👹 आज करोणाच्या महामारीत अनेकजण अनेक क्षेत्रांत जमेल तशी सर्व सामान्यांची आर्थिक लुट करताना दिसत आहेत.यात वैद्यकीय क्षेत्रातील काही लोक सुद्धा सामिल आहेत.
पण याला अपवादही अनेकजण आहेत त्यातीलच , ही डॉ.जोडी. आपली सेवा प्रामाणिकपणे देत आहेत.अनेकांचा आधार ठरले आहेत...........
प्रासंगिक............✍️
✌️इस्लापुरातील जोडी नंबर वन - डॉ. प्रवीण पोरवाल व डॉ.अतुल मोरे
Salute या ' माणसातील ,देवमाणसांना ! '
आज कोरोनाचे वारे खूपच घोंगावू लागले आहे.
चालतीबोलती आपलीच माणसं आपल्यातून कायमची निघून चालली आहेत. गेली आहेत. हे गेले वर्षभर आपण अनुभवतो आहे. आणि आजही ते अनुभवत आहे.
या वाऱ्याचे वादळात रुपांतर कधी झाले समजलेच नाही. अनेकांच्या जीवनज्योती
या वादळात विझून गेल्या.
पण अशाही संकटात आधार देणारे पण भेटतात.....
या वादळात आपल्या परिने डॉ.अतुल मोरे व डॉ. प्रवीण पोरवाल या विझणाऱ्या जीवनज्योती तेवत ठेवण्यासाठी गेले वर्षभर अविरत झटत आहेत.
हे देवदूत सामान्यांचे आधार झाले आहेत.
कोरोना झाला आहे हे ऐकताच अनेकजण गलितगात्र होतात.रोगापेक्षा या रोगावरील चाचण्या व उपचारावरील खर्च कसा पेलायचा यानेच हे बाधित रुग्ण व कुटुंबातील सदस्य ढासळून जातात पण......
या जोडीने इस्लामपूरात नंबर वन काम करुन गेल्या
वर्षभरात हजारो रुग्णांवर अत्यल्प खर्चात उपचार , योग्य मार्गदर्शन व मानसिक आधार देत कोरोना रुग्ण बरे केले आहेत.ते अनेक रुग्ण यांचे ऋण व्यक्त करत आहेत.
सध्या या क्षेत्रातील काही लोक ,उपचाराच्या नावाखाली रुग्णांची लूट करत असताना.कशा- कशात पैसे खावे.समोरच्या व्यक्तीच्या दु:खाचा विचार न करता हा गोरख धंदा सर्वत्र सुरुच आहे.हे आपण उघड्या डोळ्यांनी माध्यमातून पाहतोच आहे.
पण.... या जोडीने या सर्वाला फाटा देत,
रुग्णांना योग्य वेळी आवश्यक असेल तिथेच चाचणीचा आधार घेत , रु.५०० ते १००० व
यातूनही बरे न झालेल्या रुग्णांवर अवघ्या ६ ते ७ हजार रुपयात योग्य ते उपचार दिले जातात.आणि वैशिष्ट्ये म्हणजे त्या रुग्णाला त्याच्याच परिवारात राहून योग्य खबरदारीच्या सूचना देऊन घरीच शेकडो रुग्ण बरे केले आहेत.
आणि आजही , ही सेवा ते अविरतपणे देत आहेत.
स्वाईन फ्लू असो अथवा करोना. संसर्गजन्य आजाराचे वारे घोंघावू लागले की सारेच धास्तावतात. स्वत:चे आरोग्य जपण्यासाठी धडपडत असतात.
स्वाईन फ्लूचे वारे आता कमी झाले असले तरी जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसने सर्वांपुढे नवे आव्हान उभे ठाकले आहे. याच पार्श्वभूमीवर अशा कोरोणाच्या परिस्थितीतही संसर्गबाधित व संसर्ग संशयित रुग्णांच्या सेवेत कसूर न करता, 'सेवा परमो धर्म:' या वृत्तीची जोपासना ही जोडी नंबर वन अहोरात्र करीत आहेत. Salute या माणसातील देवमाणसांना ,देवदुतांना !
हे कार्य आपल्या हातूनअसेच घडत राहो ! सामान्यांच्या कल्याणासाठी आपण शतायुषी व्हावे ही विधात्या चरणी प्रार्थना !
◾जाता- जाता - -
👌जपा यांच्यासारखा ,मानव सेवेचा फंडा |
उपचाराच्या नावाखाली , जे घालतात रुग्णांना गंडा |
- धनाजी माने......✍️
===============================
📌 कोरोणा वाढतोयं ! काळजी घेऊया !!
📌 नियम पाळुया ,सुरक्षित राहुया !!
📌 काळजी करु नका.आधार देत राहुया !!
📌हसत रहा ! होईल सर्व ठीक !
📌 खबरदारी हीच ,आपली जबाबदारी !
📌 भेटता येत नसले ,तरी आपल्या माणसांना
फोन करा ,बोला आधार द्या!
📌 त्याचीच आज नितांत गरज आहे.
📌 कोरोणाने बरेच काही शिकवले आहे.
प्रतिष्ठा,जात ,धर्म ,इगो, सारे गौण आहे.माणसाने- माणसाशी - माणसासम वागणेच सर्वश्रेष्ठ आहे.
📌 आपला दिवस आनंदात जावो !!!
- धनाजी माने......✍️
==============================

No comments:
Post a Comment