Friday, January 12, 2024

स्वयंभू हनुमान प्राणप्रतिष्ठापणा ...


 





धनाजी माने....✍️ -सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यातील इटकरे गावामधील जागरूक देवस्थान श्री स्वयंभू हनुमान प्राणप्रतिष्ठापणा प्रभू श्रीराम, लक्ष्मण व सीतामाई मूर्ती प्रतिष्ठापणा श्री हनुमान मंदिर परिसर सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा सांगली जिल्ह्याचे डेप्युटी कलेक्टर दीपक शिंदे साहेब यांच्या हस्ते पार पडला.

 श्री हनुमान मंदिर कामाचा भव्य लोकार्पण सोहळानिमित्त.हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. तालुक्यातील सर्व भजनी मंडळही या कार्यक्रमासाठी उपस्थीत होते.

पहिल्या  दिवशी ( दि.७ ) श्री हनुमान,श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई मुर्तीची टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य अशी मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. दुसऱ्या दिवशी ( दि.८) धार्मिक विधी होम, हवन, पुजन. आणि श्री. डॉ. नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांचे प्रवचन आणि महाआरती करणेत आली. संध्याकाळी आलेल्या सर्व  भक्तासाठी गावकऱ्यांनी गावकऱ्यांसाठी महाप्रसादाचे  आयोजन केले.

या सोहळ्यासाठी सांगली ,सातारा  ,कोल्हापूर जिल्ह्यातील परिसरातील हजारो भाविक भक्त उपस्थित होते .


वैशिष्ट्ये :-

  • या सर्व सुशोभीकरणसाठी आणि भव्यमंदिर उभारणीसाठी सर्व ग्रामस्थ आणि देणगीदार तसेच ओम क्रांती  तरुण मंडळाचे कार्यकर्ते, श्री हनुमान मंदिर सुशोभीकरण समितीचे कार्यकर्ते यांनी अहोरात्र कष्ट करून हे भव्य मंदिर उभारले आहे.

  • या सर्व कामासाठी सर्व ग्रामस्थांनी या धार्मिक कामात हिरहिरीने भाग घेतला अनेक तरुणांनी या कामासाठी आपले श्रमदान केले. अनेकांनी हजार रुपये पासून लाखो रुपये देणगी दिली.

  •  मोबाईल शौकिनांसाठी मंदिराच्या प्रांगणामध्ये सेल्फी पॉईंट .

  •  लहान मुलांना मनोरंजनासाठी भव्य लॉन.

  •  वयोवृंदासाठी  विरंगुळा कट्टे उभारण्यात आलेले आहेत.

  • आयुष्यातील सुखदुःख शेअर करण्यासाठी मोठे वडाचे झाड लावून त्या भोवती पाराची बांधणी केली आहे.

  • धनाजी माने......✍️


No comments:

भैरवनाथ यात्रा अंकोली ता.मोहोळ जि.सोलापूर

भैरवनाथाच्या नावानं चांगभल....... #मोहोळ तालुक्यातील मौजे #अंकोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी शुक्रवार ...