Wednesday, May 12, 2021

🐱टिली - मिली🐱

 








========================================

 📌 माणुसकीच्या नात्याने माणूस केवळ माणसाशीच नव्हे, तर प्राण्यांशी नातेसंबंध जोडत असतो. ज्यांच्या घरात पाळीव प्राणी असेल, तर तो त्या कुटुंबाचा एक सदस्यच होतो. घरातील एखाद्या लहान मुलाला ज्याप्रमाणे जिव्हाळा लावला जातो, प्रेम दिले जाते, त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यावर प्रेम केले जाते. घरोघरी पाळले जाणारे पाळीव प्राणी हे जेव्हा आपल्या घरच्या सदस्यासारखे घरात वावरतात तेव्हा आपल्या जवळच्या माणसासारखीच आपण त्यांची काळजी घेतो, लळा लावतो ,प्रेम देतो.आणि तेवढाच किंबहूना त्यापेक्षाही जास्त ते लळा लावतात.मग ते #गाय, बैल,म्हैस, कुत्रा ,मांजर किंवा अन्य प्राणी.......आणि हे परस्परांत जिव्हाळ्याचे, मैत्रीचे नाते अगदी घट्ट होते.असेच नाते घट्ट झाले ' टीली- मिली ' यांच्याशी.ते तसे शब्दात नाही मांडता येत ,  अनुभवावेच लागते........

==================================

📌 सत्यघटनेवर आधारित......

टिली - मिली 

'टिली' गेली ......😥 आणि मिलीसह सारेच बेचैन झाले....

४ फेब्रुवारी २१ ची ती रात्र...टिली त्या दिवशी खूप खेळली , घराच्या परिसरामध्ये खूप बागडली.त्या रात्री ती आमच्या घरातील आई, पत्नी ,मुलगा , मुलगी यांच्याबरोबर खूप बोलली (तिच्या भाषेत..मँव~मँव~) आणि आम्हीही.कुणालाच कुणाची भाषा  कळतं नव्हती पण आम्ही तिच्याशी आणि ती आमच्याशी बोलत होतो.

ती एक महिन्याची असल्यापासून बोलतचं होतो.(ती तिच्या मातृभाषेतून....आम्ही आमच्या मातृभाषेतून...) 

आम्हाला तिने लावलेला लळा  आणि आमचा तिच्याशी निर्माण झालेला  लळा, यामुळे आमचा आणि तिचा भावनिक गुंता खूप निर्माण झाला होता.आणि त्याचमुळे तिची आम्हाला आणि आमची तिला भाषा कळत होती.

' जर आपण एखाद्यावर जीवापाड प्रेम करत असु तर, समोर कोणीही असो , त्याची आपल्याला मुकी भाषाही सर्वकाही समजते याचे प्रत्यक्ष प्रत्यंतर त्या दिवशी आले.

तिचे बोलून झाले ..... ती खेळतच होती.

शेवटी ती येईल,नेहमीसारखी दारावर #आवाज करेल अशी आशा ठेऊन  तिच्यासाठी ति घरात येणारे घराचे दार उघडे ठेऊन,आम्ही सर्वजण झोपण्यासाठी घरी आलो.

तास.... दोन....तीन तास झाले. रात्रीचे १२ …...१.....२  झाले.  त्या रात्री 'टिली' घरी आलीच नाही.

आम्ही ती खेळत असलेल्या जागेवरुन जाऊन आलो तिथेही 'टिली'  दिसली नाही.

 मग मात्र....

आमच्या मनात कालवा- कालव सुरू झाली.ति रात्र खूप झालेने आम्ही तशीच काढली.सकाळपासून मात्र तिचा शोध सुरू झाला.तो दिवस ती रात्र गेली. 'टिली' काही घरी परत आली नाही. आसपास शोधूनही सापडलीच नाही.

दुसऱ्या दिवशी आम्ही , राहतो त्या परिसरात इस्लामपुरातील, महादेवनगर मद्धे बरेच फिरलो. .परिसर,परिसरातील सोसायट्या मधून शोध घेतला.अनेकांना टीलीचे फोटो दाखवले.ती आमच्या बरोबर गेल्या सात महिन्यात आंगा ,खांद्यावर  खेळलेले video दाखवले. आणि कुठे दिसली सापडली तर कळवा.सोबत आमचा संपर्क फोन दिला.

 तिचे वैशिष्ट्ये म्हणजे टिली रंगाने अगदी सावळी नव्हे तर काळीकुट्ट , पण तिचे गुण मात्र माणसाच्या भावनांना साद घालणारे ,मनाला पाझर फोडणारे होते.....त्यावेळी समजले की एखाद्याच्या काळ्या किंवा गोऱ्या रंगापेक्षाही , अंगभूत असणारे माणुसकीचे ,आपलेपणाचे गुणच श्रेष्ठ असतात.

'आमची लाडकी काळी कुट्ट गुणवान टिली.....त्या दिवशी ती, तिच्या गैरहजेरीत खूप मोठी वाटली.'

खरचं.....एखाद्या गोष्टीचे ,वस्तुचे,व्यक्तीचे महत्व आणि मोल ती नसतानाच  जाणवते.शेवटी.......ती रात्रही तशीच गेली.गेली दोन दिवस घरातील वातावरण अगदी उदास होते.कुणाला अन्न गोड लागले नाही. आई ,पत्नी, मुलगा, मुलगी कोणीच समाधानकारक जेवले नाहीत.

घरचा ,आपल्याच कुटुंबातील एक सदस्य तोही सर्वावर निस्वार्थ भावनेणे प्रेम करणारा हरवला होता ,की..... कायमचा सोडून गेला होता ही घालमेल आमच्या प्रत्येकाच्या मनात होती.

टिलीला एखाद्या कुत्र्याने  खाल्ले तर नसेल ना ? तिला काहीतरी खाऊन विषबाधा तर झाली नसेल ना ? असे नको ते प्रश्न मनात काहूर माजवू लागले.तिच्या आठवणी येऊन आम्ही सर्वच व्यथित झालो.

टिलीच्या बहिणीने 'मिलीने' तर , एक घास नाही तर तिने पाणीही वर्ज केले. 'टिलीच्या ' नसण्याने 'मिलीची' घालमेल आम्हाला पाहावत नव्हती. सारखे तिचे  "मँव~~मँव ~~ " दोन्ही बहिणींच्या विरहाचा संकेत देत होते.

तीची ती नि:शब्द घालमेल आम्हाला बरच काही सांगून जात होती.डोळ्यातून  पाणी आल्यासारख .आवाज कापरा दर्दभरी झाला होता. तिच मँव~ मँव काय थांबत नव्हत.

माझ्या मुलाचे - मुलीचे तिचे ते बोल  ऐकूण  डोळे पाणावले.तिला जवळ घेतले , त्यांनी तिला गोंजारले।मग आमच्याही डोळ्याच्या कडा.आपोआपच पानावल्या.

आम्हाला टिलीची  उणीव खूपच भासू लागली.कारण ,कोरोणाच्या महामारीच्या काळात सार जग थांबलं होते.माणसचं माणसाजवळ जात नव्हती.कुणालाच कुणाचा कसलाच भरोसा नव्हता.

आपल्या डोळ्यादेखत आपलीच माणसं आपल्याला सोडून जात होती.कायमची नजरेआड होत होती.प्रत्येकालाच आपला मृत्यू समोर दिसत होता.आणि याचा पहिला मोठा फटका इस्लामपूरला बसला होता.भारतात आणि भारताबाहेरही दखल घ्यावी अशी अवस्था इस्लामपूरमद्धे झाली होती.

ऑगस्ट २०२० तर इस्लामपूर व सांगली जिल्हा कोव्हिडने घडणाऱ्या मृत्युच्या दरात जगात आघाडीवर होता.सांगली जिल्ह्यात हाहाःकार माजला होता.डोळ्यादेखत आपल्याच गोतावळ्यातील आपली माणसं आपल्याला सोडून जात होती , परत कधीच न येण्याच्या प्रवासाला निघून जात होती.मनात सर्वांच्याच काहूर माजल होत.काळोख दाटून आलं होतं.........

आणि अशा भितीदायक वातावरणातच काळ्याकुट्ट 'टिलीचा ' आणि 'पांढऱ्या रंगाच्या ' मिलीचा आमच्या घरात प्रवेश झाला होता.

मुलाच्या मित्राने  , ही टिली , मिलीची जोडी  आम्हा घरी पोहच केली होती.'माणसाने, माणसाशी , माणसासम वागणे !'या न्यायाने , जगात माणुसकी हाच फक्त एकमेव धर्म आहे .प्रेमाने जग जिंकता येते.माणुसकी जपता येते.प्रेम हीच भाषा सर्व काही देऊन जाते .हे या सर्व विविध प्रसंगातून समजले.

 या टिली - मिलीने गेल्या सात महिन्याच्या सानिध्यात ,अशा भयाण काळात, आम्हाला लळा लावला.जीव लावला.एका पॅनिक - भितीदायक अशा वातावरणात ज्याची खूप गरज होती  त्या प्रेमाची,मायेची ,आपुलकीची मोठी साथ माणसाणपेक्षाही या आमच्या ' टिली-मीलीने ' दिली होती .

माणसचं माणसाजवळ येत नव्हती तेव्हा टिली- मिली या दोघीच आमच्या सोबत , सावलीसारख्या सोबत देत राहिल्या होत्या.खेळत होत्या ,त्यांच्या भाषेत का असेना काहीतरी बोलत होत्या.जवळ येऊन अंगाला घासायच्या ,पायाजवळ येऊन हट्ट करायच्या काही तरी मागायच्या.

आणि म्हणूनच टिलीचे आमच्यात आता नसने हे, मिलीबरोबरच आम्हालाही बेचैन करुन गेले होते.घरातलंच एक माणूस निघून गेल्याचं जाणवत होतंं.

घरात मयतं व्हाव आणि आपलं माणूस परत कधी येणार नाही या विषन्न अवस्थेत आमचं कुटूंब होतं.घरात अन्न शिजत होत पण ,घशाखाली उतरत नव्हतं.मिलीनेही दोन-तीन दिवस काहीच खाल्ले नव्हते.

टिलीच्या आवाजाचा... घरातून फिरण्याचा... बोलवल्यानंतर जवळ मांडीवर...खांद्यावर बसल्याचा.... भास होत होता.पण टिली काही दिसत नव्हती....नुसता तो भासचं होता.

आम्ही मात्र गेली तीन दिवसं 'टिली ' कुठून ना कुठून येईलं या आशेने, ती दारातून घरात प्रवेश करेल एवढं घराचं दार , रात्रनं - दिवसं उघड ठेवल होतं.१७ तारखेची ती पहाटं, घड्याळात #पहाटेचे सव्वाचार वाजले होते.आम्ही जागेच होतो.

'आपलं प्रेम करणार, आपलं माणूस, आपल्यातं नसतं... तेव्हा आपल्याला झोप लागते का हो ? आम्हाला तर कशी लागेलं...?

 मिलीचीही घालमेल सुरुच होती.ती गेली दोन-तीन दिवस बेचैनच होती.ती ही जागीच राहत होती.फक्त तीला  तिच्या भावना शब्दात व्यक्त करता येत नव्हत्या.

तिची सख्खी बहिण तिला सोडून गेली होती ना!

शेवटी नियतीलाही हे पहावले नसेल , तीन दिवसापासून कठोर झालेल्या नियतीने , दया दाखवली असेल....चमत्कार व्हावा तशीच घटना घडली.

आणि अचानक...... टिलीचा आवाज कानावर आला.आम्ही झोपेतच पत्नीने -मुलाला,मुलाने-मला, मी- मुलीला ,मुलीने-आईला सांगितले टिलीचा आवाज येतोय..... टिली आली की कायं ?

घरातील लाईट लावल्या तर काय आश्चर्य

आवाजा बरोबर टिलीही समोर दिसत होती.डोळ्यावर विश्वासच बसेना. हे पहाटेचे स्वप्न तर नाही ना? असेच काही काळ वाटले.टिली अचानक समोर असल्याचे काही क्षण मन स्वीकारतच नव्हते.

पण....ते वास्तव सत्यच होतं , आमची टीली समोर होती.सर्वांच्या आनंदाचा पारावार राहिला नाही. ती पहाट आनंदाने उजळून निघाली.तो  आनंदाचा माहोल काही वेगळाच होता.....

' आपलं घरच कोणीतरी सिरीयस पेशंट , व्हेंटिलेटरवर शेवटच्या घटिका मोजत निपचीत पडल असावं ,आणि आपण फक्त बाहेर त्याच्यासाठी प्रार्थना करत बसाव ,व दोन तीन दिवसांनी धोका टळून ,आपल माणूस आता ,बोलू लागलय, खाऊ लागलयं ही गोष्ट डॉक्टरांनी सांगावी आणि आपल्या आनंदाला पारावार न उरावा . तसचं काहीस टीलीच्या अचानक येण्याने. अगदी तसाच आनंद टिली आल्याने झाला.

प्रत्येकाने तिला कवटाळले.मगं मिलीने तिला जवळ घेतले.मिली तिला तिच्या बहिणीला टीलीला चाटू लागली.त्यांच्या भाषेत त्या बोलू लागल्या.

मिली तिला सांगत असावी, 

'टिली तू कुठे गेली होतीस गं ? तीन दिवस झाले ! आग वेडे मला सांगून तर जायचेस ना ! '

'अगं टिले ,आम्ही प्रत्येक क्षण कसा काढला , तुला काय कळणार '

त्यावर 'टिली ' ही सांगत असावी ,

'आगं माझीही तिच अवस्था झाली होती. मलाही घरचा रस्ता सापडत नव्हता, मी खूप भटकत होते बाई , खूप दमले ग मी. ' - 'मी तर कुठे तीन दिवसं झाले, कुठे काय नाही खाल्ले गं ?.चला मला काही तरी खायला द्या ! '

बेजार झालेली ,दमलेली, अशक्त झालेली टीली , आपल्या बहिणीला असचं काही सांगत असावी.

टिलीला.... मुलीने दुधाचा वाडगा भरुन दिला.पोटभर दुध प्यायली आणि ती पुन्हा आमच्या छत्र छायेत विसावली !

खरचं , मुक्या प्राण्याला आपण प्रेम दिलं ,लळा लावला तर तीही आपल्याला तेवढच नव्हे तर त्याहूनही अधिकच भरभरून प्रेम देतात आणि लळाही लावतात.......माणसापेक्षाही जास्त. 

या  प्रण्यांना बोलता येत नसल तरी, त्यांच निस्वार्थी प्रेम, माया ,आपुलकी आणि लावलेला लळा ते अगदी बरोबर ती आपल्या कृतीतून व्यक्त  करतात हे नक्की !

फक्त ते माणुसकीच्या व मानवतेच्या नात्याने माणसाला जाणता यायला हवं ,पाहता यायला हवं एवढंच !

- धनाजी माने........✍️



देवाभाऊ ,आमचा देवमाणूस|

 


स्वतःच्या मनगटावर दहा माणसांचं कुटुंब सांभाळणारा  विश्वास  म्हणजेच देवाभाऊ वय अवघ ४५ वर्षे.दहा माणसांचा तारणहार कुटूंबाचा प्रमुख. हृदयविकाराच्या झटक्याने  मनाला चटका लावून अचानक निघून गेला. देवाभाऊ गेला आणि गावकऱ्यांनी दुःखावेगाने हंबरडा फोडला.भाऊ वयाने मोठा होता, पण सर्वाबरोबर तो निष्पाप, निरागस मुलाप्रमाणे राहायचा.......
दहा माणसांच्या कुटुंबाचा गाडा अगदी हसतमुखाने भाऊ हाकत होता. पण हा देवाभाऊ या सगळ्यांना उघड्यावर टाकून कधीही परत न येण्याच्या प्रवासाला गेला. त्याच्या जाण्याची ही बातमी सगळीकडे पसरली.अखेरचे दर्शन घेण्यासाठी जनसागर गोळा झाला. 
भाऊने कुणाला काय दिले हे माहीत नाही, पण प्रत्येकाला भरभरून प्रेम दिले, याचा साक्षात्कार सर्वांना स्मशानभूमीतल्या जनसागरावरून झाला.

📌 प्रासंगिक..........✍️


देवाभाऊ ,आमचा देवमाणूस|


नियतीने असा डाव खेळला,
अर्ध्यावरतीच डाव मोडला,
देवानेच आमचा , देवाभाऊ नेला.

संकटामागुन संकटे आली,
भाऊला प्रिय असणारी , जिवापाड जपलेली,
भाऊची माणसं, नियती घेऊन गेली.
ही आलेली सगळी संकट भाऊन हासतचं पेलली.

भाऊ कधीच हताश झाला नाही,
झालातरी त्याने ते ,कधी दाखवले नाही.
हसत राहिला जगासमोर, दु: उरातल दाबून.
लढत रहा ,हसत रहा गेला सर्वांना सांगून.

भाऊ नेहमी लढत राहिला,
परिस्थितीवर मात करत.
हासत मुखाने सामोरा गेला.
या सर्वांवर मात करतं.

भाऊ आयुष्यभर तू तुझी दु: ,
उरात साठवलीस.
कधी-तरी  तू आम्हाला,
मनमोकळेपणाने का नाही सांगितलीस?

स्वत:पेक्षा भाऊ तू
दुसऱ्यांचीच काळजी केलीस.
शेवटच्या क्षणीही तू,तुझ्या मृत्यची चाहूल ,
जगाला जाणवू नाही दिलीस.

वाटले नव्हते असे , आक्रीत घडून येईल.
दहा माणसांचा पोशींदा,सर्वांचा तू देवमाणूस,
देव असा आमच्यातून , तुला हिरावून नेईल
.

- धनाजी माने

पाऊस का पडेना ? पिक्चर आजून बाकी आहे.

 पाऊस का पडेना ❓

■ तो पुन्हा येतोय म्हणे ! ( कोरोणा - चौथी लाट ) ■

विकासाच्या नावाखाली पर्यावरणामध्ये मानवी #हस्तक्षेप वाढल्याने आज जगात हवामान बदल , अवेळी पाऊस तर कधी पाऊसच नाही तर कधी अतिवृष्टी ,जागतिक तापमान वाढ अशा मोठय़ा समस्यांनी डोके वर काढले आहे. यात जैवविविधतेचा #ऱ्हास हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
जगातील सर्व प्रजाती व अधिवास यांचे जाळे म्हणजेच जैवविविधता असते. निसर्गातील जैवविविधता मानवी जीवनाला अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची ठरलेली आहे. त्यामुळे जैविविधतेचे जतन करणे क्रमप्राप्त आहे. आपण जैविविधतेमुळे जिवंत आहे हे विसरून चालणार नाही अन्यथा आपला #विनाश अटळ आहे.
मग तो असा स्वाईन फ्ल्यू,करोणा या मार्गाने विस्कटलेली निसर्गाची घडी सुरळित करण्यासाठी येत असावा का ❓

📌 झाडे लावा ,झाडे जगवा !

📌 पाणी म्हणजे जीवन , ते जपून वापरा !

( २०२० मद्धे  कोरोणाने हाहाःकार निर्माण केला , त्या वास्तवतेवर कविता.......✍️) 

कोरोनाचा टेलर

📌 पिक्चर आजून बाकी आहे.

हे अतिशहाण्या माणसा,
मी तूला सांगायला आलोय,
ट्रेलर दाखवून इशारा द्यायला आलोय.
काय खावे, किती खावे ,
हे सांगायला आलोय.

गुहेतल्या वटवाघळासं
बाजारात आनलसं.
त्याच सुप तू आनंदात चाखलसं.( चायनामद्धे)
माझ चक्र तोडताना,
तुला कसलीच करुणा आली नाही.....

म्हणून तर मला .....
'कोरोणाच' रुप घ्याव लागतयं.
जगात साऱ्या तांडव कराव लागत.
पुन्हा- पुन्हा नव रुप घ्याव लागतयं
तुझ्या एकट्याच्या सुखासाठी ,
धरतीची कितीतरी चक्र तोडलीस .


कितीतरी चिमणी - पाखरं
प्राणी गायब केलीस.
माय भू च्या कुशीत खेळणाऱ्या,
झाडा वेलींची कितीतरी कत्तल करुन,
सिमेंटची जंगल उभा केलीस.


जमेल तसे , जमेल तेवढे ,
तिचे  लचके , तू तोडलेस.
जळी, स्थळी ,काष्टी ,पाषाणी,
तिला हवे तसे ओरबडतोयस.

अरे तुझ्यासारखीच बाकीचीही ,
प्राणी -पक्षी ,झाडे -वेली ,
लेकर आहेत धरतीची.
अतिशहाणा समजून स्वतःला ,
लेकरांना त्या तू संपवू पाहतोयसं.


कागदावरतीच  लावून झाडं,
ती कशी वाढतील ?
विकासाच्या नावाखाली,झाडांची करून कत्तल.
अशान वनराई फुलेल का?
आणि तुला तरी मोकळा श्वास ,
घेता येईल का?


कशा- कशाचा माज तुला,
सोने - नाणे पैशांचा,नावापुढच्या
पदव्यांचा घोडागाडी, बंगल्यांचा .
जमीन - जुमला संपत्तीचा,नव्या शोधांचा.
महाशक्ती, आणि महासंहारकांचा.


अरे माणसा आव्हान आहे ,माझे तुला,
'कोरोणा' हे माझ छोट रुप आहे.
हारवू शकलास तर ,हारव मला.
आनंदच आहे.

पण...
यातून एक धडा शिकून जा,
सोबत संदेश घेऊन जा,
स्वार्थासाठी जाती ,धर्म ,पंथ ,
सारे तू विसरुन जा.
आयुष्यात एक तरी झाड ,
तू इथे जगवून जा !
कलेस तर ठीक ,
नाहीतर हा नुसता ट्रेलर आहे.
पिक्चर आजून बाकी आहे.......

- ️ धनाजी माने....✍️

कोरोनातील lockdown

 

📌 #कोरोना #विषाणू अत्यंत धोकादायक आहे आणि अतिसूक्ष्म आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता तो मानवी शरीरात शिरतो, राहतो आणि निघूनही जातो. बरेचदा शरीरावर त्याची कोणती लक्षणेही दिसत नाहीत. त्यामुळे त्याचे अस्तित्व ओळखून त्याला रोखणे जवळजवळ अशक्य होते.‘कोव्हिड-१९’ या साथीच्या दृष्टीने पाहिले, तर जीवनाच्या नाण्याला दोन बाजू आहेत. पहिली म्हणजे, #अस्तित्व राखण्यासाठी जगणे गरजेचे आहे. दुसरे म्हणजे, शरीर आणि मनाचे संतुलन राहील, याची काळजी घेणे आवश्यक आहे.पहिला #लॉकडाऊन #जाहीर झाला, तेव्हा म्हणजे २३ मार्च रोजी भारतात ‘कोव्हिड-१९’चे ४१५ रुग्ण आणि दहा #मृत्यू नोंदविण्यात आले होते. मार्चच्या अखेरीपर्यंत रुग्णसंख्या १२५१ वर पोहोचली आणि ३२ मृत्यूंची नोंद झाली होती. एप्रिलच्या अखेरीस रुग्णसंख्या ३३,०६२ वर आणि मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा १०७९वर गेला. तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपण्यास केवळ काही दिवस उऱले असताना म्हणजे १२ मे पर्यंत देशात ७४,०७९ रुग्ण आणि २,४१० मृत्यू नोंदविण्यात आले. याचा अर्थ मार्चच्या अखेरीपर्यंत केवळ सात दिवसांत रुग्णसंख्या आणि मृत्यू तिपटीने वाढले. या सर्व घडामोडींचा आढावा घेतला असता करोणाने माणसाला बरेच काही शिकवले........✍️



◾कोरोनातील lockdown.....◾

कोरोनातील #lockdown ने
माणसाला बरच काही #शिकवलं.
कोंडून #स्वतःला,त्यान स्वतःमद्धे पाहिलं,
तेव्हा त्याच त्याला ,खर #रुप दिसलं.
 
कितीही लावले #शोध तरी,
#निसर्ग पुरुण उरतो.
दिसणारा 'कोरोणा' ही,
भल्या-भल्यांना $हैराण करतो.
 
भलेभले म्हणणारे ही ,
#गलितगात्र झाले.
मरणाच्या भितीने,
त्यांच्या मनात #काहूर दाटले.
 
#सोने-नाणे, पैसा -आडका ,
उगीच #अहंकार जपला.
असा #विचार मनात येऊन,
#माणूस बरचं शिकला.
 
'कोराणा'च्या तांडवाने ,
तो #हैराण होऊन गेला.
माणसानं साठी आपल्या,
आता तो #वेळ देऊ लागला.
 
कोराणाच्या निमित्ताने,
त्याला बरचं काही शिकवलं.
नेमकं काय #कमवलं,
हे त्याच त्याला समजलं
 
- धनाजी माने....✍️


महापूर

 






📌 २६ जुलै २००५ च्या महाप्रलयंकारी पावसानंतर २९ ऑगस्ट २०१७ च्या धुवाँधार पावसाने मुंबईसह राज्याला तोच वाईट अनुभव दिला. आणि  १९ सप्टेंबर २०१७ च्या पावसाने तीच धडकी भरवली. मुंबई, ठाण्यासह कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला  धुवाँधार पावसाने धुऊन काढले.

वारणा व कृष्णा...... अशा महाराष्ट्रातील अनेक नद्यांना महापुर आला. आणि सर्वत्र महापुराची गंभीर स्थिती निर्माण झाली ,अनेक लोकांना ,दावणीच्या जनावरांना आपले प्राण गमवावे लागले ,अनेकांचे संसार उघड्यावर पडले........

ही व्यथा आणि ज्यांच्यामुळेचे धरती सुजलाम् -सुफलाम्  त्यांच्याच मगरमिठीत

हा भाग सापडला.......


  पंचगंगा ,वारणा आणि कृष्णामायं.......


 

सांगा आम्ही ,पाप असं केल कायं?

काठावरच्या तुमच्या गावांना,

विळखा तुम्ही दिलायं,

मगरमिठीचा फास तुम्ही,

असा घट्ट आवळलायं.

सांगा ,पाप असं केल कायं?

 

गुराढोरांचा , दावणीच्या जणावरांचा,

पोटच्या पोरांचा,हजारो लोकांचा,

जीव तुम्ही टांगणीला लावलायं,

काहींच्यातर ,तुम्ही जीवाव बेतलायं.

सांगा ,पाप असं केल कायं?

 

इंचाइंचाने , फुटाफुटाने ,

सारा भागचं , तुम्ही कवेत घेतलायं

पुराच्या पाण्यात, आमची आसवचं,

दिसणार नाहीत ,असा डावं खेळलायं.

सांगा  ,पाप असं केल कायं?

 

 सारा संसार  उभा ज्यांच्यावरं

ती गाई-गुर आणि दुभती जनावरं,

सोबत तुम्ही घेऊन जाताना,

हतबलं होऊन पाहतो आहे,

अक्रोश आमचा आजून सुरुच आहे.

 

ब्रम्हनाळ मद्धे तर, खूपच कोपला,

कुणाची मायं ,कुणाच लेकरु

आपल्या कवेत घेऊन गेला.

कायमची ताटातूट अशी का,करुन गेला.

 

विनवनी एवढीच , आमची तुम्हाला,

या विळख्यातून सोडवा आम्हाला.

पुन्हा नका असे घेऊ , कवेत कुणाला,

खूप वर्षे लागतात हो, यातून सावरायला !!

              - धनाजी माने ....✍️

                



राजभवनातील ती अविस्मरणीय भेट... आज आठवणींमध्ये जिवंत झालेले, दादा !

  "राजभवनातील ती अविस्मरणीय भेट...आज आठवणींमध्ये जिवंत झालेले  डॉ. डी. वाय. पाटील ( दादा )" =============================== 🙏भावप...