( आज सभोवताली समाजात पाहिलं तर ,अनेक क्षेत्रातील लोकांना विविध समस्या आहेत यात शेतकरी,शिक्षक ,पोलीस,व्यावसायिक, विविध क्षेत्रातील खाजगी कर्मचारी अशा अनेक घटकांच्या विविध समस्या आहेत......निसर्गाच्या ल री लाटा माणसाला त्याच्याच चुकानमुळे सहन कराव्या लागत आहे.तरुणाईच्या समस्याही आहेत.
यातील फक्त काही समस्या मांडण्याचा हा प्रपंच एवढचं........)
थोडा जागर मांडला आहे.....✍️
जो तो जगतो आहे आपल्याच कोशात
आणि आपल्याच विश्वात.
अनेक समस्या आणि दुःख आहेत,
माणसामाणसात आणि समाजात ,
कुणालाच कुणाच देणंघेणं उरल नाही.
आणि आपल्याच विश्वात.
अनेक समस्या आणि दुःख आहेत,
माणसामाणसात आणि समाजात ,
कुणालाच कुणाच देणंघेणं उरल नाही.
जो तो दंग आहे ,आपलाच कोश घट्ट विणण्यात.
शेतकरी असो वा शिक्षक,
पोलीस असो वा पूरग्रस्त
असे सारेच आहेत समस्याग्रस्त .
पोलीस असो वा पूरग्रस्त
असे सारेच आहेत समस्याग्रस्त .
वाट्याला यावेत चार दिवस सुखाचे,
आपल्याबरोबरच,आपल्या मुलाचे.
आणि पिढ्यानपिढ्या वाढलेला,
कर्जाचा डोंगर कमी होऊन ,
शांत झोप लागावी यासाठी ,
लढाई आजूनही सुरूच आहे बळीराजाची.
आपल्याबरोबरच,आपल्या मुलाचे.
आणि पिढ्यानपिढ्या वाढलेला,
कर्जाचा डोंगर कमी होऊन ,
शांत झोप लागावी यासाठी ,
लढाई आजूनही सुरूच आहे बळीराजाची.
तो समस्यांचा पाढा बोंबलून पाहतो,
दारे ठोठावून पाहतो,
तरी त्याच्या समस्या कधी सुटल्याच नाही.
तरी त्याच्या समस्या कधी सुटल्याच नाही.
कधी त्याने स्वतःला दोरीत लटकवूनही घेतले.
तरीही त्याचे प्रश्न , कधी नाही सुटले।
चार दिवस त्याच्या मरण्याचे अन्,
सांत्वनाचे फोटोसेशन झाले.........
पुढच्या पिढीच्या वाट्याला मात्र,
बाप गेल्याचे आणि बोंबलून- बोंबलून
हात गेल्याचे दुःखच वाट्याला आले.
सांत्वनाचे फोटोसेशन झाले.........
पुढच्या पिढीच्या वाट्याला मात्र,
बाप गेल्याचे आणि बोंबलून- बोंबलून
हात गेल्याचे दुःखच वाट्याला आले.
तरीही सारेच कसे मशगुल आहेत ...
आपल्याच कोशात आणि आपल्याच विश्वात !
शिक्षक सुद्धा आंदोलन करत,
रस्त्यावर उतरतात.
आम्हाला 'फक्त शिकऊ द्या ! '
म्हणत लढाई- लढत राहतात.
ना पदांची भरती होत आहे ,
ना अतिरिक्त कामाचा ताण .
सारे असे आलबेल सुरु आहे.
आम्हाला 'फक्त शिकऊ द्या ! '
म्हणत लढाई- लढत राहतात.
ना पदांची भरती होत आहे ,
ना अतिरिक्त कामाचा ताण .
सारे असे आलबेल सुरु आहे.
शिक्षकांच्या बदनामीचे
षडयंत्र सुरुच आहे .
शिकवण सोडून,इतर कामातच,
गुरुजींना गुंतुन ठेवलं जातयं.
गोरगरिबांच्या शिक्षणाचा,
शिकवण सोडून,इतर कामातच,
गुरुजींना गुंतुन ठेवलं जातयं.
गोरगरिबांच्या शिक्षणाचा,
खेळखंडोबा मात्र सुरुच आहे.
सारेच कसे झोपलेत की,
झोपेचे सोंग घेतलयं कळत नाही.
वाडी- वस्तीवरील मुलांच्या,
शिक्षणाची हेळसांड
झोपेचे सोंग घेतलयं कळत नाही.
वाडी- वस्तीवरील मुलांच्या,
शिक्षणाची हेळसांड
भरतीविना सुरूच आहे.
तरीही सारेच मशगुल आहेत आपल्याच
कोशात आणि आपल्याच विश्वात.......
तरीही सारेच मशगुल आहेत आपल्याच
कोशात आणि आपल्याच विश्वात.......
ज्यांनी कोरोणाच्या काळात ,
देवदूत म्हणून काम पाहिलं.
ते पोलीस तर कुठे ,
समस्यान पासून दूर आहेत ?
अतिरिक्त कामाच्या ताणाने तेही पुरे पिचलेत.
देवदूत म्हणून काम पाहिलं.
ते पोलीस तर कुठे ,
समस्यान पासून दूर आहेत ?
अतिरिक्त कामाच्या ताणाने तेही पुरे पिचलेत.
चार क्षण आपल्या लेकरा-बाळांच्यात असावेत,
गोरगरीब दिनदुबळ्यांच्या सेवेसाठी ,
आपलेही दिवस खर्ची पडावेत
यासाठी तेही खूप आतुरलेत .....
समाजात फिरा ,नाहीतर रस्त्यावर फिरा.
समस्यांचे खड्डे काही मुजत नाहीत.
तरुणांच्या पिढ्या कामाविना भटकत आहेत.
व्यसनांच्या जंजाळात मात्र , ते अडकत आहेत.
कधी अवेळी पाऊस पडतो आहे.
तर कधी दुष्काळही पडतो आहे.
विकासाच्या नावाखाली ,
निसर्गावर अतिक्रमण सुरु आहे.
समस्यांच्या पाढ्यांचा ,
हा पाढा ........
न संपणारा असला तरी ,
समस्यांचा हा .....थोडा जागर मांडला आहे एवढचं.
समस्यांचा हा .....थोडा जागर मांडला आहे एवढचं.
- धनाजी माने.....✍️
dhanajimane.blogspot.com
dhanajimane.blogspot.com

1 comment:
👍👍
Post a Comment