Sunday, May 16, 2021

Lockdown..शाळा ,शिक्षक आणि मुल...

 

📌एक अभूतपूर्व संकट सगळ्या जगावर कोसळलं आहे. ते दूर कुठेतरी होतं-आहे असं म्हणता म्हणता, ते आपल्या दारात-घरातच येऊन ठेपलं. जगभरातल्या  सगळ्या आरोग्यव्यवस्था, अर्थव्यवस्था या संकटामुळे ढासळल्या आहेत; तसाच या संकटाचा फटका शिक्षणव्यवस्थेलाही बसला आहे. सुरुवातीचा काळ फार गोंधळाचा होता. या अशा परिस्थितीला आपण कोणीच सामोरे गेलेलो नव्हतो. अचानक आलेलं हे संकट प्रत्येक क्षेत्राला भांबावून टाकणारं होतं. त्याला तोंड कसं द्यायचं, हे सगळ्यांनाच नव्याने शिकायला लागणार होतं. साहजिकच शिक्षणक्षेत्रही त्याला अपवाद नव्हतं....शाळा आता कधी भरणार ?
चिमुकल्यांच्या गोंगाटाने ,
घुमणारा शाळेचा परिसर  पुन्हा कधी घुमणार ?
असे विविध प्रश्न  मनात ‌येतात.......✍️

Lockdown..शाळा ,शिक्षक आणि मुल.....

शाळा आता कधी भरणार ?
ते निष्पाप, निरागस चेहरे .....
आता समोर कधी दिसणार ?
एकामागुन एक , हे प्रश्नांचेगुंते
कधी सुटणार....?

चिमुकल्यांच्या गोंगाटाने ,
घुमणारा शाळेचा परिसर
आता कसा शांत-शांत....
भकास झालायं.......

कार्यालयाच्या खोलीविना,
बाकी खोल्या lock झाल्यात...
मोठ्या सुट्टीत, मधल्या सुट्टीत
गजबजलेले शाळेच प्रांगण
चिमुकल्यांच्या सोबत खेळण्यास..
आतुर झालयं ,अगदी आई-मुलाच्या भेटीसारखं.

माणसाविणा घरं,
तशा मुलाविणा शाळा झालेतं.
मुलांसाठी गुरु, आणि गुरुसाठी मुले
भेटीसाठी आतूर आहेत.
काहींनी तर ....
कायमचाच निरोप घेतलाय जगाचा,
मुलांच्या भेटीविणाच.

देवा आता नको बघू ,
आणखी परीक्षा......
उघडूदेत सर्व शाळांचे दरवाजे
अगदी पुर्वीसारखे......
तो गोंगाट पुन्हा घुमुदे ,ज्ञानमंदिरात.

बंद कर आता तु ...
तुझी धोक्याची घंटा.
ऐकूदे आम्हाला आणि चिमुकल्यांना
शाळेची ती वाजणारी घंटा.....

- धनाजी माने ....✍️

2 comments:

B S Attar - Sadguru Shirala said...

खुप छान लेखन !

VIVEK MANTHAN - विवेक मंथन said...

फार च छान सर...👌👌👌💐💐💐

४२ वर्षांनी पुन्हा भेटले गुरु-शिष्य…! - ५ सप्टेंबर शिक्षकदिन

  ४२ वर्षांनी पुन्हा भेटले गुरु-शिष्य…! ======================== गुरुंच्या चरणी कृतज्ञतेची फुले वाहताना अनेकांच्या  डोळ्यांत दाटला आठवणींचा ...