कुतुहल🤭😀
कोविशिल्ड लसीचे दोन डोस घेतल्यावर नाशिकच्या सिडको भागातील अरविंद सोनार यांच्या शरीराला अचानक सर्व वस्तू चिकटायला लागल्याच्या बातम्या विविध चॅनेलवर प्रसिद्ध झाल्यानंतर व त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर,
सदरची बातमी पाहणाऱ्या अनेकांनी आपल्याही शरीराला नाणी चिकटत नाहीत ना?याची खात्री करुन घेतली.😀
याबाबत माहिती अशी की ,
नाशिक येथील सिडको परिसरात शिवाजी चौकात अरविंद जगन्नाथ सोनार वय वर्षे ७१ यांच्या शरीरावर ,नानी,चमचे, झारी,प्लेट अशा स्टीलच्या ,लोखंडाच्या वस्तू चिकटत असल्याच्या बातम्या विविध चॅनेलवर प्रसिद्ध होत आहेत.
वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या शरीराच्या कमरेच्या वरच्या भागावर वस्तू चिकटत आहेत.
कमरेच्या खाली कोणत्याही भागात नाणी किंवा इतर वस्तू चिकटत नाहीत.
याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी , वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी येवून खात्री केल्याचेही त्यांनी या व्हिडीओ मध्ये सांगितले आहे.त्यांची बायपास ची शस्त्रक्रिया ही झाली असून त्यांना शुगरही आहे.
दोन दिवसांपूर्वी कोरोना लसीचा दुसरा डोस हॉस्पिटलमध्ये घेतला होता. लस घेतल्यानंतर त्यांनी स्वतः प्रयत्न करून अशा वस्तू शरीरावर लावून बघितल्या. तर त्यांना घरातील लोखंडाच्या आणि स्टीलच्या वस्तू, नाणी,झारे, चमचे अशा लोखंडी ,स्टीलच्या विविध वस्तू शरीरावर तशाच चिकटून राहात असल्याचे लक्षात आले.
एकूणच हे वैद्यकीय क्षेत्रातील लोकांच्या समोर संशोधनाचा विषय ठरला असून,
कोव्हिड लस घेतलेले लोक घराघरात , आपल्याही शरीराला वस्तू चिकटत नाही ना हे कुतुहलाने पहात आहेत.😀😀😀🤭
-धनाजी माने

No comments:
Post a Comment