Saturday, May 15, 2021

कोराणा लढा आणि तरुणांचे क्रांतीकारी पाऊल !




ॐ क्रांती  तरुण मंडळाच्या ,तरुणांनी एक क्रांतिकारी उपक्रम सुरु  करुण क्रांतीकारी पाऊल उचलले आहे

हा नवतरुणांचा उपक्रम कोरोणाच्या प्रवासात गांवागांवातील तरुण  मंडळांना मैलाचा दगड ठरणार आहे.
कोरोणाच्या महामारीत निर्माण झालेल्या आणिबाणीच्या परिस्थितीत या तरुणांनी गावातील ग्रामपंचायत ,कोरोणा कमेटीवर अवलंबून न राहता स्वतःच्या कष्टाच्या मिळकतीमधून पैसा खर्च करुण हे तरुण आठवड्याला हैड्रोक्लोराईड जतूंनाशकांची फवारणी करत आहेत.आपल्यापरीने खारीचा वाटा उचलत आहेत.
या उपक्रमात रघुनाथ पाटील,अक्षय पाटील,दत्तात्रय पाटील ,सयाजी पाटील ,प्रशांत नरके,गजानन पाटील,सुशांत पाटील,जयदीप पाटील,विजय पाटील,सचिन पाटील,घनश्याम नरके,सागर पाटील, सुशांत पाटील,अभिजित पाटील,राहुल पाटील,दिगंबर पाटील,मनोज पाटील,रणजीत पाटील हे क्रांती ग्रुपचे लढवय्ये योद्धे हिरहिरीने या कामात आपला अमुल्य वेळ देत आहेत.
या त्यांच्या उपक्रमाच्या मागे एकच विधायक विचार आहे.
'गड्या आपला गाव कोरोणामुक्त राहिला पाहिजे.
आणि गाव - गाड्यातील आपल्या जीवाभावाच्या माणसांचा जीव वाचला पाहिजे. '
कारण याच क्रांती चौकात , गतवर्षी एकाला ,आणि यावर्षी दोघांना कोरोणामुळे प्राण गमवावे लागले आहेत.
हा चौक सोडूनही गावातील अनेकजणांना कोरोणाची बाधा झाली आहे.तर काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
आज कोरोनामुळे लॉकडाऊनचे चक्र कधी सुरु तर कधी बंद यामुळे सर्वच क्षेत्रातील कामकाज अगदी ठप्प आहे. तरुणांच्या हाताला काम नाही . तर अनेकांचे असलेले कामही गेले आहे.अशा हताश परिस्थितीही हताश न होता  या तरुणांनी समाजाच्या हिताच्या दृष्टीने , गावाच्या संरक्षणाच्या दृष्टीने टाकलेले हे क्रांतीकारी पाऊल विधायकतेची मशाल पेटवेल.
व इटकरे गावातील व इतर मंडळे आणि महाराष्ट्रातील इतर मंडळही ही मशाल अशीच तेवत ठेवतील.या मशालींचा वणवा पेटेल आणि कोरोणाचा समुळ नायनाट होईल अशी आशा करुया !
गावगाड्यातील आपल्या जीवाभावाचा प्रत्येक माणूस सुरक्षित राहील याची काळजी घेऊया.
कारण आज अत्यावश्यक असे काहीच नाही .
जीव वाचणे एवढेच म्हत्वाचे आहे.
📌 कोरोणा वाढतोयं ! काळजी घेऊया !!
📌 नियम पाळुया ,सुरक्षित राहुया !!
📌 काळजी करु नका.आधार देत राहुया !!
📌हसत रहा ! होईल सर्व ठीक !
📌 खबरदारी हीच ,आपली जबाबदारी !
📌 भेटता येत नसले ,तरी आपल्या माणसांना
फोन करा ,बोला आधार द्या!
📌 त्याचीच आज नितांत गरज आहे.
📌 कोरोणाने बरेच काही शिकवले आहे.
प्रतिष्ठा,जात ,धर्म ,इगो, सारे गौण आहे.माणसाने- माणसाशी - माणसासम वागणेच सर्वश्रेष्ठ आहे.
📌 आपला दिवस आनंदात जावो !!!

- धनाजी   माने ....✍️


📧dhanajimane123@gmail.com

https://youtube.com/channel/UC7IKD6ZKYNfw2W7E19Dcn_w








No comments:

भैरवनाथ यात्रा अंकोली ता.मोहोळ जि.सोलापूर

भैरवनाथाच्या नावानं चांगभल....... #मोहोळ तालुक्यातील मौजे #अंकोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी शुक्रवार ...