◾ बाप नावाचा बाप माणूस जेव्हा आयुष्यातून कायमचा निघून जातो.तेव्हाच त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते.भरलेल्या घरातही त्याच रितेपण जाणवत. आयुष्यातील प्रत्येक क्षण जबाबदारीची जाणीव करून देते.
स्वतःचा बाप कष्ट करून घरी दमुन येतो तेव्हा पोराला ते दिसत नाही. पण...
धोनी, सचिन किंवा एखादा क्रिकेटर मैदानात दमतो त्यावेळी ही पोरं स्टेटस ठेवतात. तो पैशासाठी खेळतो.आपला बाप परिवाराच पोट भरण्यासाठी दमतो हे पण लक्षात असुद्या !
अनेक कुटुंबातील बापला आजार, अपघात,घातपात ,आत्महत्या अशा अनेक कारणांनी या जगाचा निरोप घ्यावा लागतो. आणि त्या कुटूंबातील भाऊ ,बहिण ,आई या सर्वांची जबाबदारी कुटुंबातील मोठ्या मुलावर-मुलीवर येते. बाप नसलेल्या बहुतांश कुटूंबामद्धे जबाबदारी पेलणाऱ्या त्या घरातील कर्त्या मुलाची कमी-अधिक प्रमाणात हीच अवस्था असते , हे वास्तव या कवितेतून व्यक्त केले आहे......✍️😥
बाप..... एक बाप माणूस !
एके दिवशी उपचारातच बाप निघून गेला.
त्याचा आधाराचा हाथ , निसटून गेला.
बापाच छत्र हरपल्याने,
तो आता आत-बाहेर मोडून पडला.
बापाच छत्र हरपल्याने,
तो आता आत-बाहेर मोडून पडला.
बापा विना पोरकेपणात ,
अश्रू ढाळू लागला.
बापाच्या आठवणीत,
खिन्न मनाने,तो पुरा कोसळून गेला.
बाप , म्हणजे .......
घराच घरपण आणि आधारवड असतो.
बाप नसलेल्या घराच्या पोकळीत,
तो सारे समजून जातो.
खिन्न मनाने,तो पुरा कोसळून गेला.
बाप , म्हणजे .......
घराच घरपण आणि आधारवड असतो.
बाप नसलेल्या घराच्या पोकळीत,
तो सारे समजून जातो.
मोडून पडलेला संसार बापाचा ,
हळूहळू तो आता सावरतो.
हळूहळू तो आता सावरतो.
कुटूंबाला तो आता आधार देतो.
घरच्यांना आधार देत, भावनांना आवरतो.
वर्षा मागून वर्ष जाते, काळ हळुहळु सरत जातो.
घरच्यांना आधार देत, भावनांना आवरतो.
वर्षा मागून वर्ष जाते, काळ हळुहळु सरत जातो.
फाटलेल्या संसाराला,
तो आता ठिगळ लावत बसतो.
भावंडांना सांभाळता - सांभाळता,
बाप नसलेल्या ,आपल्या बहिणींचे,
तोच आता कन्यादान करतो.
तो आता ठिगळ लावत बसतो.
भावंडांना सांभाळता - सांभाळता,
बाप नसलेल्या ,आपल्या बहिणींचे,
तोच आता कन्यादान करतो.
शाळा शिकता- शिकता ,
छोटी- मोठी काम करत ,
छोटी- मोठी काम करत ,
येणाऱ्या प्रत्येक संकटाला,
संघर्षातून सामोरा जातो.
संघर्षातून सामोरा जातो.
बाप, नसलेल्या संसारात ,
आता त्याचाही संसार फुलतो.
पण..आनंदाच्या या क्षणात,
आता त्याचाही संसार फुलतो.
पण..आनंदाच्या या क्षणात,
मिरवाय त्याचा बाप कुठे असतो?
दु:खाचा आवंढा गिळत,
बापाच्या फोटो समोर नतमस्तक होतो.
बाप असताना, बापाचे मोठेपण समजलेच नाही.
याचा त्याला आता पश्चाताप होतो.
बाप म्हणजे , बाप माणूस असतो,
हे बाप झाल्यावरच , समजून जातो.
त्याच्याही संसाराच्या या वेलीवर ,
फुलांना आता बहर येतो.
दोन चिमुकल्यांच्या बरोबर,
आता तो ही त्यांचा बाप होतो.
फुलांना आता बहर येतो.
दोन चिमुकल्यांच्या बरोबर,
आता तो ही त्यांचा बाप होतो.
खरचं , बाप हा बापच असतो,
हे तो समजून जातो.
बापा विना निर्वात पोकळीतही,
त्याला आता त्याचाच बाप दिसतो.
- धनाजी माने......✍️

7 comments:
Very nice sir
Thanks a lot🙏
ह्रदयस्पर्शी व वास्तव छान लेख न
खूप छान 👌
खूप छान
👍🏻
बाप बाप जसा
फणसाचा गर
वर दिसती काटे
आत गोडीचा आगार.
खुप छान सर..
Post a Comment