भारतीय सैनिकाचा बराच मोठा काळ कठोर प्रशिक्षणात जातो. त्यानंतर खऱ्या सेवेला सुरुवात होते. कुटूंबातील सर्व सदस्यांचा बहुतांश काळ त्याग करावा लागतो. भारतातील प्रत्येक सैनिक आपल्या भारतमातेला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आणि प्राणापेक्षा प्रिय मानतो. तो जन्मभूमीला आपली आई मानतो. तिचा सन्मान आणि अभिमानाचे रक्षण करण्यासाठी तो आपला जीव धोक्यात घालत असतो. प्रत्येक भारतीय सैनिक प्रेमाने भरलेला आहे. ती शौर्याची खरी मूर्ती आहे. धैर्य आणि त्याग त्यांच्या रक्तात आहे. तो देशाची सेवा करण्यासाठी घर, नातेवाईकांपासून दूर निघून जातो. खरोखर, आपल्या सैनिकांमुळेच, शत्रू देशाकडे डोळा वर करूनही पाहू शकत नाही.
त्यांच्या शौर्यामुळेच आपण आपल्या कुटुंबात आनंदाने जगत असतो.
तो देशासाठी आपल्या प्राणाची बाजी लावतो, अशाच शहीद सैनिकाने आपल्या , मातेला वीरमरणानंतर दिलेला आधार......😥
शहीद जवान! तुझे सलाम!!
वीरमाता तू सावर स्वतःला
मी गेलोय आता दुरच्या गावाला,
परत कधीच न येण्याचा प्रवासाला..........
मी गेलोय आता दुरच्या गावाला,
परत कधीच न येण्याचा प्रवासाला..........
लेकरांन समोर आता ,
आसवं ढाळू नको,
खचून इतकी तू जावू नको.
सैनिकाची माय तू ,कुटूंबाचा आधार तू.
वीरमाता तू आता सावर स्वतःला .
खचून इतकी तू जावू नको.
सैनिकाची माय तू ,कुटूंबाचा आधार तू.
वीरमाता तू आता सावर स्वतःला .
आता तुलाच खंबीर ,
व्हायला पाहिजे.
दु:ख ऊरात दाबून ,
धीराने तोंड द्यायला पाहिजे.
हे माते तुला सावरायला पाहिजे.
व्हायला पाहिजे.
दु:ख ऊरात दाबून ,
धीराने तोंड द्यायला पाहिजे.
हे माते तुला सावरायला पाहिजे.
बापाविना पोरकी माझी लेकरं,
त्यांचा बाप आता ,तुलाच व्हायला पाहिजे.
तुझ्या सुनेलाही आधार,
आता तुलाच द्यायला पाहिजे.
वीरमाता तू ,आता तुला सावरायला पाहिजे.
त्यांचा बाप आता ,तुलाच व्हायला पाहिजे.
तुझ्या सुनेलाही आधार,
आता तुलाच द्यायला पाहिजे.
वीरमाता तू ,आता तुला सावरायला पाहिजे.
मुलं माझी ,पोरकी झाली बापा विना .
बाप माझा ,पोरका झाला मुला विना .
वीरपत्नी विधवा झाली माझ्या विना.
या सर्वांना आता,तूच आधार द्यायला हवा.
वीरमाता तू,हा भार सारा तूलाच वहायला हवा......
बाप माझा ,पोरका झाला मुला विना .
वीरपत्नी विधवा झाली माझ्या विना.
या सर्वांना आता,तूच आधार द्यायला हवा.
वीरमाता तू,हा भार सारा तूलाच वहायला हवा......
तूला हे सांगताना ,ऊर माझा भरून येतोयं,
डोळ्यातून झरुन येतोयं,
तुमच्यापासून दूर जाताना,
जीव कासावीस होतोयं.
तरीही मला अभिमान वाटतोयं,
देशाची सेवा बजावतानाच , मी दूर चाललोयं
परत कधीच न येण्याच्या प्रवासाला...
-धनाजी माने...✍️

1 comment:
👌👌👌👌👌
Post a Comment