भैरेवाडीचा मोठा वक्ता - छोटा प्रसाद जेव्हा......
वेळ दुपारची , ठिकाण जायंटस् हॉल #आष्टा
' भुमिपुत्रांच्या यशोगाथा ' #पुस्तक प्रकाशन सोहळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडीचा पट्टीचा मोठा #वक्ता छोटा प्रसाद संजय जाधव मुर्ती लहान पण किर्ती महान याची जेव्हा भेट होते ... खरचं प्रसादच्या सान्निध्यात काही वेळ घालवला की त्यांच्या बुद्धिमत्तेची चुनूक नेमकी समजते.
बोलण्यात पटाईत असणारा. विविध कला- गुणांची देणगी लाभलेला #प्रसाद .
प्रसादचे 'राजे #छत्रपती शिवाजी महाराज ' यांच्यावरील भाषण ऐकले ..… तेव्हा ते ऐकतच रहावे असे वाटले. त्याचे भाषण ऐकून सारेच प्रभावित झाले.
विशेषतः राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माननीय #जयंतराव पाटील साहेब यांनी तर त्याला जवळ घेऊन त्याची मुलाखतच घेतली आणि ते तर हसतमुख होऊन त्याच्याशी बोलतच राहिले.आपल्या व्यस्त कार्यक्रमातही सर्वांनपेक्षा जास्तीत - जास्त वेळ साहेबांनी त्याच्याशी गप्पा मारण्यासाठी दिला.त्याची खूप आपुलकीने चौकशी केली.प्रसादने जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अनेक क्रमांक मिळवले आहेत.
त्याला विज्ञान विषयाचीही खूप आवड आहे. त्याने स्मार्ट #हेल्मेट ,क्लॅप स्वीच अशी वैविध्यपूर्ण उपकरणे शिक्षकांच्या मदतीने स्वतः तयार केली आहेत.
८वी मद्धे शिकणारा प्रसाद हा १४ वर्षाचा असला तरी त्याची शारीरिक वाढ वयानुसार झाली नाही नियतीने त्याला या डावात मात्र थोडं मागे ठेवले आहे ,पण....यावर तो हताश न होता सर्वासमोर हसतमुख राहून तल्लख बुद्धिमत्तेच्या व बारीक निरीक्षणाच्या जोरावर, आपल्या #वक्तृत्वाने आणि बोलण्याच्या शैलीने सर्वांची मन जिंकतो.
त्याला वाचनाचेही वेड आहे हे त्याच्या पुढील वाक्यावरुन मला जाणवले. त्याने ' भूमिपुत्रांची #यशोगाथा ' आजच प्रकाशित झालेले #पुस्तक दाखवत तो मला म्हणाला " या पुस्तकात तुमचाही फोटो आहे , तुम्ही #शिक्षक आहात .... " हे वाक्य ऐकल आणि मी अचंबितच झालो.🤔
कारण प्रकाशनानंतर त्याने बसल्या- बसल्या
हे पुस्तक पाहिले असावे. आणि त्यातील त्याने फोटो पाहून चेहरे हेरले होते .त्या पुस्तकातील त्याने काहींच्या यशोगाथा पाहिल्या असाव्यात हे त्याच्या त्या प्रश्नावरून जाणवले.त्याचे हे सुक्ष्म निरीक्षण खरचं अचंबीत करणारे होते.
#राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतराव पाटील साहेब यांनी तर
" बेटा ,भविष्यात तुला खूप यश मिळो ! तू खूप -खूप मोठा हो ! तुला असेच यश मिळत राहो !"
असे आशीर्वाद प्रसाद यास दिले आणि त्याचा निरोप घेवून साहेब पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.
दरम्यान अनेकांनी त्याच्याशी गप्पा मारल्या , सोबत फोटो घेतले.मी ही त्याच्याशी गप्पा मारल्या त्याच्याशी त्या गप्पा तशाच सुरु असाव्यात अस वाटत होत.पण शेवटी त्याचा निरोप घेतला, तो त्याच्या आई- बाबांनसोबत त्याच्या गावी निघून गेला आणि मी माझ्या घराकडे प्रवास सुरु केला.पण तो दिवस बरच काही सांगून गेला. प्रसादची #प्रेरणा आणि त्याच्या आठवणी मनात रुंजी घालतच राहिल्या.
या आठवणी कुठेतरी नेहमीच स्मरणात राहाव्यात म्हणूनच त्याच्या या आठवणी शब्दबद्ध कराव्या वाटल्या.आपल्या सर्वांनाही त्या वाटाव्या वाटल्या , कारण प्रसाद मला #ग्रेट वाटला , तुम्हालाही नक्की वाटेल.तो कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हालाही भेटला तर जरुर त्याच्याशी गप्पा मारा.त्याच्या त्या गप्पातून जीवन जगण्यासाठी एक नवी #ऊर्जा मिळाल्याची अनुभूती तुम्हाला ही जानवेल !
एकूणच ...जिद्द व चिकाटीसोबत मनात दुर्दम्य आशावाद असेल तर कोणतीही परिस्थिती आपल्या मार्गात अडथळा बनू शकत नाही. या जगात अशक्य अस काहीच नाही, हेच जणू प्रसाद साऱ्यांना दाखवून प्रेरणा देतोय.
तो आपल्या शारीरिक परिस्थितीचे , खुजेपणाचे कधीही #भांडवल न करता , उलट या परिस्थितीमुळेच त्याला झगडण्याची, लढण्याची प्रेरणा मिळतेय. हाच #संदेश तो सर्वाना हसतमुखाने देत राहतोय असच वाटतं .
खरच प्रसाद जिथे जातो , तिथे सर्वांना जिंकतो.त्याच्या संभाषण चातुर्यासमोर आणि सदैव हसतमुख व्यक्तीमत्वासमोर त्याच शारिरीक खुजेपण हारुन जातं , तेच त्याचे खुजेपण त्याच्या जिद्दीसमोर खुज होऊन लोळण घेतं आणि प्रसादचे हेच मोठेपण सर्वांच्या मनावर #रूंजी घालत राहते हे नक्की.
- धनाजी माने.....✍️




2 comments:
आपल्या लेखनाचा विषय झाला
आज हा लेखणीचा प्रसाद झाला.
लाभो आयुष्य यश किर्ती.
वक्तव्याचा नवा तो सुर्य व्हावा.
🙏🙏🙏
Post a Comment