Sunday, May 16, 2021

या गावांचा आदर्श तमाम गावांनीही घ्यायला हवा.

 ◾कोरोनाला लवकरात लवकर रोखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असणार आहे. प्रशासन आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडत आहे. त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरू न देण्यासाठी आपण आपले वैयक्तिक कर्तव्य पार पाडणे तेवढेच गरजेचे आहे.
विनाकारण बाहेर पडू नका, घरातच बसा, मास्कचा वापर निदान एवढे जरी केले तरी आपण माणुसकी दाखवल्याचा, लोकांचे प्राण वाचवल्याचा, या संकट काळात सेवाधर्म निभावणाऱ्या लोकांना सहाय्य केल्याचा, गाव सावरल्याचा अभिमान बाळगू शकू...
.
.



✌️या गावांचा आदर्श तमाम गावांनीही घ्यायला हवा.


पी.सावळाराम व पांडू मास्तर यांच्या गावात व 
या गावापासून जवळच असणाऱ्या लाडेगांवात ,कोरोणावर मात करण्यासाठी सर्व गाव झटतयं ,चांगल काम घडतयं.
वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी व लाडेगांव या गावांचा आदर्श तमाम गावांनीही घ्यायला हवा.
कोरोणावर मात करण्यासाठी या गावांचा पॅटर्न गावागावात तयार झाला तर भारतातील ग्रामीण भाग  कोरोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही.
येडेनिपाणी म्हटलं की डोळ्यासमोर मराठी भावकवी,  ठाण्याचे नगराध्यक्ष निवृत्तीनाथ रावजी पाटील उर्फ पी.सावळाराम व स्वातंत्र्यपूर्व काळात प्रतिसरकार चळवळीतील क्रांतीवीर पांडूरंग गोविंद पाटील उर्फ पांडू मास्तर ही या गावची ग्रेट व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभी राहतात.सावळाराम यांचे प्रत्येक विवाह सोहळ्याचा अविभाज्य भाग असणारे
 'गंगा जमुना डोळ्यात उभ्या का' हे गीत यावेळीही लोकांना आठवले. पण........ याचे, यावेळचे  कारण  होते कोरोणा.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ही दोन्ही गावे हॉटस्पॉटच्या दिशेने आगेकुच करत होती.
येडेनिपाणीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गावात ८४ रुग्ण सापडले.तर लाडेगावमद्धे एप्रिल व मे २०२१ दरम्यान गावात तब्बल ७८ रुग्ण झाले.यामद्धे अनेकांनी आपले प्राण गमावले.
या गावानसमोर  मोठे संकट उभे राहिले ,अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. पण....
यावर गावकरऱ्यांनी एकसंघपणे  मात करण्याचे ठरवले.विविध क्षेत्रातील टीम एकत्र आली.
विविध आवाहने करण्यात आली आणि याला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळाला.
ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने या रुग्णांना मोफत औषधे पुरविली जाऊ लागली.
येडेनिपाणी गावाबाहेरील आश्रमशाळेत लोकांच्या लोकवर्गणीतून  कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले. आपत्ती निवारण समितीने यामध्ये पुढाकार घेतला. दहा ऑक्सिजन बेडच्या या सेंटरमुळे गावातील रुग्णांना येथे मोफत ऑक्सिजन सुविधा मिळते आहे.
सर्वसामान्य रूग्णांना हे सेंटर आधारवड ठरले.
अनेकजण घरीच औषधोपचार घेऊन कोरोनामुक्त झाले.
येडेनिपाणी येथे ग्रामपंचायत सदस्य मारूती कांबळे व इंद्रजित पाटील  रुग्णांची व्यवस्था पहात आहेत.
रुग्णांवर येडेनिपाणीचे सरपंच डॉ. सचिन पाटील  व वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमनाथ अंकोलकर यांच्या मार्गदर्शनाने औषधोपचार सुरू आहेत.
वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी येथे ग्रामपंचायतीने प्रभावी उपाययोजना केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गावात ८४ रुग्ण सापडले. मात्र, केवळ चारच रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. उर्वरित रुग्ण घरीच औषधोपचार घेऊन कोरोनामुक्त झाले. ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने या रुग्णांना मोफत औषधे पुरविली जात आहेत.
गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर गावाबाहेरील आश्रमशाळेत लोकवर्गणीतून कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले. आपत्ती निवारण समितीने पुढाकार घेतला. दहा ऑक्सिजन बेडच्या या सेंटरमुळे गावातील रुग्णांना येथे मोफत ऑक्सिजन सुविधा मिळते आहे.लाडेगांवामद्धेही ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, सहकारी संस्था ,आणि ग्रामस्थांनी एकत्रित येत सामूहिक प्रयत्नातून रुग्णसंख्या आटोक्यात आणली आहे.नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू ठेवली आहे. घरोघरी मास्क वाटण्यात आले. गावात जंतूनाशकांची फवारणी केली आहे.गावातील पाणी पुरवठा संस्थेकडून प्रत्येक कुटुंबाला घरोघरी सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायतीने केलेल्या आवाहनाला लोकांनी मोठा प्रतिसाद दिला. एक लाख रुपयांची वर्गणी जमा झाली. गावातील प्राथमिक शाळेतच  १० बेडचे विलगीकरणचा कक्ष सुरू केला. या ठिकाणी दाखल होणाऱ्या रुग्णांवर सरकारी आणि गावातील डॉक्टरांच्याकडून उपचार सुरु आहेत. रुग्णांना वर्तमानपत्रानपासून ,चहा, नाष्टा, अंडी, गरम पाणी, मनोरंजनासाठी रेडीओ अशा शक्य तेवढ्या सेवा- सुविधा दिल्या जात आहेत.
डॉक्टर जयकर कांबळे हे  घरी उपचार घेणाऱ्यांची विशेष काळजी घेत आहेत.या भीतीदायक वातावरणात रुग्णांच्या नातेवाईकांना ते धीर देत आहेत.
लाडेगांवचे सरपंच रणधीर पाटील, उपसरपंच अरविंद देसाई, कुरळपचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चौगुले ,ग्रामसेवक डी. पी. सिंग,तलाठी प्रियांका हिवरे, आरोग्य सेवक विश्वनाथ पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते या कामी आपला बहुमूल्य वेळ देत आहेत.
या सगळ्या राबणाऱ्या माणसांच्या  ,सेवा करणाऱ्या देवदुतांच्या मनामध्ये  एकच भाव आहे,
'गड्या आपला गाव कोरोणामुक्त राहिला पाहिजे.
आणि गाव - गाड्यातील आपल्या जीवाभावाच्या माणसांचा जीव वाचला पाहिजे. '
- धनाजी माने.....✍️

5 comments:

Unknown said...

👌खूपच छान positive विचार मांडलेत .
हा आदर्श इतर गावांतील नागरिकांनी घेतल्यास प्रत्येक गाव कोरोणामुक्त होणेस वेळ लागणार नाही.

Unknown said...

धन्यवाद माने साहेब...
दोन्ही गावांनी आदर्श घ्यावा असे काम केले.. आहेच... तुम्ही लोकांचा व इतर गावातील लोकांचा उत्साह वाढेल व कोविड विरुद्ध चांगला लढा उभारला जाईल असे लिखाण 📝 केले आहे...
लाडेगांवकर तुमचे आभारी आहेत 🤝

Unknown said...

Very good

Unknown said...

Very good

B S Attar - Sadguru Shirala said...

दोन्ही गावांतील लोकांना - सॅल्युट

भैरवनाथ यात्रा अंकोली ता.मोहोळ जि.सोलापूर

भैरवनाथाच्या नावानं चांगभल....... #मोहोळ तालुक्यातील मौजे #अंकोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी शुक्रवार ...