Monday, May 17, 2021

अरे ! आपण समजत होतो , तेवढे हे भीतीदायक नव्हतेे!


 आपल्या आयुष्यातमद्धे , आपल्या मनात
विविध गोष्टींमुळे एक भीतीचा पगडा निर्माण होतो.याची अनेक कारण असतात.आपल्या आयुष्यात ते आपण वेळोवेळी अनुभवत असतो.आणि ती गोष्ट घडून गेल्यानंतर आपल्या अस लक्षात येत की ,

' अरे ! आपण समजत होतो , तेवढे हे भीतीदायक नव्हते, आपण उगीचच मनावर एवढा मोठा दबाव आनला होता. '
करोणामुळे अनेकांच्या मनात अशाच काहीशा भीतीदायक भावना सतत तयार होत आहेत.ज्या प्रसंगामद्धे व्यक्तीला अत्यल्प धोका असताना किंवा अजिबात धोका नसताना त्या गोष्टी बद्दल, प्रसंगा बद्दल सातत्याने व प्रमाणा बाहेर वाटणारी अनामिक भीती मनात तयार आपणच तयार करुन घेतो यालाच भीती म्हणायचे.
मग ती भिती कोणत्याही प्रसंगात तयार होवो.किंवा आज सर्वत्र कोरोणाचे वातावरण असल्याने त्याबाबत तयार झालेली भीती असेल.
याचा अर्थ असा नव्हे की , कोराना गंभीर नाही.
पण ...आपण योग्य खबरदारी घेतली, योग्य ती काळजी घेतली तर भिण्याचे काहीच कारण नाही.
जे योग्य ते काळजी घेत नाहीत तेच कोरोणाने बाधीत होत आहेत.
बर चूक करुन पुन्हा योग्य ती काळजी घेत नाहीत.
यासाठी मनामध्ये अनाठायी भीती न बाळगता योग्य वेळी योग्य ती काळजी , योग्य मार्गदर्शन घेऊन त्यावर मात केली पाहिजे.आणि करताही येते
मनात नकारात्मक विचार न आनता सकारात्मक विचारांची पेरणी करणे हिताचे आणि फायद्याचे आहे.
योग्य ती खबरदारी , योग्य वेेळी घ्या
, आणि मग बघा तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल.

कोरोणा तुमच्याजवळ फिरकणार ही नाही.
तेव्हा मनातील एक अनामिक भिती काढून टाका.
आणि आनंदाने जगा , होईल सर्व ठीक.
All is well 👍 .
- धनाजी माने

1 comment:

B S Attar - Sadguru Shirala said...

वास्तव - सत्य - ग्रेट

भैरवनाथ यात्रा अंकोली ता.मोहोळ जि.सोलापूर

भैरवनाथाच्या नावानं चांगभल....... #मोहोळ तालुक्यातील मौजे #अंकोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी शुक्रवार ...