सन २०२० /२१ मद्धे करोणामुळे झालेले #लाॅकडाऊन......
या काळात आपण खेडेगावापासून मोठ- मोठ्या शहरांमध्ये पाहिले, तर अनेकांचे येणे #बंद झाले होते. हातावर #पोट असलेल्यांचे होणारे हाल पाहून #मन व्यथित झाले.
बसस्टँडवर विविध वस्तू विकणारे, #फुलवाले, #हमाल,#नाभिक, #प्लंबर, #धोबी, #भेळ-समोसा-वडा वगैरे रस्त्यावर, #रेल्वे स्टेशन, #मॉल, #सिनेमा याठिकाणचे #विक्रते, दुकानातील, खासगी कार्यालयातील कंत्राटी कामगार असे अनेक #स्वयंरोजगार करणारे व #मजुरी करणारे कामगार अडचणीत आले होते.
कमी #जमीन असलेले बहुसंख्य #शेतकरी
, #कोरडवाहू #शेती करणारे, हंगामी #स्थलांतर करून मजुरीवर #आयुष्य जगणारे. त्यांनाही हाताला काम नव्हते, म्हणजे #कमाई बंद होती . या अशा #संघर्षमय काळात निर्माण झालेली #व्यथा या कवितेत मांडली आहे......
सुखही येईल ...आशा घेऊन #जगतो आहे.
कुठ-कुठ #ठिगळं लावणार,
सार आभाळच फाटलयं.
#वर्षा मागून वर्ष सरले
दुसरेही आता #अर्ध्यावर आले
तरीही आजून #कोंडून घेतलयं
होत ,नव्हत तेवढ ...
आता सार....
संपत आलयं.
ठेवणीत ठेवलेलं नानं आणि
राशितील दाणंही संपत आलेत.
वातीत घालावे एवढ्याच तेलात,
फोडणी देऊन ,काटकसरीन #जगाव लागतयं.
हातावरचे पोट असुनही,
हाथ आता बंद आहेतं.
#LOCKDOWN चे #बंध मात्र,
आजूनही #घट्ट
आहेत.
गेलेल्या जीवाभावाच्या माणसांच,
#दुःख पचवत ,#मन सारं हारलयं.
जगण्याच्या लढाईत.......
शरीरही #सार थकलयं.
तरीही मी लढणार आहे.
जगण्याची #लढाई #जिंकणार आहे.
#रात्री नंतर दिवस येतोच ना !
हे मला माहीत आहे.
म्हणूनच मी ही लढाई ...
लढतो आहे.
दुःखा नंतर सुखही येईल ...
आशा घेऊन जगतो आहे.
- धनाजी माने....✍️

4 comments:
अप्रतिम कविता खूपच छान
Thanks 🙏
👌👌
खूप छान सर👌👍🌹
Post a Comment