या जीवाभावाच्या माणसांच,
#दुःख पचवत ,#मन सारं हारलयं.
जगण्याच्या लढाईत.......
शरीरही #सार थकलयं.

तरीही मी लढणार आहे.
जगण्याची #लढाई #जिंकणार आहे.
#रात्री नंतर दिवस येतोच ना !
हे मला माहीत आहे.

म्हणूनच मी ही लढाई ...
लढतो आहे.
दुःखा नंतर सुखही येईल ...
आशा घेऊन जगतो आहे.

- धनाजी माने....✍️




4 comments:

Unknown said...

अप्रतिम कविता खूपच छान

JAYHO-DHANANJAYA said...

Thanks 🙏

Janhavi mane said...

👌👌

Unknown said...

खूप छान सर👌👍🌹

भैरवनाथ यात्रा अंकोली ता.मोहोळ जि.सोलापूर

भैरवनाथाच्या नावानं चांगभल....... #मोहोळ तालुक्यातील मौजे #अंकोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी शुक्रवार ...