Saturday, September 28, 2024
शिक्षकांचा आक्रोश मोर्चा.....
Saturday, August 10, 2024
वास्तव......
वास्तव....
वर्षे ७५ होऊन गेली ,
#स्वातंत्र्य मिळून देशाला
समस्या अजूनही त्याच आहेत,
सर्वांच्याच वाट्याला.
रस्त्यावरून जाताना ,
#खड्डे अजूनही तसेच आहेत .
#पैसे मात्र रस्त्यांवरती ,
भरमसाठ #खर्च झाले आहेत.
तरुणांचे लोंढेच्या -लोंढे ,
शिकून बाहेर पडत आहेत .
नोकऱ्यांचे प्रश्न मात्र ,
आवासून उभे आहेत.
बळीराजाने केले कितीही #कष्ट ,
तो ,आहे तिथेच आहे .
शेतीमालाच्या योग्य भावासाठी ,
#लढा त्याचा सुरुच आहे.
#पाऊस बरसतो , #पूर येतो ,
पाण्याचा प्रश्न निर्माण होतो ,
#पूरग्रस्तांच्या समस्यांचा #पाढा ,
आहे तसाच सुरु आहे.
नोकरीमद्धेही #घोटाळे,सुरुच आहेत.
चुकीचे दाखले जोडून ,
खरे -खुरे #लाभार्थी ,
बाजूला फेकले जात आहेत.
नोकरीवरती #पोट ज्याचे ,
तोही अजून लढतोच आहे.
#जुन्या - पेन्शनसाठी ,
त्याचाही #आक्रोश सुरु आहे.
राजकारणात राजकारण्यांची ,
स्पर्धा मोठी सुरु आहे .
विकासावरती बोलण्यापेक्षा ,
टिका -टिप्पणीच सुरु आहे.
समस्यांचे गुंते ... वाढत चाललेत,
चार दिवस सुखाचे ,
नशीबी आपल्या यावेत ,
याच प्रतिक्षेत सारे आहेत.
- धनाजी माने...✍️
Sunday, February 25, 2024
पद्मविभूषण वसंत व्याख्यानमाला ' - वर्ष ३५ वे
'पद्मविभूषण वसंत व्याख्यानमाला ' - वर्ष ३५ वे
धनाजी माने दि.२६ - मार्च महिना आला की या परिसरातील लोकांना आठवण होते ती येडेनिपाणीच्या ' पद्मविभूषण वसंत व्याख्यानमालेची '...
मार्च महिन्याच्या सुरुवातीला येडेनिपाणी (ता.वाळवा) या पी.सावळाराम यांच्या नगरीत आसमंतात एक सुखद गारवा भरून राहिलेला असतो. अशा या उल्हासित वातावरणात येडेनिपाणी येथील संस्कार मंदिराजवळील बाजारपेठेचे मैदान दि.१ मार्च ते ५ मार्च, सायंकाळी ७ ते रात्री ९ श्रोत्यांच्या उपस्थितीने फुलून गेलेले असते. पाच दिवस श्रवणभक्तीची आस असलेले या परिसरातील श्रोते ज्ञानरसांच्या तुषारात अक्षरशः न्हाऊन निघतात.
येडेनिपाणी येथील जय किसान तरुण मंडळाची ‘पद्मविभूषण वसंत व्याख्यानमाला’ म्हणजे गेली ३५ वर्ष अविरतपणे चाललेला एक ज्ञानयज्ञ.जवळ जवळ तीसऱ्या तपाच्या अंतिम टप्प्यात असणारी ही व्याख्यानमाला १ मार्च पासून सुरु होते आहे.
या ज्ञानयज्ञातून या गावातील ,परिसरातील अनेक पिढ्या वैचारिकदृष्ट्या समृद्ध झाल्या. अक्षय विचारांचे समृद्ध धन मुक्तपणे या व्यासपीठाद्वारे समाजात संक्रमित झाले. विविध विषयातील अभ्यासकांनी श्रोत्यांचं अवघं विचारविश्व ढवळून काढलं. श्रवणभक्तीतील तल्लीनता काय असते याची प्रचिती या व्याख्यानमालेस उपस्थित राहिल्यावरच अनुभवायला मिळते. महाराष्ट्रातील नामांकित वक्त्यांनी आपल्या ज्ञानाचे भांडार येथे रिते केले. व्याख्यानमालेने आपल्या या दीर्घ प्रवासात श्रोत्यांना अक्षरशः घडवले आहे. आजच्या बदलत्या अभिरूचीच्या जगात विचारांचा हा जागर अखंडपणे सुरु ठेवणं हे देखील एक आव्हान आहे. आणि हे शक्य झालं आहे ते मंडळाच्या निस्पृह कार्यकर्त्यांमुळे.
जय किसान मंडळाचे संस्थापक माननीय आनंदराव पाटील (काका)अध्यक्ष प्रा.डॉ. दीपक स्वामी, संयोजक शंकर पाटील ,सचिव कालिदास पाटील ,सहसंयोजक प्रा.स्वप्निल पाटील यांच्याबरोबरच या व्याख्यानमालेसाठी बाळकृष्ण पाटील, सचिन शेवाळे, शिवानंद माळी, कविता पाटील, जयश्री पाटील ,हिंदुराव रसाळ ,शरद घाडगे, मयूर थोरात, अरुण पाटील, विद्याराणी शेवाळे ,विजय पाटील, नंदकुमार बनसोडे ,जयसिंग पाटील ,कुंडलिक कोळी, अर्जुन थोरात, धोंडीराम पाटील ,दिनकर पाटील, सतीश पाटील ,शंकर गोपाळ पाटील, सतीश कांबळे, प्रा.संजय थोरात हे सर्वजण निस्पृह भावनेने हा ज्ञानयज्ञ अखंडपणे सुरू राहावा या प्रामाणिक भावनेने यासाठी झटत असतात.
संस्थापक आनंदराव पाटील ( काका) व प्रा.डॉ. दीपक स्वामी यांनी लावलेल्या या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. या वटवृक्षाला असाच बहर येत राहो याच साऱ्या शुभेच्छा !
♨️ ३५ व्या व्याख्यानमालेचे उद्घाटन -
१ मार्च रोजी जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख (भाऊ) यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक विशाल पाटील, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील-साखराळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
♨️ २०२४-या वर्षीचे व्याख्यानमालेतील वक्ते आणि विषय ⤵️
,🎤 १ मार्च -इतिहास संशोधक प्रा. अरुण घोडके इस्लामपूर यांचे 'असे होते शिवशंभू संभाजीराजे'
🎤 २ मार्च- 'संस्कार : काळाची गरज' या विषयावर प्रा. डॉ. शोभा लोहार (सातारा)
🎤 ३ मार्च- 'घराचे घरपण... गावाचं गावपण टिकवूया' या विषयावर ज्येष्ठ पत्रकार दत्ता थोरे ( सोलापूर)
🎤 ४ मार्च - 'कविता नात्या-गोत्याच्या' अरुण पवार (परळी वैजनाथ)
🎤 दि. ५ मार्च - 'लोकशाहीच्या प्रवासाची दिशा व सद्य:स्थिती' या विषयावर विधी तज्ज्ञ व संविधान विश्लेषक असीम सरोदे (पुणे) यांच्या व्याख्यानाने व्याख्यानमालेची सांगता होणार आहे.
⏰वेळ - दररोज सायंकाळी -७ वा.
💢 ठिकाण - संस्कार मंदिरा जवळील मैदान , येडेनिपाणी
- धनाजी माने....✍️
आगळा वेगळा लग्नसोहळा....
शिवविवाह सोहळा ...मोरे -कारंडे कुटूंबियांचा.....
छत्रपती शिवाजी महाराज आणि माता जिजाऊ यांच्या जयघोषात रविवारी एक विवाह सोहळा पार पडला
' शिवविवाह सोहळा 'जो मी आयुष्यात या भागातील हा लग्नसोहळा पहिल्यांदाच अनुभवला आणि उपस्थित असणाऱ्या या परिसरातील लोकांनाही हा असा विवाह सोहळा पाहिल्यांदाच पाहण्याचा दुर्मिळ योग आला असावा.
आपण आजपर्यंत जे अनेक विवाह सोहळे पाहिले ते विविध कर्मकांडामद्धे अडकलेले विवाह सोहळे पाहिले.
यामध्ये अंगावर हळद लावणे / ओतणे , अक्षताच्या नावाखाली वधू- वरांवरती अक्षता टाकणे भटजीला तांदूळ मारणे . विषारी फोमचे स्प्रे मारणे .पारंपरिक मंगलाष्टका म्हणने ,होम हवन ,सप्तपदी अशा वातावरणात पार पडणारे विवाह आजपर्यंतआपण पाहिले,आणि पाहत आलो आहोत.
पण या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन , एका वेगळ्या वळणावर घेऊन जाणारा ,चांगल्या संस्काराचे समाजात रोपन करणारा एक आगळावेगळा ' शिवविवाह सोहळा ' याची देही याची डोळा मी या परिसरात आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला.
पुणे-बेंगलोर हायवे जवळील इंदिरा पॅलेस या ठिकाणी त्याचे साक्षीदार होता आले.
खऱ्या अर्थाने दोन कुटुंबांना एकत्र आणणारा आनंद सोहळा असे त्या विवाहाचे स्वरूप होते. त्यामध्ये पारंपरिक काव्याक्षता नव्हत्या की वधु-वरावरती अक्षता टाकने नव्हते.पारंपरिक मंगलाष्टका म्हणने नव्हते. तर...
शिवविवाह पद्धतीच्या रचलेल्या आणि विवाहाचा त्यातील बंधनांचा अर्थ सांगणाऱ्या काव्याक्षता होत्या.
व्यासपीठावरुन आपण ज्यांचा इतिहास सांगतो , वैचारिक वारसा सांगतो त्या जिजाऊमाता ,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले.
निमित्त होत शिवश्री इंजिनिअर विक्रांत व शिवमती इंजिनिअर सोनल यांच्या विवाह सोहळ्याचे.
हा विवाह सोहळा होता ,या परिसरातील अभियंते महेश मोरे यांच्या मुलाचा तर उद्योजक जयंत मोरे यांच्या पुतण्याचा हा विवाह कोल्हापूर जिल्ह्यातील कोपार्डे येथील कारंडे कुटुंबातील वधु सोनल यांच्याशी पार पडला.
आदरणीय स्व.संपतराव मोरे व आदरणीय माई या प्राथमिक शिक्षक दांपत्यांच्या पोटी ... वर पिता महेश मोरे यांचा जन्म, त्यांच्या संस्काराची शिदोरी ते आजपर्यंत जपत आले आणि त्या संस्कारांच्या जडणघडणीतून घडलेल्या संस्काराचे संस्कारक्षम फलित म्हणजे हा विवाह सोहळा होता असेच म्हणावे लागेल !
या विवाह सोहळ्याचे साक्षीदार होताना एक वेगळाच आनंद देणारा अनुभव येत होता. क्षणाक्षणाला घडणाऱ्या विवाह सोहळ्यातील प्रसंगाने, उपस्थितांच्या मनावर विधायक संस्कारांची पेरणी होत होती.
तुतारीच्या रोमांचकारी वाद्यांच्या गजरात राजमाता जिजाऊ आणि छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला नव वधूवरांनी हार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ यांच्या नवाचा जयघोष झाला ! .....चैतन्याचा, आनंदाला भरते आनणारा सोहळा या पहिल्याच प्रसंगाने सुरु झाला.
' जिजाऊ माऊली घे... ही तुला वंदना....जय जय जिजाऊ ......च्या स्वरात जिजाऊ वंदना पार पडली.
इतिहासातील या महान व्यंक्तिच्या मानवंदनेनंतर....
ज्यांनी या वधू-वरांना इथपर्यंत पोहचवण्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतले ,संस्कारीत केले त्या कुटुंबातील व्यक्तीचा सन्मान केला गेला.
प्रथम मान मुलीकडच्या नातेवाईकांना देण्यात आला.मुलीचे आजी -आजोबा, आई -वडिल चुलते - चुलती ,भाऊ, बहिण दाजी यानंतर
मुलाचे आजी -आजोबा, आई -वडिल, चुलते - चुलती भाऊ, बहिण दाजी या सर्वांची ओळख उपस्थित हजारो समुदायाला करुन दिली.पुष्प गुच्छ देऊन नातेवाईक यांचा सत्कार करण्यात आला.
वधू- वर सोनल - विक्रांत यांनी वृक्षाला, तुळशी मातेला पाणी घातले , ज्या निसर्गाने आपले पालन पोषण केले त्याचे जणू ऋणच या प्रसंगातून व्यक्त केले.
यानंतर .....।
वधू -वर यांनी एकदुसऱ्याला हार घालत ते विवाहबंधनात बंधित झाले.तसे तुतारींचा आवाज आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.....
वधू- वरांनी उपस्थितांच्या साक्षीने एक दुसऱ्याचा स्वइच्छेने स्वीकार केल्याची व आयुष्याच्या एखाद्या वळणावर मतभेद झाले तर ते समंजसपणे सोडवण्यासाठी प्रयत्न करु व यातूनही नाहीच मिटले मतभेद तर परस्परांशी कसलीही बाधा येणार नाही याची काळजी घेत बाजूला होऊ अशी सर्वांच्या साक्षीने जाहीर शपथ घेतली.... वराने - वधूला मंगळसूत्र घातले.....
आणि शिवसप्तकाला सुरुवात झाली.....
' वंदा...जिजाऊ ,शहाजी या महान व्यक्तींची जरित्रे जपा ....शिवमंगल सत्यध्यान .....(टाळ्या)
या सप्तकाच्या माध्यमातून
सासू -सासरे ,काका ,ननंद ,भावजय ही नाती जपण्याचा...सामाजिकभान ,कर्तव्य करताना चुकू नये.विद्या घेताना विज्ञान व खेळ हेही जपा.व्यसनाधीन होऊ नका.शिवाजींचा आदर्श जपून कर्तृत्व करा....दोघांची हृदये प्रसन्न ठेवा....असे संदेश दिले.
झाले शिवमंगलम् या वाक्याने शिवसप्तक संपले .......टाळ्या झाल्या
वधू व वरांना शिवविवाह दाखला देण्यात आला व वाचन करण्यात आले .......
शिवधर्मपीठ, मातृतीर्थ, सिंदखेड राजा
|| शिवविवाह दाखला ।।
शिवमती सोनल.......आणि शिवश्री विक्रांत यांचा
|| शिवविवाह ।।
शिवशक ३५० रविवार दि. २५/०२/२०२४ रोजी इंदिरा पॅलेस पुणे-बेंगलोर हायवे, वाघवाडी फाटा येथे संपन्न झाला. दाखल्यावरती नव वधु - वरांच्या सह्या घेतल्या गेल्या आणि हा आगळा - वेगळा विवाह सोहळा संपन्न झाला.
एकूणच खऱ्या अर्थाने दोन कुटुंबांना एकत्र आणणारा हा आनंद सोहळा , अगदी शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. अशा या मोरे-कारंडे यांच्या विवाह सोहळ्यातून अनेक चांगले संदेश समाजापर्यंत जातील हे नक्की !
धन्यवाद मोरे आणि कारंडे कुटुंबीयांना त्यांनी अशा विधायक सोहळ्याचे साक्षीदार बनण्याचा योग आनला !
- धनाजी माने......✍️
Saturday, February 24, 2024
माठ आणि माठातील थंडगार पाणी....
🌿माठ आणि माठातील थंडगार पाणी -पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्या घरी मातीची भांडी वापरली जायची. तवा, कढई अशी भांडी जेवण बनवण्यासाठी तर रांजण , माठ, अशी भांडी पाणी साठवण्यासाठी वापरली जायची.उन्हाळा सुरू झाला की, लोक आपल राहतं घर आणि पिण्याचं पाणी कसं थंड ठेवता येईल याचा खूप विचार करतात.या दिवसात थंड पाणी पिल्याने शरीराला खूप आराम मिळतो.उबाळ पाणी पिल की तहान काही भागत नाही.मग काही लोक फ्रीज मद्धे पाणी बॉटल ठेवतात आणि त्याचा आधार घेतात.पण फ्रीजमधील थंड पाणी त्रासही देते. असा अनेकांचा अनुभव आहे.रेफ्रिजरेटरचे पाणी पिण्याचे दुष्परिणाम आपल्या सर्वांना माहीत आहेत. पण तरीही उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी आपला हात थंड पाण्याच्या शोधात फ्रीजकडे जातो. प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये बीपीएन नावाचे केमिकल असते जे आरोग्याला धोकादायक असते. म्हणून शक्य तितका प्लास्टिकचा वापर कमी करा.उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी माठाचा वापर करणं फायदेशीर आहे. पण हे अनेकांना फायदे माहिती नसतात.मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायक फायदे आहेत. ते खास फायदे...♨️ पोट चांगलं राहतंबर्फाचं पाणी किंवा फ्रिजमधील पाणी प्यायल्याने अनेकांना पोटात दुखायला लागतं. घसाही यामुळेंळे खराब होतो. वाताचा त्रासही व्हायला लागतो. पण मातीच्या मडक्यातील पाणी अधिक थंड नसल्याने वात होत नाही. मडक्याला रंग देण्यासाठी गेरुचा वापर केला जातो. गेरु उन्हाळ्यात थंडावा देण्याचं काम करतो.🌿 पुरूषांना मिळतो मोठा फायदापुरुष आणि महिला या दोघांच्याही शरीरात टेस्टोस्टेरोन हे हार्मोन्स असतात. नियमीतपणे मातीच्या मडक्यातील पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती अधिक वाढते. प्लास्टिकच्या बाटलीत पाणी भरुन ठेवल्याने प्लॅस्टिकमधील अशुद्ध गोष्टी एकत्र होतात. त्याचे आपल्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. महत्वाची बाब म्हणजे मातीच्या मडक्यात पाणी साठवून ठेवल्याने आणि ते प्यायल्याने शरीरातील टेस्टोस्टेरोन हार्मोन्समध्ये वाढ होते.♨️ विषारी पदार्थ दूर करतंमातीत अशुद्ध गोष्टींना शुद्ध करण्याचे गुण असतात. त्यामुळे माती पाण्यातील सर्वच विषारी पदार्थांचं शोषण करते. यासोबतच माती पाण्यात असलेल्या सर्वच सूक्ष्म पोषक तत्वांना एकत्र करण्याचं काम करते. त्यामुळे पाण्याचं तापमान संतुलित राहतं. म्हणजे पाणी ना जास्त थंड होत, ना जास्त गरम...🌿 घसा चांगला राहतोउन्हाळ्यात फ्रिजचं थंड पाणी प्यायल्याने घसा आणि शरीरावर मोठा प्रभाव पडतो. थंड पाणी प्यायल्याने घशातील पेशींचे तापमान कमी होते आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. थंड पाणी प्यायल्याने घशातील ग्रंथींवर सूज येते. पण मातीच्या मडक्यातील पाणी प्यायल्याने असे काही होत नाही.थोडक्यात महत्त्वाचे -🌿 फ्रिजमधील पाण्याचे तोटे१ अनेकदा पोटात दुखण्याची शक्यता असते.२ घसा खराब होतो.३ वाताचा त्रास होऊ शकतो.४ घशातील पेशींचे तापमान कमी होऊन अनेक समस्या होतात.५ घशातील ग्रंथींवर सूज येते.Ⓜ️ मातीच्या भांड्यातील पाण्याचे फायदे१) मातीच्या मडक्यातील पाणी प्यायल्याने घशाचा त्रास होत नाही.२) हे पाणी अधिक थंड नसल्याने वात होत नाही.३) गेरुमुळे शरीराला थंडावा मिळतो.४) यात विषारी पदार्थ शोषून घेण्याची क्षमता ५)पाण्यात सर्व सूक्ष्म पोषक तत्व एकत्र येतात.६)पाण्याचे तापमान संतुलित राहते.७) शरीरात टेस्टोस्टेरोन हे हार्मोन्सचा स्तर वाढतो.८)रोगप्रतिकारक शक्ती अधिक वाढते.९)अॅसिडीटीची समस्या दूर होते.👌माठात मुळातच पाणी गार असते. पण तुम्ही या एका पद्धतीने ते आणखी गार करू शकता.माठ एका लोखंडी स्टँडवर ठेवा.त्यानंतर त्या स्टँडवर माठ ठेवण्यापूर्वी एक मातीची कुंडी किंवा पसरट भांडे ठेवावे. यावर माती घालून ती भिजेल इतकं पाणी घालावं.यानंतर त्यावर पाण्याने भरलेले माठ ठेवावे.यामुळे माठाला खालच्या बाजूनेही गारवा मिळेल आणि पाणी आणखी गार होईल.कायम लक्षात ठेवा माठ खिडकीजवळ हवा लागेल अशा ठिकाणी ठेवा पण तेथे उन लागणार नाही याची काळजी घ्या.तशी जागा नसल्यास माठ काळोखाच्या ठिकाणी किंवा जेथे उन्ह आणि गॅसची झळ लागणार नाही असा ठेवा.तसेच माठावर कायम एक ओला टॉवेल किंवा कापड ठेवा. ज्यामुळे माठाला बाहेरूनही गारवा मिळेल.यामुळे पाणी पुर्वीपेक्षा अधिक थंड होईल.♨️ माठातील पाणी वापरताना घ्यावयाची काळजी -माठ दररोज स्वच्छ करावा. जेणे करून त्याला गार राहण्यास मदत होईल.माठातील पाणी पिताना सर्वात प्रथम माठ स्वच्छ ठेवून घ्या.अनेकदा माती निघत असते. तर तळात जमा राहते. याचा त्रास होऊ शकतो.तसेच माठ दररोज स्वच्छ करा अन्यथा माठाला आतून बुरशी येते.बुरशीजन्य पाणी प्यायल्यास शरीरावर दुष्परिणाम होतात.खरचं जुन तेच सोनं.मातीचा माठ आणि माठातील थंडगार पाणी ,तो मातीचा वास ,याची मजाच न्यारी ! हे मात्र जो अनुभवतो त्यालाच माहिती !- धनाजी माने.....✍️
राजभवनातील ती अविस्मरणीय भेट... आज आठवणींमध्ये जिवंत झालेले, दादा !
"राजभवनातील ती अविस्मरणीय भेट...आज आठवणींमध्ये जिवंत झालेले डॉ. डी. वाय. पाटील ( दादा )" =============================== 🙏भावप...
-
“खेळात जिंकलेले उपविजेतेपद आणि गावकऱ्यांच्या प्रेमाने जिंकलेली मने – जिल्हा परिषद शाळा कोरेगांव.” ================================ 🏆 कोर...
-
===================🇮🇳=================== 🇮🇳 जनगणना … आकड्यांच्या पलीकडे दिसलेला भारत 🇮🇳 ========================== पहाट अजून पूर्ण उज...
-
🇵🇾 भारताची जणगणना – २०२७ 🇵🇾 ========================== 🇪🇬 शिक्षक आणि जणगणना 🇪🇬 “उन्हात तळपणारा माणूस… देश मोजणारा शिक्षक” “गुरु...




