Wednesday, February 09, 2022

🛵 गाडीमुळे आली जीवनात भरभराट !🍃 -श्रद्धा

 वाहन म्हटल की  वाहतुकीसाठी किंवा प्रवासासाठी  असलेले #साधन. वाहनांचे विविध प्रकार आहेत.

#सायकल,#दुचाकी,#स्कूटर,#मोटार कार

मराठीत अनेक प्रकारे वाहनांची ओळख अहे

#वडाप  म्हटल की, दहा - वीस लोकांनी खचाखच भरलेली प्रवासी वाहतूक करणारी गाडी.#टूरटूर - ऑटो रिक्षा,$फटफट  यामध्ये #बाईक, #दुचाकी,#स्कुटी

#टमटम ,डुग /#डूगडूग ,#लाल परी ,#आराम गाडी - #लक्झरी बस ,#मुंगळा ,#छोटा  हत्ती असे अशी अनेक विविध प्रकारचे बिरुद घेऊन ही वाहन आपल्या सभोवताली इकडून -तिकडं मिरवत असतात यातून अनेक #प्रवासी #प्रवास करत असतात.........







माझा गाडी घेण्याचा प्रवास तसा #सायकल पासून झाला. आयुष्यात मी पहिल्यांदा सायकल घेतली २२ इंची हिरोची . सायकलवरून प्रवास करताना आपल्याला कधी #मोटारसायकल मिळेल का? आपल्यालाही चारचाकीमधून कुटुंबासमवेत फिरता येईल का? असे प्रश्न पडायचे. कारण घरची परिस्थिती गरिबीची, #वडिलार्जित शेती भरपूर असूनही  तीसुद्धा कोरडवाहू त्यावेळी इरिगेशन व्हायचे होते त्यामुळे शेती रामभरोशे........ आता त्याच शेतीमुळे मोठी स्पप्नेही पाहू शकतो , कारण बागायती झाली शेकडो टणाचे ऊसाचे उत्पन्न देते.
 पण....त्यावेळी दुचाकीचीही अशी स्वप्ने बघणेही तसे आवाक्याबाहेरचे होते. 
रोजच्या जगण्यासाठी संघर्ष सुरु होता आणि यासाठी तरतूद नव्हती. 
पण #प्राथमिक शिक्षक म्हणून #कोल्हापूर $जिल्हा परिषदेच्या $चंदगड तालुक्यातील $उत्साळी येथे शाळेत नोकरी लागली. आणि जीवनाला थोडी कलाटणी मिळाली ,इकडे गावातही #इरिगेशन आले कोरडवाहू शेती हळूहळू हिरवा शालू नेसू लागली .  तीन वर्षे अशीच निघून गेली कारण पगाराचा बेसिक १२०० आणि वर्षाची वेतनवाढ ३० रु. मेळ घालण्यात हा काळ निघून गेला.शेतीही चांगली पिकू लागली,भरघोस #उत्पन्न सुरु झाले .
अखेर #दुचाकी घेण्याचे पहिले स्वप्न सत्यात उतरवले.
आमच्या घराण्यात तशी ती पहिलीच गाडी. २१ व्या शतकाला नुसतीच सुरुवात झाली होती. त्या काळात #Bajaj स्कूटर,  M-80, HERO - HONDA (त्यावेळी या कंपण्या एकत्र होत्या) अशा मोटारसायकली त्या काळात लोक वापरत. मित्रांबरोबर चर्चा केली, लोकांच्या गाडीबाबतच्या प्रतिक्रिया ऐकल्या आणि  हिरो होंडा कंपनीची स्प्लेंटर गाडी घ्यायचे निश्चित झाले. 
२००१ चा मे महिना होता. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागली होती.चंदगड वरुन गावी आलो, सांगली ,कोल्हापूरची वेगवेळी शोरुम पाहिली,गाडीचे रंग पाहिले आणि काळ्या रंगाची गाडी घ्यायचे निश्चित झाले. शेवटी ' रंगावर काय असते हो , सारे काही मेळ गुणावरुनच जुळतात ना ! ' अखेर तिचे अन् माझे गुण जुळलेत व जुळले होते  हे तिने आजही दाखवून दिले आहे ! '
 १९ तारीख उजाडली माझी पहिली हिरो होंडा स्प्लेंडर गाडी दारात आली. घरात आनंदी- आनंद झाला. पूजन झाले , गाडी घरात आली .
एखाद्याच्या आपल्या आयुष्यात येण्याने आपली भरभराट होते प्रगती होते अशी श्रद्धा अनेकांच्या मनात असते. तशी ती माझ्याही मनात रुजली.आणि ती भावना तिच्याबाबत (माझ्या #Splender 5755 ) आजही माझ्या मनात असल्याने तब्बल २१ वर्षे झाली तरी आजही माझ्याकडे माझी $हिरो - होंडा  #स्प्लेंडर पूर्वीसारखीच सेवा देत आहे..
तिच्यावरून आजअखेर मी लाखो किलोमीटरचा प्रवास केला. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी तिच्यासोबत प्रवास केला; पण कधीही तिने दगा दिला नाही. मित्रासोबत, पत्नी , मुलांसोबत कोकण दर्शन ,#गणपतपुळे, नोकरीनिमित्त प्रवास केला.
कोल्हापूर ( चंदगड,#दाटे ,#आडकूर,#विंझणे,#आलबादेवी,#नेसरी, #पन्हाळा,
#जोतिबा,#नरसिंहवाडी,आळते,#हातकणंगले,#शिरोली,#घुणकी) #सोलापूर (#पंढरपूर,#बार्शी ,#अंकोली ) #औदुंबर.... अशा अनेक ठिकाणी गेल्या २१ वर्षांत लाखो किलोमीटरचा प्रवास केला; पण तिने कधीही मला धोका दिला नाही.
'सजीव माणसं #धोका देतील आणि देतात ही ,पण तिने नाही दिला ! '
 आज तिच्याच पायगुणामुळे घरात दसऱ्या दुचाकी, #चारचाकी गाड्या आहेत. पण तीच्यावरची-स्प्लेंडरवरची #श्रद्धा आजही कमी झाली नाही. तिने दिलेल्या आतापर्यंतच्या #निर्धोक सेवेमुळे ती आजही तेवढीच माझ्या मनात घर करून आहे. तिच्यावरच प्रेम थोडही कमी नाही झाले.आपण जशी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतो, तशी तिच्याही आरोग्याची काळजी मी घेतली आणि आजही  घेतो.
 वेळच्या वेळी धुणे, #सर्व्हिसिंग, जुना झालेला पार्ट वेळच्यावेळी बदलणे अशी काळजी घेतल्यामुळे आजही ती सुस्थितीत आहे. रंग थोडा फिक्का पडला आहे. तरीही इंजिन आजही चांगले आहे. कागदोपत्रीही तिचा परवानाही १५ वर्षांचा संपल्यानंतर पुन्हा पाच वर्षांचा वाढवून घेतला आहे. एकूणच वेळच्यावेळी मी तिची काळजी घेतल्याने तिनेही माझी काळजी घेतली. 
आजही पुर्वीप्रमाणे तिचे अन् माझे #गुण जुळलेलेच आहेत.दुसऱ्या नव्या दुचाकी, चारचाकी गाड्या दारात आल्या म्हणून मी तिला नाही मी विसरलो कि अंतर दिले. तिने दिलेल्या या सेवेबद्दल मी तिचा खूप-खूप आजही #ऋणी आहे.आणि असायलाच हव ना?
कारण ' माणसानं कृतज्ञ असावे  कृतघ्न असू नये ! ' हो ना ?
- धनाजी माने. .....✍️
( माझा हा लेख पुर्वप्रकाशित ...महाराष्ट्र टाईम्स )



Tuesday, November 02, 2021

नराधम आणि......आपल्या लाडक्या लेकी,बहिणी .....?

 


नराधम आणि......आपल्या लाडक्या लेकी,बहिणी .....?

१ नोव्हेंबर २१ चे दैनिक उघडले आणि या दैनिकामध्ये ' रिजन अपडेट ' मध्ये एक बातमी वाचनात आली मन सुन्न करणारी बातमी ....
आपण राहत असलेल्या #वाळवा तालुक्यालगतच्या #हातकणंगले तालुक्यातील #खोची येथील ही दुर्दैवी घटना वाचून मन सुन्न झाले .
सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण खून केल्याची घटना खोची (ता. हातकणंगले) येथे घडली. या #दुर्दैवी आणि धक्कादायक घटनेने सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे .
त्या कुटुंबातील एकुलती एक आणि लाडाची लेक अशा अवस्थेत पाहून तीच्या आईवडिलांनी अक्षरशः #आक्रोश केला होता . हृदय पिळवटून टाकणारी घटना खरंच माणुसकीला काळीमा फासणारी आहे .
ती मुलगीसर्वांना आपुलकीने बोलवणारी
बोलकी, हुशार होती. लहान मुलांसोबत ती गल्लीत हसतखेळत असायची. एकुलती एक असल्याने प्रेमळ, लाडकी होती. घटना घडली त्या दिवशी त्या ६ वर्षाच्या लेकिने सकाळी  आपल्या वडिलांना जेवणाचे ताट दिले  होते.व जेवावयास सांगितले आणि घराबाहेर गेली होती. गेली ती गेलीच...ती परत आलीच नाही. ...
म्हणून , तिचा शोध सुरू झाला आई-वडील शेजारी-पाजारी यांनी सर्वत्र तिला शोधले. अखेर गावाच्या प्रवेश द्वाराजवळ असणाऱ्या. जुन्या दफनभूमीच्या झुडपात तिचा #मृतदेह आढळून आला. तिच्या चेहऱ्यावर व पायाला जखमेचे व्रण दिसून आले होते. अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
याप्रकरणी संशयित त्या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले .त्यावेळी त्या नराधमाने  निर्लज्जपणे गुन्ह्याची कबुली दिली होती.
पोलिसांनी आपली कामगिरी कितीही चोख बजावली .याबाबतचे #कायदे कितीही कडक झाले तरीही अशा घटना समाजात घडतच आहेत .
#महिला, #मुली ,अल्पवयीन मुली यांच्यावर असे व यापेक्षाही  भयावहअत्याचार  घडण्याचे प्रमाण खरोखरच खूपच मन सुन्न करणारे आहे .
▪️१६ डिसेंबर २०१२ मध्ये दिल्लीच्या 'वसंत विहार ' भागात तरूणीवर #पाशवी #बलात्कार करून तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर अतिशय वाईट परिस्थितीत तिने #झुंज दिली व तिचा #मृत्यू झाला. दिल्लीमध्ये फिजिओथेरपीचे #शिक्षण घेत असलेल्या २३ वर्षीय निर्भयावर दोषींनी चालत्या बसमध्ये पाशवी बलात्कार करून तिला तिच्या मित्रासह मरणासन्न अवस्थेत महामार्गावर फेकून दिले होते. या प्रकरणाने पूर्ण देश हादरला होता
▪️नगर - जिल्ह्यातील #कोपर्डी (ता. #कर्जत)येथे १३जुलै २०१६ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास असाच गुन्हा घडला होता. येथील शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याच्या गुन्ह्यत सामील असणाऱ्या तीन नराधमांना  विशेष #जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची #शिक्षा ठोठावली होती.
▪️ ऑक्टोंबर २१ मधील वणी येथील अशीच घटना. वणी येथे #बसस्थानक परिसरात  एका ४० वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचाराची घटना घडली.मानवतेवर घाला घालणारी ही #गुन्हेगारी #प्रवृत्ती

समाजात सर्वत्र फोफावताना दिसत आहे.
महिला, तरुणींच्या छेडछाडीच्या घटनांत अलिकडे वाढ झाली आहे. अशा घटना आपल्या आजूबाजूला दररोज घडू लागल्या आहेत. अशा प्रवृत्तीविरोधात कारवाई करण्यासाठी आणि महिला, मुली, तरुणींच्या मदतीसाठी पोलिसांनी निर्भया पथकाची स्थापना केली आहे. 'जेथे भय तेथे निर्भया '  हे ब्रिदवाक्य घेवून स्थापन करण्यात आलेल्या या पथकांच्या कारवाईने चांगलाच दबदबा निर्माण झाला असला  आणि पोलीस आपले काम चोख बजावत असले तरी अशा घटना आपल्या आजूबाजूला घडतच आहेत.
अशा घटनांची आकडेवारी पाहिली म्हणजे खरोखरच #समाज नेमका कुठे चालला आहे? समाजातील ही नराधम प्रवृत्ती कोणत्या टोकाला जाऊन पोचलली आहे असे वाटते.

२०१९ मद्धे देशभरात २८६ महिलांची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (एनसीआरबी) ३० सप्टेंबर १९ जारी केलेल्या अहवालानुसार  २०१९ मध्ये भारतात बलात्काराच्या घटनांत मोठी वाढ झाली. ३०,६४१ केसेस बलात्काराच्या बाबतीत नोंदवण्यात आल्या, देशात दर १७ मिनिटांनी बलात्कार होत असल्याचे #NCRB अहवालातून
स्पष्ट झाले आहे.

भारतात एकूण गुन्हेगारीमध्ये बलात्कार हा गुन्हा अव्वल क्रमांकावर येतो. दरवर्षी साधारण तीस ते चाळीस #हजार बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद देशात होते. हे झाले #नोंद झालेल्या गुन्ह्यांबद्दल; पण समाजातील लोक काय म्हणतील या भीतीपोटी अनेक प्रकरणात बलात्काराची नोंददेखील केली जात नाही.अजून एक दुर्दैवी बाब म्हणजे, बलात्काऱ्यांना शिक्षा मिळण्याची आकडेवारी फारशी समाधानकारक नाही. दुर्दैवाने दिवसेंदिवस या गुन्ह्याची आकडेवारी कमी होण्याऐवजी वाढत चालली असल्याचे एनसीआरबीच्या (#राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग) अहवालातून स्पष्ट होत आहे. 

एकूणच #निर्भया प्रकरणानंतर अशा बाबतीत अनेक कडक कायदे करण्यात आले. विविध पथकांची #स्थापना करण्यात आली. विविध #हेल्पलाइन #नंबर देण्यात आले .तरीही अशा घटना समाजात घडतच आहेत. की ज्या तुम्हा आम्हाला सर्वांनाच  मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत.
आणि त्याच बरोबर अशा घडणाऱ्या घटना पाहून, ऐकून, मनात एक भीतीची #पाल चुकचुकते की आपल्याही लाडक्या लेकी,बहिणी  शिक्षणाच्या निमित्ताने ,काही कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडल्या तर ,त्या  पुन्हा घरी सुरक्षित येतील ना?

यासाठी प्रत्येक लेक सुरक्षित पाहिजे .....

- धनाजी माने ......✍️




Monday, November 01, 2021

आर्यनखान पेक्षाही, जिव्हाळ्याचे.......

 


▪️ आर्यन खान की आज की रात भी जेल में ही गुजरेगी। दरअसल शाम 5.30 बजे तक रिलीज #ऑर्डर की कॉपी जेल नहीं पहुंची। ऐसे में कल सुबह 11 बजे के बाद ही आर्यन की रिहाई संभव है।

▪️ #मन्नत के बाहर फॅन्स  ने किया आर्यन का स्वागत

क्रूज ड्रग्स केस में 28 दिन जेल में बिताने के बाद आर्यन खान को अब घर के दर्शन हुए हैं। वहीं शाहरुख के फॅन्स मन्नत के बाहर वेलकम बैक का बैनर लेकर खड़े हैं। इससे पहले भी फॅन्स ने लगातार शाहरुख के सपोर्ट में अपनी आवाज बुलंद की थी।
▪️#आर्यन तुरुंगातून बाहेर आल्यानंतर #शाहरुख खानची मुलगी आणि आर्यनची बहीण सुहाना खान न्यूयॉर्कमध्ये सेलिब्रेशन करत आहे. सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे....वगैरे- वगैरे


या आणि अशाच अनेक #आर्यन खान याच्याशी संबंधित बातम्या प्रसार माध्यमातून आणि विविध दैनिकातून आणि #टिव्ही #चैनल वरून एक महिना होत आला या बातम्यांचा भडिमार सतत सुरू होता आणि आहे.
आर्यन खान हेच काही सर्वस्व आहे अशा पद्धतीने मीडियामध्ये या बातम्या सतत झळकत होत्या.

मुंबईतील  #कोर्डेलिया या अलिशान क्रुझवर एका शनिवारची रात्र पार्टीने रंगली होती. या पार्टीदरम्यान, एनसीबीने छापा टाकला आणि पार्टीचं ड्रग कनेक्शन समोर आलं. अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान  याचाही   सहभाग असल्याचे दिसताच त्याला अटक झाली. #एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यन खानला अटक केली होती.सध्या तो जामिनावर विविध अटींच्या अधिन राहून मोकळा आहे.
हे प्रकरण कोर्टात असून  आर्यन खान या प्रकरणात दोषी आढळणार की नाही हे आता येणाऱ्या काळातच समजणार आहे.
मात्र या प्रकरणाने त्याच्या बातम्यांचे पेव फुटले.......याच्या अटकेशिवाय आणि सुटकेशिवाय जनतेसमोर समस्याच नाहीत.
अरे बाबांनो #महाराष्ट्राचे आणि #देशाचे अनेक प्रश्न आहेत. 

सर्वसामान्यांच्या जगण्यामरण्याचे,जिव्हाळ्याचे #प्रश्न आहेत,कोरोनाने कुटूंबच्या - कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत त्यांचे अनेक  प्रश्न आहेत. अनेक व्यापाऱ्यांनी आपले हात टेकलेत ,हतबल झालेत त्यांचेही अनेक प्रश्न आहेत.एस.टी कामगार  गाडीलाच फास लावून घेतायतं त्यांचे अनेक प्रश्न आहेत ,त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत,शेतकरी ,खाजगी कर्मचारी, पेन्शन धारक, #पेन्शन बंद झालेले कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे,लघुउद्योजक,कारागीर ,विद्यार्थी ,#शाळा ,शिक्षक,#शिक्षण ,#रस्ते, भौतिक सुविधा अशा एक ना अनेक  ,अनेकांच्या अनेक समस्या आहेत.
यावर कुठे आवाज नाही , या वरती कुठेही चर्चा होताना दिसत नाही.

ऊस उत्पादक #शेतकरी ,#FRP,  अनेक ठेवीदारांच्या पतसंस्था, बँका यामधून ठेवींची लागलेली वाट,#बेरोजगार तरुणांची बेरोजगारी, वाढणारी #गुन्हेगारी ,शेतकऱ्यांच्या मालकीचे साखर कारखाने कुणी,कसे घशात घातले ❓

असे एक ना अनेक प्रश्न सभोवताली घोंगावताना दिसत आहेत , यावर मात्र समाजातून आणि समाज माध्यमातून या काळात ब्र निघत नव्हते ,नाही ,उठ - सूट एकच #आर्यन खान........

शेतकऱ्यांचे तर पिढ्यानपिढ्या झाले तरी अनेक प्रश्न अनुत्तरीतच आहेत , त्याचे कंबरडे मोडून गेले आहे.ऐन दिवाळीच्या सनात , अनेकांच्या घरी शिमगा सुरु आहे.अनेक शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेली पिके होऊन गेलेल्या #अतिवृष्टीने मातीमोल झाली. काहींच्या शेतातील मातीही जागेवर राहिली नाही , ती ही  वाहून गेली .#पेरणी करायला मातीच उरली नाही.

त्याच सगळं आभाळचं फाटलयं ,ठिगळं लावायचं कुठं❓अशी त्याची दयनीय अवस्था याच कुणालाच देण - घेण उरलचं नाही. जो - तो आपल्या पुरत पाहतोयं आणि नको त्यालाच जास्त महत्त्व देतोयं.

एकूणच आर्यन खानच्या अटकेला आणि सुटकेला किती महत्त्व द्यायचं ❓याचं काय मोलच राहिले नाही. गेल्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये कोणतेही चैनल घेतलं आणि कोणताही #पेपर उघडला तर आर्यन खान याचीच बातमी समोर दिसत होती. आर्यन खानच सर्वांच्या ,सर्व प्रसारमाध्यमांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनला होता की काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत होता.

#चंदेरी दुनियेतील अनेक #कलाकार आणि त्यांचे कुटुंबीय आजवर वेगवेळ्या प्रकरणांमध्ये विशेषत: #अमली पदार्थ सेवन व सोबत बाळगने या संबंधाने येणारे संबंध अशा प्रकरणात आढळून आले आहेत असे बातम्यातून तर पुढे येते , येत होते.अभिनेता #शाहरूखखान चा मुलगा आर्यन खानचे सुद्धा  एनसीबीने  टाकलेल्या  छाप्यामद्धे अशाच पार्टीचं ड्रग कनेक्शन समोर आलं अस प्रसिद्ध माध्यमातून चित्र पुढे आले.

बॉलिवूडचा #बादशाह असलेल्या शाहरुख खानचा मुलगा ड्रग्ज प्रकरणात सापडल्याने चाहत्यांमध्ये नाराजी आहे. तर अनेकजण शाहरुख आणि त्याच्या मुलावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. मात्र अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आर्यन खानची प्रसिद्धि वाढत असल्याचे दिसते आहे. १.४ दशलक्ष पर्यंत असलेल्या आर्यन खानच्या #Instagram फॉलोअर्सची संख्या १.५ दशलक्ष एवढी झाली. त्यामुळे एकीकडे टीकेचा धनी ठरत असलेल्या आर्यन खानला दुसरीकडे  मीडियावर खूपच प्रसिद्धि मिळतेय.


एकूणच, शेवटी म्हणावेसे वाटते की.......

चारोळी.....

कशाला किती महत्त्व द्यावे ?

प्रश्न आहेत भरपूर, शेतकऱ्यांचे, समाजाचे 

आणि अशाच साऱ्या घटकांचे 

आर्यनखान पेक्षाही, जिव्हाळ्याचे.......

- धनाजी माने.......✍️











Sunday, August 15, 2021

'शब्दअंतर्यामी '-अनुत्तरित...धनाजी माने..✍️

◾'शब्दअंतर्यामी '-अनुत्तरित...धनाजी माने..✍️◾
📌 प्रकाशन सोहळ्याप्रसंगी - ज्येष्ठ साहित्यिक दि.बा. पाटील ,कार्यकारी संपादक ॲड. बी एस .पाटील,इस्लामपूरच्या माजी नगराध्यक्षा प्राध्यापिका सौ.अरुणादेवी पाटील,शिवाजी विद्यापीठाचे व्यवस्थापन समितीचे सदस्य ॲड.धैर्यशील पाटील,प्रा.डाॅ .दीपक स्वामी, आदी मान्यवर उपस्थित होते .
"नवोदित साहित्यिकांनी शाश्वत साहित्याची निर्मिती करावी हे साहित्य निरंतर राहील.असे मत ज्येष्ठ साहित्यिक दि.बा. पाटील यांनी व्यक्त केले.
 ते वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटी इस्लामपूर येथे वाळवा शिक्षण व साहित्य प्रकाशन संस्थेच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी , स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी समयी, केलेल्या शब्द अंतर्यामी विशेषांकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी इस्लामपूरच्या माजी नगराध्यक्षा प्राध्यापिका सौ.अरुणादेवी पाटील अध्यक्षस्थानी होत्या.
सौ.पाटील म्हणाल्या 'नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ निर्माण करून देण्याची काम संस्थेने केले आहे.'
यावेळी कार्यकारी संपादक ॲड. बी एस .पाटील म्हणाले ' साहित्यक्षेत्रात विद्यार्थी व शिक्षक यांनी लिहिते झाले पाहीजे अशा साहित्यातून दर्जेदार साहित्याची निर्मिती होऊन ती वाचकाच्या मनावर ठसा उमटवेल.'
यावेळी शिवाजी विद्यापीठाचे व्यवस्थापन समितीचे सदस्य  ॲड.धैर्यशील पाटील म्हणाले ' साहित्य निर्मितीसाठी केलेल्या व्यासपीठाच्या माध्यमातून नवोदित लेखक विचारवंत, यांचे साहित्य प्रकाशित करून समाजाला दिशा देण्याचे काम करावे.'

तर प्रा.डाॅ .दीपक स्वामी म्हणाले ' शब्दअंतर्यामी च्या माध्यमातून शब्द  प्रतिबिंब करण्याचे काम केले आहे.'शब्दअंतर्यामी' मधील धनाजी माने यांच्या 'अनुत्तरीत 'ने वास्तव उभे केले.त्यांनी आपल्या साहित्यामध्ये अशीच दर्जेदार लेखनाने भर घालत राहावे.'
यावेळी माजी मुख्याध्यापक कुमार निकम, सत्वशील पाटील प्राचार्य अंकुश बेलवडकर, प्राचार्य राम शिंदे, अरुण गायकवाड, कोमल श्रीखंडे, धनाजी माने आदी मान्यवर उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक विजय शिंदे यांनी केले सूत्रसंचालन मुख्याध्यापिका ईरफाना संदे यांनी केले. आभार दिलीप क्षीरसागर यांनी मांनले.
- धनाजी माने......✍️





 

Monday, August 09, 2021

वाढदिवस लेकीचा


 🎂लेकीचा #वाढदिवस अगदी साधेपणाने...! 


प्रिय जान्हवी 

२००३ साली ,आजच्याच दिवशी  तु  इवलीशी #चिमणी होऊन आमच्या घरात आलीस आणि माझे पूर्ण #आयुष्यच बदलले..!

आज त्याला १८ वर्षे पूर्ण झाली. हा- हा म्हणता वर्षामागून वर्षे  भरभर निघून गेली.

 तु मोठी होत गेलीस वयाने आणि #समजूतदार पणानेही.

तुझ्या जन्मानंतर जवळ- जवळ  ६ ते ७ महिने मी तुला हातात घेतले नाही.तुला हातात घ्यायची भीती वाटायची.  कारण , 'आपल्याला घ्यायला येईल का❓ तुझी मान तर दुखवणार नाही ना❓ अशी भिती ही तुझ्या काळजीपोटीच असायची.

लहानपणी #खेळणारी , बागडणारी तू , विविध वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन ,करारी भाषेत व्यासपीठ गाजवणारी तू.आज मात्र तू , माझी आई सारखी माया,प्रेम , आपुलकीने लळा लावतेस आणि काळजीही तशीच करतेस.

हे तुझे वय म्हणजे हे काही फार मोठे वय नाही, पण ....तु लहानपणा पासून आतापर्यंत कधीसुद्धा माझ्याजवळ -  हे पाहिजे ते पाहिजे म्हणून हट्ट केलेला मला आठवत नाही.किती समजूतदारपणा तुझ्याकडे एखाद्या परिपूर्ण व्यक्तीसारखा.proud of you !

तुझ्याच किलबिलाटाने पूर्ण घर भरून जायचे....जान्हवी... तू खेळण्यापेक्षा पुस्तकातच जास्त रमलीस.#अभ्यास , #वक्तृत्व या गोष्टींना तू प्राधान्य दिलेस.

तू तुझ्या #शालेय जीवनात अभ्यासात कधीच कमी पडली नाहीस.तू प्रत्येक वर्षी  तु  तुझ्या शालेय प्रगतीचा आलेख उंचावत ठेवलास.हे करत असताना , मी तुला कधीही अभ्यास कर म्हणून दरडावले किंवा सांगितले असे आठवत नाही, आणि तशी वेळही तु कधी येऊ दिली नाहीस.

इयत्ता दहावी मद्धे असताना  सुद्धा तू मला एकच वेळ सांगितलेस ,की, 

' बाबा मी दहावीमद्धे एवढे गुण मिळवणारच हे तुझे तुच #Target ठरवलेस ' 

आणि ते तू पुर्ण केलस किंबहुना जादाच गुण मिळवलेस.

९१% गुण मिळवून तू उज्ज्वल यश संपादन केलेस.

त्यावेळी तू दहा वर्षे घेतलेले कष्टाचे फळ मिळाले ,

 ' इस्लामपूर हायस्कूलच्या स्वागत कमानीवर यशस्वी विद्यार्थी- विद्यार्थ्यांनींचे फोटो झळकले, त्यामध्ये माझ्या लेकीचा ,तुझा फोटो बघून ऊर भरुन आला.'

यात सर्वस्वी तुझे कष्ट होते.पण , यावेळी तुझ्या सत्काराच्या कार्यक्रमाला वेळ देता आला नाही.त्या दिवशी तुला काय वाटले असेल?पण .....तरीही तुच आमची समजूत घातलीस , तु म्हणालीस , #बाबा ! यात तुमचा #आई- वडिलांचा काय दोष तुम्ही दोघेही #शिक्षक असल्याने तुम्हाला १५ जुन शाळेच्या पहिल्या दिवशी हजर राहवच लागतं हे माहिती आहे.आणि सत्काराचा कार्यक्रम हायस्कूलने त्यांच्या पुर्वपार पद्धतीने शाळेच्या पहिल्याच दिवशी घेतला ! असुदे ! Don't #worry ,Be #Relax ' असे तुच धीराचे शब्द दिलेस.

खरचं ! किती हा समजूतदारपणा !!

आणि ........

दोन दिवसांपूर्वी १२ वीचा निकाल जाहीर झाला.तू घेतलेल्या कष्टाचे फळ परमेश्वराने पुन्हा भरभरुन दिले.

तब्बल , ९६.३३ % गुण १२ वी सायन्स परिक्षेत मिळवलेस आणि ही यशाची कमान उंचावत ठेवलीस.

आणि तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तु ही सर्वात मोठी भेट आम्हा कुटूंबीयांना तु दिलीस.

खूप , #आनंद झाला ,ऊर भरुन आला.आनंदाश्रुंना आपोआपच वाट मोकळी झाली.

किती समजुतदार आहेस तू.... 

जन्मापासून ते आज पर्यंतचे अनेक  प्रसंग आठवले....

तुझ्या जन्माच्या वेळी #इस्लामपूर येथील #डॉ.पोरवाल हाॅस्पिटलमद्धे जागून काढलेली रात्र आठवली.

काळ कुणासाठीच थांबत नसला तरी ,#आठवणी जशाच्या तशा मनात रूंजी घालत असतात.

काही वेळा , असच एकट बसल की ,मनात  विचार 

येतात आणि #डोळे भरून येतात.

 आपल्यावर जीवापाड़ #प्रेम करणारी ही माझी लाडकी लेक एक दिवस लग्नानंतर आपल्याला सोडून जाणार या साध्या कल्पनेनेच मला रडू येते.

कारण माझ्या वडिलांच्या निधनानंतर , माझ्या बहिणींच्या लग्नामध्ये ही ताटातूट मी अनुभवली आहे.

बापापासून #मुलगी अलग होऊन सासुरवाशीन होते, 

तो क्षण काय असतो ,ते कन्यादान केलेल्या बापालाच माहित असते

तुझ्या कडे पाहिले की खरोखर लक्षात येते की खरच मूली खुप ग्रेट असतात...

#जान्हवी आज तू  मोठी झालीस हे अगदी खरे आहे...पण मुले कधीही आई - वडिलांसमोर मोठी असतात का ❓जान्हवी, तू खुप मोठी हो… किर्तीवंत हो…आमचा आशीर्वाद तर नेहमीच तुझ्या पाठीशी आहे...!

वाढदिवसानिमित्त खूप - खूप  शुभाशिर्वाद...

तुझा #बाप म्हणून अशा लाडक्या लेकी सोबत वाढणे हे ही खूप आनंददायी आहे...

वाढदिवसाच्या खूप -खूप शुभेच्छा बेटा...

Happy Birthday JANHAVI !

- आई- बाबा

- धनाजी माने......✍️

४२ वर्षांनी पुन्हा भेटले गुरु-शिष्य…! - ५ सप्टेंबर शिक्षकदिन

  ४२ वर्षांनी पुन्हा भेटले गुरु-शिष्य…! ======================== गुरुंच्या चरणी कृतज्ञतेची फुले वाहताना अनेकांच्या  डोळ्यांत दाटला आठवणींचा ...