Wednesday, May 12, 2021

देवाभाऊ ,आमचा देवमाणूस|

 


◾स्वतःच्या मनगटावर दहा माणसांचं कुटुंब सांभाळणारा  विश्वास  म्हणजेच देवाभाऊ वय अवघ ४५ वर्षे.दहा माणसांचा तारणहार कुटूंबाचा प्रमुख. हृदयविकाराच्या झटक्याने  मनाला चटका लावून अचानक निघून गेला. देवाभाऊ गेला आणि गावकऱ्यांनी दुःखावेगाने हंबरडा फोडला.भाऊ वयाने मोठा होता, पण सर्वाबरोबर तो निष्पाप, निरागस मुलाप्रमाणे राहायचा.......
दहा माणसांच्या कुटुंबाचा गाडा अगदी हसतमुखाने भाऊ हाकत होता. पण हा देवाभाऊ या सगळ्यांना उघड्यावर टाकून कधीही परत न येण्याच्या प्रवासाला गेला. त्याच्या जाण्याची ही बातमी सगळीकडे पसरली.अखेरचे दर्शन घेण्यासाठी जनसागर गोळा झाला. 
भाऊने कुणाला काय दिले हे माहीत नाही, पण प्रत्येकाला भरभरून प्रेम दिले, याचा साक्षात्कार सर्वांना स्मशानभूमीतल्या जनसागरावरून झाला.

📌 प्रासंगिक..........✍️


देवाभाऊ ,आमचा देवमाणूस|


नियतीने असा डाव खेळला,
अर्ध्यावरतीच डाव मोडला,
देवानेच आमचा , देवाभाऊ नेला.

संकटामागुन संकटे आली,
भाऊला प्रिय असणारी , जिवापाड जपलेली,
भाऊची माणसं, नियती घेऊन गेली.
ही आलेली सगळी संकट भाऊन हासतचं पेलली.

भाऊ कधीच हताश झाला नाही,
झालातरी त्याने ते ,कधी दाखवले नाही.
हसत राहिला जगासमोर, दु:ख उरातल दाबून.
लढत रहा ,हसत रहा गेला सर्वांना सांगून.

भाऊ नेहमी लढत राहिला,
परिस्थितीवर मात करत.
हासत मुखाने सामोरा गेला.
या सर्वांवर मात करतं.

भाऊ आयुष्यभर तू तुझी दु:ख ,
उरात साठवलीस.
कधी-तरी  तू आम्हाला,
मनमोकळेपणाने का नाही सांगितलीस?

स्वत:पेक्षा भाऊ तू , 
दुसऱ्यांचीच काळजी केलीस.
शेवटच्या क्षणीही तू,तुझ्या मृत्यची चाहूल ,
जगाला जाणवू नाही दिलीस.

वाटले नव्हते असे , आक्रीत घडून येईल.
दहा माणसांचा पोशींदा,सर्वांचा तू देवमाणूस,
देव असा आमच्यातून , तुला हिरावून नेईल
.

- धनाजी माने......✍️

No comments:

४२ वर्षांनी पुन्हा भेटले गुरु-शिष्य…! - ५ सप्टेंबर शिक्षकदिन

  ४२ वर्षांनी पुन्हा भेटले गुरु-शिष्य…! ======================== गुरुंच्या चरणी कृतज्ञतेची फुले वाहताना अनेकांच्या  डोळ्यांत दाटला आठवणींचा ...