Friday, May 14, 2021

😥।।वरुणराजा ।।😥

 😭😭

पृथ्वीतलावर येणा-या अनेक पाहुण्यांपैकी पावसाळा हा सर्वाचा सगळ्यात आवडता ऋतू. परंतु, एखाद्या पाहुण्याने अनेक दिवस ठाण मांडल्यावर तो जसा नकोसा होतो, तसाच अती झालेला पाऊसही आता लोकांना नकोसा झाला आहे.

 ‘काही ठिकाणी ये रे ये रे पावसा’ म्हणण्याची तर ‘काही ठिकाणी  ‘जा रे जा रे पावसा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

कुठे महापूराचे  अस्मानी संकट,तर कुठे दुबार पेरणीचे संकट सार आभाळचं फाटलं ,तर ठिगळ लावायचे कोठे❓........✍️







😥।।वरुणराजा ।।😥

बस कर आत्ता पुरे झाले,
तुझे बरसने मला अजिर्ण झाले.
यायला सांगितले म्हणून,
असे यायचे का ?
होते - नव्हते तेवढे !
सोबत घेऊन जायचे का?

नव्हतास तेव्हा,
डोळे लावून बसलो.
काही दिवस समाधान देऊन गेलास,
आणि..... इतकं बरसलास ,
होत्याच नव्हत करून गेलास.

पंचगंगा , वारणा , कृष्णामाय
तुडुंब भरल्या....
तुझ्यामुळे त्या ,
सोबतं माझा संसार घेऊन गेल्या.
घरदार आणि माझी गुरढोरं...
साऱ्या आपल्या कवेत घेऊन गेल्या.

काही गरिबीचे ओझे घेऊन,
आयुष्यभर जगले.
तुझ्या अतिबरसण्याने,
मातीखालीच गढून गेले.
चार-दोन माणस, राहिली गावात.
काही मात्र कायमचेच निघून गेले.


सारेजण आता तुझ्या जाण्याच्या,
प्रतिक्षेत आहेत.
वरुणराजा आता तू जा,
विश्रांती घे ,विश्रांती घेऊन ये.
पण...असा येऊ नकोस,
सर्वांना धडकी अशी भरवू नकोस.

बस कर आत्ता पुरे झाले,
पुरे झाले.......
तुझे बरसने मला,
अजिर्ण झाले , अजिर्ण झाले .

- धनाजी माने....✍️


3 comments:

VIVEK MANTHAN - विवेक मंथन said...

खूप छान आहे👌👌👌💐💐💐

Unknown said...

👌👌👍👍👍सुंदर लेखन..

Unknown said...

खूप छान कविता

भैरवनाथ यात्रा अंकोली ता.मोहोळ जि.सोलापूर

भैरवनाथाच्या नावानं चांगभल....... #मोहोळ तालुक्यातील मौजे #अंकोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी शुक्रवार ...