Wednesday, May 12, 2021

पाऊस का पडेना ? पिक्चर आजून बाकी आहे.

 पाऊस का पडेना ❓

■ तो पुन्हा येतोय म्हणे ! ( कोरोणा - चौथी लाट ) ■

विकासाच्या नावाखाली पर्यावरणामध्ये मानवी #हस्तक्षेप वाढल्याने आज जगात हवामान बदल , अवेळी पाऊस तर कधी पाऊसच नाही तर कधी अतिवृष्टी ,जागतिक तापमान वाढ अशा मोठय़ा समस्यांनी डोके वर काढले आहे. यात जैवविविधतेचा #ऱ्हास हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
जगातील सर्व प्रजाती व अधिवास यांचे जाळे म्हणजेच जैवविविधता असते. निसर्गातील जैवविविधता मानवी जीवनाला अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची ठरलेली आहे. त्यामुळे जैविविधतेचे जतन करणे क्रमप्राप्त आहे. आपण जैविविधतेमुळे जिवंत आहे हे विसरून चालणार नाही अन्यथा आपला #विनाश अटळ आहे.
मग तो असा स्वाईन फ्ल्यू,करोणा या मार्गाने विस्कटलेली निसर्गाची घडी सुरळित करण्यासाठी येत असावा का ❓

📌 झाडे लावा ,झाडे जगवा !

📌 पाणी म्हणजे जीवन , ते जपून वापरा !

( २०२० मद्धे  कोरोणाने हाहाःकार निर्माण केला , त्या वास्तवतेवर कविता.......✍️) 

कोरोनाचा टेलर

📌 #पिक्चर आजून बाकी आहे.

हे अतिशहाण्या #माणसा,
मी तूला सांगायला आलोय,
#ट्रेलर दाखवून इशारा द्यायला आलोय.
काय खावे, किती खावे ,
हे सांगायला आलोय.

गुहेतल्या वटवाघळासं
बाजारात आनलसं.
त्याच सुप तू आनंदात चाखलसं.( चायनामद्धे)
माझ #चक्र तोडताना,
तुला कसलीच #करुणा आली नाही.....

म्हणून तर मला .....

'कोरोणाच' रुप घ्याव लागतयं.
जगात साऱ्या #तांडव कराव लागत.
पुन्हा- पुन्हा नव रुप घ्याव लागतयं
तुझ्या एकट्याच्या सुखासाठी ,
धरतीची कितीतरी चक्र तोडलीस .


कितीतरी #चिमणी - पाखरं
#प्राणी गायब केलीस.
माय भू च्या कुशीत खेळणाऱ्या,
झाडा वेलींची कितीतरी #कत्तल करुन,
सिमेंटची जंगल उभा केलीस.


जमेल तसे , जमेल तेवढे ,
तिचे  लचके , तू तोडलेस.
जळी, स्थळी ,काष्टी ,पाषाणी,
तिला हवे तसे ओरबडतोयस.

अरे तुझ्यासारखीच बाकीचीही ,
#प्राणी -पक्षी ,#झाडे -वेली ,
लेकर आहेत धरतीची.
अतिशहाणा समजून स्वतःला ,
लेकरांना त्या तू संपवू पाहतोयसं.


कागदावरतीच  लावून झाडं,
ती कशी वाढतील ?
विकासाच्या नावाखाली,झाडांची करून कत्तल.
अशान वनराई फुलेल का?
आणि तुला तरी मोकळा #श्वास ,
घेता येईल का?


कशा- कशाचा माज तुला,
#सोने - नाणे पैशांचा,नावापुढच्या पदव्यांचा
#घोडागाडी, बंगल्यांचा .
जमीन - जुमला संपत्तीचा,नव्या शोधांचा.
महाशक्ती, आणि #महासंहारकांचा.

अरे माणसा आव्हान आहे ,माझे तुला,
#'कोरोणा' हे माझ छोट रुप आहे.
हारवू शकलास तर ,हारव मला.
आनंदच आहे.

पण...
यातून एक धडा शिकून जा,
सोबत संदेश घेऊन जा,
स्वार्थासाठी #जाती ,#धर्म ,#पंथ ,
सारे तू विसरुन जा.
आयुष्यात एक तरी झाड ,
 तू इथे जगवून जा !



कलेस तर ठीक ,
नाहीतर हा नुसता ट्रेलर आहे.
पिक्चर आजून बाकी आहे.......


- ️ धनाजी माने....✍️

भैरवनाथ यात्रा अंकोली ता.मोहोळ जि.सोलापूर

भैरवनाथाच्या नावानं चांगभल....... #मोहोळ तालुक्यातील मौजे #अंकोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी शुक्रवार ...