Saturday, May 21, 2022
अहो !आश्चर्यम्.... अबब! लग्नपत्रिकेत तब्बल ३५० नावे !!
अहो !आश्चर्यम्.... #अबब! लग्नपत्रिकेत तब्बल ३५० नावे !!
अशी #लग्नपत्रिका आपण कुठे पाहिले आहे का?
#दहा, #वीस, #तीस, #पन्नास नव्हे.... तब्बल #साडेतीनशे नावे लग्नपत्रिकेत.... काय धक्का बसला ? पण हे खर आहे राव !
वर आहे इस्लामपुरचा तर वधू आहेत पुण्याच्या.
या वधू-वरांचा विवाह रविवारी २२ मे २०२२ रोजी इस्लामपूर (ता.वाळवा) येथे संपन्न होत आहे.
लग्न पत्रिकेत #नाव नाही म्हणून अनेकजण #नाराज होतात #रुसवे-फुगवे सुरू होतात .पण या #विवाह सोहळ्यात सर्वांनाच मान देण्याचा प्रयत्न #वरपक्षाने केल्याचे दिसत आहे. कुणाचेच रुसवे-फुगवे यायला नकोत याची काळजी घेतल्याचे दिसत आहे.
#भावकी, #पाहुणे, #हितचिंतक, निमंत्रित अशी जवळजवळ तीनशे पन्नास नावे वरपक्षाने या पत्रिकेत छापली आहेत.
या लग्न पत्रिकेतील भल्यामोठ्या यादीची #सर्वत्र #चर्चा मात्र सुरू आहे.
वाळवे तालुक्यातील नव्हे तर #सांगली जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्रातील हा पहिलाच विवाह प्रसंग असेल की लग्नपत्रिकेत तब्बल साडेतीनशे नावे असतील.
गेल्या दोन वर्षा पासून आपण पाहतोय कोरोनाने आपणाला बरच काही शिकवलं. कोणताही #समारंभ असो निमंत्रित मर्यादित असायचे. लग्नात खर्च कमी व्हायचा.
अनेकांनी #यादी पे शादी, #घरगुती मर्यादित निमंत्रित असेच लग्न समारंभ उरकून घेतले.
यामध्ये एखादा चुकला तरी #राग कोणाला येत नव्हता .#माणसं समजून घेत होती.
पण आता मात्र कोरोणा गेल्यानंतर ,लग्नसमारंभ मोठ्या धुमधडाक्यात, थाटामाटात सर्वत्र सुरू आहेत. हजारो लोकांची #गर्दी जमत असते. हजारो लोकांच्या जेवणाच्या पंगती उठतात .#बँजो ,#बॅंड ,#वरात हे सर्व पूर्वीप्रमाणे पार पडत आहे. याचे #अप्रूप कोणालाच वाटत नाही.
पण या लग्नातील ३५० नावांची लग्नपत्रिका मात्र सगळ्यांचंच #लक्ष वेधून घेते हे मात्र #निश्चित !
- धनाजी माने....✍️
Tuesday, May 17, 2022
📌 प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ६ टप्प्यात होणार
📌 प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ६ टप्प्यात होणार
📌 विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ :- खाली नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग शिक्षक भाग - १ म्हणून गणले जातील.
१ पक्षाघाताने आजारी शिक्षक (Paralysis
२ दिव्यांग शिक्षक (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक १४.१.२०११ मधील नमूद प्रारुपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक), मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक (पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ). तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक.
३ हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक
४ जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक /
डायलीसीस सुरु असलेले शिक्षक
५ यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक.
६ कॅन्सरने (कर्करोग) आजारी शिक्षक
७ मेंदूचा आजार झालेले शिक्षक
८ थॅलेसेमिया विकारग्रस्त मुलांचे पालक/ जन्मजात गुणसुत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे
आजार (उदा. Methyl Malonic Acidemia (MMA) Classical type (Mutase defiency
व इतर आजार)} (पालक म्हणजे आई-वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ)
९ माजी सैनिक तसेच आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा
१० विधवा शिक्षक
११ कुमारीका शिक्षक
१२ परित्यक्ता / घटस्फोटीत महिला शिक्षक
१३ वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक
१४ स्वांतत्र्य सैनिकांचा मुलगा/मुलगी/ नातू / नात (स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत) खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधिग्रस्त आहेत असे शिक्षक :
१५ हृदय शस्त्रक्रिया झालेले.
१६ जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी
डायलिसीस सुरु असलेले.
१७ यकृत प्रत्यारोपण झालेले
१८ कॅन्सरने (कर्करोग) आजारी असलेले.
१९ मेदूचा आजार झालेले.
२० थॅलेसेमिया विकारग्रस्त असलेले.
📌विशेष संवर्ग शिक्षक भाग २ : पती-पत्नी एकत्रीकरण (जर सध्या दोघांचे नियुक्तीचे ठिकाण एकमेकांपासून ३० कि.मी. पेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल.)
१ पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर
२ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी
असेल तर,
३ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर,
४ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त
संस्थेचा कर्मचारी असेल तर, उदा. महानगरपालिका/नगरपालिका
५ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी.
६ पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक / कर्मचारी असेल तर,
📌बदलीस पात्र शिक्षक :-
बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा १० वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा ५ वर्षे पूर्ण झलेली आहे असे शिक्षक. तथापि, अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील ५ वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही. अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राथम्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाजेष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात
१० वर्षे पूर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना वास्तव्य जेष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करुन पदस्थापित करण्यात येईल.
📌बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक :- बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा ३ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक
🚚 बदली प्रक्रिया कार्यपध्दती :
🚦टप्पा १ - ज्या शाळांमध्ये ठेवावयाच्या रिक्त पदांपेक्षा कमी पदे रिक्त असल्यास, अशा
शाळांमध्ये जर बदलीपात्र शिक्षक असतील तर अशा शिक्षकांची बदली त्या शाळेतून करण्यात येईल. तथापि, अशा शाळांमध्ये बदलीपात्र शिक्षक नसतील तर खाली नमूद केलेल्या प्रक्रियेप्रमाणे त्यांचा बदलीपात्र शिक्षकांच्या यादीमध्ये समावेश करण्यात येईल. उदा.:- एखाद्या शाळेत १० शिक्षकांचा मंजूर आकृतीबंध आहे. मुद्दा क्र.२.३ नुसार या शाळांमध्ये शिक्षकांच्या तीन जागा रिक्त ठेवावयाच्या आहेत. सद्य:स्थितीत या शाळेत एकच पद रिक्त आहे त्यामुळे आणखी दोन शिक्षकांची पदे रिक्त ठेवणे आवश्यक आहे.
🚦ज्या शाळेत तीन बदली पात्र शिक्षक आहेत. अशा वेळी तेथील दोन बदलीपात्र शिक्षकांची बदलीसाठी निश्चित धरावयाच्या सेवेच्या सेवाजेष्ठतेनुसार बदली करण्यात येईल व अशा पध्दतीने मुद्दा क्र.२.३ नुसार तीन जागा रिक्त ठेवण्यात येतील.
🚦शाळेत एकच बदली पात्र शिक्षक आहे अशावेळी त्या एका शिक्षकाची बदली होईल व
एकूण दोन पदे त्या शाळेत रिक्त राहतील.
🥇 टप्पा -२ विशेष संवर्ग शिक्षक भाग- १ यांच्या बदल्या:
१. टप्पा क्र.१ प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग-१ शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधि देण्यात येईल. तद्नंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ यांच्या बदल्या करण्यात याव्यात.
२. विशेष संवर्ग भाग-१ शिक्षकांना केवळ त्यांच्या विनंतीवरुनच बदली देण्यात येईल. ज्या विशेष संवर्गातील शिक्षकांना बदली नको असेल, मात्र त्यांचे नाव बदलीस पात्र शिक्षकांच्या यादीत आले असल्यास त्यांनी सोबत जोडलेल्या विवरणपत्र क्र. ३ मध्ये स्वयंघोषित प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील.
३. विशेष संवर्गातर्गत विनंती बदलीसाठीचा प्राधान्यक्रम हा विशेष संवर्ग शिक्षकांच्या वरील
व्याख्येमध्ये नमूद केलेल्या क्रमवारीनुसार राहील.
४. एखाद्या विशिष्ट संवर्गामध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी विनंती बदली मागितली असल्यास
त्यांच्या सेवाज्येष्ठता विचारात घेऊन जेष्ठ कर्मचाऱ्यास प्रथमतः बदली अनुज्ञेय राहील.
५. सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास प्राधान्याने बदली अनुज्ञेय राहील.
६. या संवर्गातील शिक्षकांचे वदल्यांसाठी प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करण्यात येईल. या यादीच्या आधारे बदली करताना, शिक्षकांचा पसंतीक्रम विचारात घेऊन ज्या शाळांमध्ये बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध असतील त्या शाळेत प्राधान्यानुसार शिक्षकांची बदली करण्यात येईल. जर एखाद्या विशेष संवर्ग शिक्षकाला त्यांच्या पसंतीक्रमाप्रमाणे एकाही शाळेमध्ये (तेथे बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध नसल्याने) बदली देता आली नाही तर त्याची बदली होणार नाही.
७. विशेष संवर्ग भाग १ अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.
८. विशेषसंवर्ग भाग १ मध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकांनी त्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील. सदरच्या अर्जाच्या पात्रतेबाबत संबंधित गटाचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची समिती निर्णय घेईल.
टप्पा क्र.३ :- विशेष संवर्ग शिक्षक भाग २ यांच्या बदल्या :
१. टप्पा क्र. २ प्रमाणे कार्यवाही झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग भाग-२ शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Subrmit) चार दिवसांचा अवधी देण्यात येईल. तदनंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग २ यांच्या बदल्या करण्यात याव्यात.
२. जे शिक्षक विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ मध्ये मोडतात त्यांनी विवरणपत्र क्र. ४ मधील नमुन्यात स्वयंघोषीत प्रमाणपत्र दोघांच्या स्वाक्षरीने सादर करणे आवश्यक आहे.
३. जर दोघेही जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या संवर्गासाठीअर्ज करु शकेल.
४. उपरोक्त प्रमाणे पती-पत्नी एकत्रीकरण झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी
या शासन निर्णयातील नमूद केलेल्या कार्यपध्दती लागू होतील. या तरतुदींप्रमाणे संबंधिताची बदली पात्र सेवा झाल्यानंतर त्यांची पुढील बदली करताना उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे त्यांना एक एकक (one unit) मानून बदलीने नियुक्ती देता येईल. पर्यायाने ज्या ठिकाणी दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अन्यथा ३० कि.मी. परिसरात दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी शक्यतो त्यांची बदली केली जाईल. जर दोघे पती पत्नी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर एकत्रीकरण झाल्यानंतर त्या दोघांना एक
एकक म्हणून विचारात घ्यावयाचे आहे. यापैकी एकाची पण १० वर्ष सलग सेवा झाली असल्यास दोघांना बदलीस पात्र धरण्यात येईल.
५ . ३० कि.मी. रस्त्यांचे अंतर हे सर्वात नजीकच्या मार्गाने ग्राह्य धरण्यात यावे. सदरचे ३० कि.मी. रस्त्याच्या अंतराचा दाखला देण्यास कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग/कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, बांधकाम हे सक्षम प्राधिकारी रहातील.
६. विशेष संवर्ग २ च्या खाली बदली घेतल्यास पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.
📌 टप्पा क्र.४ - बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या :
१. टप्पा क्र.३ प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व बदली अधिकारप्राप्त शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधी देण्यात येईल. तद्नंतर बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतील.
२. यासाठी ज्या बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची ३ वर्षाची बदली करावयाची निश्चित ३ धरावयाची अवघड क्षेत्रातील सेवा पूर्ण झाली असेल अशा शिक्षकांनी बदलीसाठी विवरणपत्र - १ मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.
३. सदर कर्मचाऱ्याच्या बदल्या ह्या त्यांच्या बदल्यासाठी पात्र धरावयाच्या सेवा
ज्येष्ठतेनुसार करण्यात येतील.
४. सेवा ज्येष्ठता समान असल्यास वयाने जेष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली अनुज्ञेय राहील.
५.बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या बदलीपात्र शिक्षकांच्या जागेवर त्यांच्या
विनंतीतील प्राधान्यक्रमानुसार केल्या जातील.
६, बदली अधिकार पात्र शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंतीक्रम दिला नाही आणि जर शिक्षक बदलीस पात्र नसतील तर त्यांची बदली होणार नाही.
📌टप्पा क्र. ५:- बदलीस पात्र शिक्षकांची बदली करण्याची कार्यपध्दती :
१. टप्पा क्र. १,२,३ व ४ मध्ये नमुद केलेल्या कार्यपध्दतीमुळे बदली होत असलेले व बदलीस पात्र शिक्षक यांची एक ज्येष्ठतायादी, जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन करण्यात येईल. सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व शिल्लक शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी (Submit) चार दिवसांचा अवधि देण्यात येईल.
२. सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचान्यास बदली प्राधान्याने
अनुज्ञेय राहील.
३. या यादीतील शिक्षकांच्या त्यांच्या प्राध्यान्यक्रमाने व त्यांच्या पसंतीनुसार बदल्या करण्यात येतील. परंतु ह्या शिक्षकांची बदली ही ते ज्या शाळेत जाण्यास इच्छुक आहेत त्या शाळेत ठेवावयाच्या रिक्त जागा सोडून अन्य रिक्त जागा असतील, त्याच रिक्त पदांवर बदली होऊ शकते.
४. या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास
उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल.
५. सर्व शिक्षकांना किमान ३० अथवा टप्पा क्र. ४ ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त
असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील.
📌टप्पा क्र. ६ : विस्थापित शिक्षकांसाठी शेवटचा टप्पा:
टप्पा क्र. ५ पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व टप्पा क्र.५ मधून उरलेल्या शिक्षकांना त्यांना पसंतीक्रमामध्ये बदल करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी देण्यात येईल. टप्पा क्र. ५ नुसार सर्वांची सेवाज्येष्ठता व पसंतीक्रमानुसार बदली करण्यात यावी. सर्व शिक्षकांना किमान ३० अथवा टप्पा क्र. ५ ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील. या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमाप्रमाणे जागा उपलब्ध नसल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल.
🔺🔺संवर्ग-१ व २ पडताळणी करताना एखाद्या शिक्षकाने जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करुन घेतलेली आहे, अशी बाब आढळल्यास संबंधित शिक्षकाचे निलंबन करुन त्याच्या विरुध्द शिस्तभंगाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रस्तावित करावी असे शासन निर्णयात नमुद केले आहे.
📚सदर सविस्तर माहितीसाठी
शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.
(शासन निर्णय क्रमांक: जिपब-४८२०/प्र.क्र.२९०/आस्था-१४)
Monday, May 16, 2022
वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी
📚 #वरिष्ठ श्रेणी व #निवड श्रेणी नाव नोंदणी केलेल्या $शिक्षकांची यादी आपण या⤵️ https://training.scertmaha.ac.in/ या वेबसाईटवर पाहू शकता.
#राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे , तर्फे आयोजित वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणासाठीची कार्यवाही अंतिम टप्प्यात
असल्याचे #'संचालक,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.' यांचेकडून जाहीर करण्यात आलेल्या आहे.
============
● महत्त्वाचे मुद्दे ⤵️
=============
◆इतर महत्त्वाची माहिती आपल्याला वैयक्तिक #ईमेल द्वारे व #मोबाईल मेसेजद्वारे येणार.
◆सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे आपल्या सोयीने पूर्ण करण्याची सुविधा असल्याने व हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी स्थळ, ठराविक वेळ, प्रत्यक्ष उपस्थिती यांची मर्यादा असणार नाही.
◆ यामुळे सुट्टीच्या कालावधीमध्ये शिक्षकांना त्यांच्या प्रवासाचे व इतर कोणतेही #नियोजन पूर्ण करण्यासाठी कोणतीही #अडचण येण्याची शक्यता नाही.
◆सदर प्रशिक्षणाबाबत इतर कोणत्याही समाजमाध्यमांवर आलेली माहिती ही अधिकृत समजू नये व त्यावर #विश्वास ठेवू नये.
◆सदर प्रशिक्षणाबाबत इतर कोणत्याही समाजमाध्यमांवर आलेली माहिती ही अधिकृत समजू नये व त्यावर विश्वास ठेवू नये.
अधिकृत माहितीसाठी आपण परिषदेच्या खालील #संकेतस्थळ आणि परिषदेच्या समाजमाध्यमांवर असणाऱ्या चॅनल/पेज वर आपण भेट देऊ शकता.संचालक,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
📌वेबसाईट : www.maa.ac.in
📌वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षण वेबसाईट : https://training.scertmaha.ac.in/
📌ट्विटर : https://twitter.com/scertmaha
📌फेसबुक :
https://www.facebook.com/MahaSCERT
📌 युट्यूब:
https://youtube.com/channel/UCvAkeNF0s3p-mQDHsBvZvVw
संचालक,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
■ वरिष्ठ /निवड श्रेणी प्रशिक्षण याविषयी ■
#महाराष्ट्र शासनाने वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे #नियोजन व संनियंत्रणची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपवली आहे. सदर प्रशिक्षणासाठी #ऑनलाइन नोंदणी करिता हे #पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय अध्यापकाचार्य या चार गटातील शिक्षकांनी नोंदणी करावयाची आहे.(शासन निर्णय दिनांक : २० जुलै, २०२१)
◆ वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण
हे प्रशिक्षण #१२ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी आहे.
📚 प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये⤵️
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बाबत जाणीव जागृती करणे.
जागतिकीकरण, आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात करावयाचे बदल व त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम.
शिक्षक शिक्षण प्रक्रियेमध्ये सुधार करण्यासाठी आवश्यक #ज्ञान, $कौशल्य, वृत्ती बदल आत्मसात होण्यासाठी सक्षम करणे.
नवीन #तंत्रज्ञान आत्मसात करून #स्व विकास, #छात्राध्यापक विकास, #संस्था विकास होण्यासाठी त्याचा उपयोग करण्यास आत्मनिर्भर करणे.
एकविसाव्या शतकातील कौशल्य छात्राध्यापक/ विद्यार्थी यांमध्ये रुजविण्यासाठी सक्षम करणे.
#शारीरिक व #मानसिक स्वास्थ संवर्धनाचे मार्ग समजून घेऊन त्यानुसार #कृती करण्यास सक्षम करणे.
#मानवी हक्क सजगता, $बहुसांस्कृतिकत्व व घटनात्मक मूल्यांची बांधिलकी जपण्यासाठी सबळ करणे.
■ पात्रता निकष ⤵️
उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
१२ वर्षाची अर्हताकारी सेवा
या कामासाठी #नियुक्त केलेल्या समितीला उमेदवारांचे कामकाज समाधानकारक वाटणे.
अ) त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्याचे #सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी #५० तासांचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
ब) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले पाहिजे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान #दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
=================================
■ निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण ■
==================================
हे प्रशिक्षण २४ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी आहे
◆ प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये -( वरील वरिष्ठश्रेणीप्रमाणेच )
📌 पात्रता निकष ⤵️
उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
२४ वर्षाची अर्हताकारी सेवा
अ) त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी ५० तासांचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
ब) शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले पाहजे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
क)
प्राथमिक शिक्षकांसाठी – प्रशिक्षित पदवीधराची अर्हता मिळविली असली पाहिजे.
प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांसाठी – पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त केली असली पाहिजे.
माध्यमिक शाळेतील प्रशिक्षित – अपदवीधर शिक्षकांसाठी पदवी व पदवीधर शिक्षकांसाठी पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त केलेली असली पाहिजे.
प्रशिक्षण शुल्क
■ प्रशिक्षण शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व माहिती अचूक पद्धतीने भरली आहे याची खातरजमा झाल्यानंतरच प्रशिक्षण शुल्क ऑनलाइन अदा करावे. एकदा जमा केलेले शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही याची नोंद घ्यावी.असे अधिकृत साइटवर
सांगितले आहे.(#शुल्क ₹-२०००प्रती प्रशिक्षणार्थी)
■ संपर्कासाठी खालील माहिती देणेत आली आहे. ■
ठिकाण :राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र#७०८, आर.बी.कुमठेकर रोड, पेरुगेट, पुणे
◆ईमेल : trainingsupport@maa.ac.in
◆फोन :०२०-२४४७ ६९३८
◆राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे, महाराष्ट्र #७०८, #आर.बी.कुमठेकर रोड, पेरुगेट,
#सदाशिव पेठ, #पुणे,
महाराष्ट्र- ४११ ०३०
Phone:०२०-२४४७ ६९३८
Email:trainingsupport@maa.ac.in
Thursday, May 12, 2022
" पिकवलेले विकण्यासाठी शेतकरी आत्महत्या करु लागला आहे. राज्यकर्त्यांनो तुम्हाला बळीराजाच्या मुडद्यावर राज्य करायच आहे काय? " राजू शेट्टी
हे फक्त #हिमनगाचे एक टोक आहे.......
" पिकवलेले विकण्यासाठी #शेतकरी #आत्महत्या करु लागला आहे. #राज्यकर्त्यांनो तुम्हाला बळीराजाच्या मुडद्यावर राज्य करायच आहे काय? "
-#राजू शेट्टी
यावर्षी #फेब्रुवारी ,#मार्च ,आणि #एप्रिल फक्त या तीन महिन्यातच घडलेल्या घटना पाहिल्या तर समाजातील एक विदारक चित्र समोर येते. यामध्ये #सचिव सिंगल यांच्याकडे सापडलेली रक्कम असेल किंवा बीड मधील शेतकऱ्यांने केलेली आत्महत्या असेल ,#टी.ई.टी परीक्षा घोटाळा प्रकरण असेल किंवा अलिकडेच सांगली जिल्ह्यातील #माध्यमिक शिक्षणाधिकारी विष्णु कांबळे व #अधीक्षक विजय सोनवणे यांना #लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली #अटक केलेली असेल.
एकूणच हे चित्र भयानक असून #कटूसत्य आपणास #चिंतन करायला लावत आहे. सर्वसामान्य #गरीब,#बेरोजगार #सुशिक्षित तरुण , #शेतकरी यांच्या समस्या या कुणालाच दिसत नाहीत. प्रत्येक जण आपापल्या #विश्वात संपत्ती मिळवणे , #पिळवणूक ,#शोषण करणे यातच #मशगुल आहे
हेच या उदाहरणावरून आणि प्रतिक्रियावरून लक्षात येईल.
◆#शेतकरी आत्महत्या....
#बीड जिल्ह्यात उसाचे गाळप होत नसल्याने एका शेतकऱ्याने शेतातील ऊस पेटवून देऊन फडातच असलेल्या लिंबाच्या झाडाला #गळफास लावून घेतला. ही घटना #हिंगणगाव (ता. गेवराई) येथे बुधवारी दुपारी घडली #नामदेव आसाराम जाधव (वय ३०) असे मरण पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
या व अशा अनेक शेतकऱ्यांच्या #आत्महत्या शेतकऱ्यांच्या जीवनातील दारिद्र्य, दैन्य व गरिबीत कसा तो होरपळतो .दुःख यातना भोगतो. आणि शेवटी आत्महत्येला कवटाळतो हेच समोर येतं.
यावर #खासदार राजू शेट्टी यांच्या प्रतिक्रिया खूप बोलक्या आहेत. त्यांनी अगदी कमी शब्दात #कटूसत्य मांडले आहे. बळीराजाचे जीवन #वास्तव सांगितले आहे.
ते म्हणतात ...." पिकवलेले विकण्यासाठी शेतकरी आत्महत्या करु लागला आहे. राज्यकर्त्यांनो तुम्हाला बळीराजाच्या #मुडद्यावर #राज्य करायच आहे काय? "
- #राजू शेट्टी
◆टीईटी परीक्षेतही गैरप्रकार
#पुणे सायबर पोलिसांना आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करताना #टीईटी परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचे #धागेदोरे हाती लागले होते.
या घोटाळ्याची व्याप्ती तब्बल #२४० कोटी रुपयांची असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. प्रत्येक परीक्षार्थ्यांकडून तीन ते #चार लाख रुपये घेतले असल्याचेही तपासात समोर आले.परीक्षा परिषदेचे माजी अध्यक्ष #तुकाराम सुपे आणि #सुशील खोडवेकर यांच्यासह याप्रकरणी १४ जणांना #अटक झालीआहे.
टीईटी परीक्षेत आर्थिक #गैरव्यवहार करताना प्रत्येक परीक्षार्थ्यांकडून तीन ते चार लाख रुपये घेतले. त्यातून तब्बल दोनशे चाळीस कोटी रुपयांच्या घोटाळ्याची व्याप्ती झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले. ७ हजार ५८० अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यात आले. एकूण ३ लाख ४३ हजार २४३जणांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेच्या अंतिम निकाल यादीत एकूण १६ हजार ७०५जण पात्र ठरले, त्यांना टीईटी #प्रमाणपत्र देण्यात आली .
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी #महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे , माजी आयुक्त #सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा #तांत्रिक सल्लागार #अभिषेक सावरीकर, जीए टेक्नॉलॉजीचा #आश्विन कुमार, #सौरभ त्रिपाठी , #डॉ. प्रीतिश देशमुख आणि #आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर याच्यासह इतरांना अटक करण्यात आली. या घोटाळ्यातील एक आरोपी #राजेंद्र सोळुंके आणि #मुकुंद सूर्यवंशी हे दोघेही एकाच गावचे राहणारे आहेत.
या घोटाळ्यांचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच सांगली जिल्ह्यात #शिक्षण विभागाचे प्रकरण समोर आले.
◆ शिक्षण अधिकारी आणि अधीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात.......
सांगली जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाचे #शिक्षणाधिकारी आणि $अधीक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी ३ शिक्षकांकडून #पदवीधर #वेतनश्रेणी मान्यता मिळवून देण्याच्या बदल्यात प्रत्येकी #६० हजार रूपये प्रमाणे #लाच मागितल्याप्रकरणी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती.
याप्रकरणी #लाचखोर शिक्षणाधिकारी विष्णू कांबळेंचा यांचा व्हिडीओही समोर आला.व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमुळे #खळबळ माजली . दरम्यान, विष्णू कांबळे ३०जून रोजी #निवृत्त होणार होते. निवृत्तीच्या जवळपास दोन महिन्यांपूर्वी विष्णू कांबळे यांची #लाचखोरी उघड झाल्यामुळे चर्चेचा विषय ठरली.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये, केलेल्या विविध आरोपामुळे. शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे असे बोलले जात आहे.
३ शिक्षकांकडून पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळवून देण्याच्या बदल्यात प्रत्येकी ६० हजार रूपये प्रमाणे लाचेची मागणी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. विष्णू कांबळे आणि विजयकुमार सोनवणे अशी लाच स्वीकारलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. १लाख ७० हजार रूपयांची लाच स्विकारताना सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना लाचेच्या रकमेसहीत पकडलं होतं. दोघांवर #विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये #लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली #गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्तापर्यंतची #सांगली जिल्हा परिषदेतील सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
#तक्रारदार आणि त्यांचे दोन #शिक्षक #मित्र यांचे #पदवीधर वेतन श्रेणी मान्यता मिळण्याबाबत प्रस्ताव शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, सांगली यांच्याकडे दिला होता. सदरचे काम करून देण्यासाठी शिक्षण अधिकारी कांबळे आणि अधीक्षक सोनवणे यांनी तक्रारदार, त्यांचे शिक्षक मित्र यांच्याकडे प्रत्येकी ६० हजार रूपये प्रमाणे लाचेची मागणी केली असल्याबाबतचा तक्रारी अर्ज २६ एप्रिल रोजी #अँन्टी करप्शन #ब्युरो सांगली पथकास दिला होता.
● यावरच्या समाजातून आलेल्या बोलक्या प्रतिक्रिया
"लाचखोर सर्व लोकांना अतिशय कडक शिक्षा व्हावी सर्वांचेच #चेकींग करावे व लक्ष ठेवून कारवाई करावी सगळीकडे लाच घेतल्याशिवाय कामच करत नाहीत. मग उगीचच #चुका काढायच्या खूप #हेलपाटे लावायचे कुठे फेडतील सगळे ह्यांची साखळी खालपासून वरपर्यंत कोण तोडू शकणार नाही वाटतं "
- एस.डी .बारवकर
● "शिक्षणाधिकारी .अधिक्षक अप्रोव्हल सेक्सेनचा क्लार्क पेयुनिट मधील क्लार्क . अधिक्षक. ह्यांच्या ज्ञातस्त्थोत्राच्या पेक्षा उत्पन्नाची ACB ने तात्काळ महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांची #तपासणी करवी या वर चिंतन व्हावे "
- राजेंद्र राऊत
● " सगळीकडेच #बोंबाबोंब. #बुलढाणा माध्य शिक्षण विभाग तर मेडीकल #बील काढायचे सुद्धा #10% प्रमाणे पैसे घेतात नालायक ! " - गणेश जयभे, #बुलढाणा
● "यांचा #इतिहास तपासा. #सोलापूर मध्ये ही याने खूप काही केले होते. अगोदर एकदा #सस्पेंड झालेला होता. "
- युवराज एम
या प्रकरणाचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच इतर राज्यातील ही धक्का देणाऱ्या गोष्टी समोर येतात आणि लाचलुचपततिची प्रकरणे किती मोठी असतात याने सर्वसामान्य सुद्धा चकित होतात
◆#रांची #झारखंड येथील #खाण सचिव पूजा सिंघल अटकेत '....
#मनरेगा'च्या निधीतील गैरव्यवहारप्रकरणी #सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) झारखंडच्या खाण सचिव पूजा सिंघल यांना
( बुधवारी ११मे२२)अटक केली. सिंघल यांना याआधी '#ईडी'कडून चौकशीसाठी #समन्स बजावण्यात आले होते. तत्पूर्वी, 'ईडी'ने ७ मे रोजी केलेल्या कारवाईमध्ये #सनदी लेखापाल सुमनकुमार यांना अटक केली होती. 'ईडी'ने कुमार यांच्या कार्यालयातून १७.५१ कोटी रुपयांची तर #पल्स हॉस्पिटलमधून १.८ कोटी रुपयांची #रोकड #जप्त केली होती. #सीए सुमनकुमार याच्या घरातून काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली होती.
एकूणच या सर्व बातम्यांचा आढावा आणि प्रतिक्रिया पहिल्या असता समाजामध्ये किती #विदारक #चित्र आहे हे समोर येते. एका बाजूला आपल्या संसाराला #ठिगळं लावण्यासाठी #शेतकरी रात्रंदिवस झटत असूनही त्याच्या वाट्याला सुखाचा $क्षण आलेला दिसत नाही. आणि हाच सर्वांचा #पोषण करता #तारणहार एकेदिवशी मृत्यूला कवटाळतो ,आत्महत्या करतो. तर दुसर्या बाजूला देशसेवेचे #शपथ घेणारे लोकांची सेवा करणारे #लोकसेवक मात्र सर्वसामान्यांची पिळवणूक करताना दिसत आहेत. हजारो-लाखो नव्हे तर कोटींचा #घोटाळा.... ही कोटीची उड्डाणे पार करत आहेत .
सर्वसामान्यांच्या समोर शिष्टाईचा #बुरखा पांघरून अनेक चांगल्या गोष्टीची #लेक्चर देणारे , #तत्त्वज्ञानाचे डोस देणारे. सर्वांसमोर #मानसन्मान स्वीकरणारे ,हारतुरे स्वीकारणारे हे अधिकारी मात्र #पडद्याआड किती मोठे #पाप करत असतात.लूट करत असतात. पदाचा उपयोग लोकांची सेवा न करता, किती मोठा भ्रष्टाचार करत असतात हेच समोर येत आहे. हे उघड झालेली काही विभागातील काही उदाहरणे आहेत.
असे उघडं न झालेले घोटाळे आणि जाळ्यात न सापडलेले #छोटे -बडे #मासे कितीतरी आजही आपल्यासमोर #उजळ माथ्याने फिरत असतील हे मात्र #निश्चित ! ते फक्त अजून #जात्यात नाहीत तर सुपात आहेत एवढेचं !
हे फक्त #हिमनगाचे एक #टोक आहे......अशा घटना वाचून मन व्यथित होते.चीड येते .पण आपण काहीच करु नाही शकत......
हे परमेश्वरा अशा भ्रष्ट लोकांंना , अशा वाईट प्रवृत्तीपासून दूर कर आणि सर्वसामान्य माणसांची, गोरगरिबांची मनापासून सेवा करण्याची सद्बद्धी देरे देवा !!😢😢😥😥
- धनाजी माने....✍️
Wednesday, May 11, 2022
स्व.नानासाहेब महाडीक यांचे तृतीय पुण्यस्मरण...
🙏।।भावपूर्ण आदरांजली ।।🙏
त्यावेळी कोणालाच असे वाटले नव्हते, असे अघटीत घडून जाईल, चालता - बोलता ...देव तुम्हास, आमच्यातून अचानक असे घेऊन जाईल. ज्या -ज्या वेळी माणुसकी, दातृत्व, स्नेह याची चर्चा होईल, त्या त्या वेळी सर्वात पहिली आठवण नाना तुमची येईल..!😢😢😢😢
११ मे २०२२ नानासाहेब महाडीक यांचे तृतीय पुण्यस्मरण त्यानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन …..
आज नानांना जाऊन ३ वर्षे झाली ११ मे २०१९ चा तो दिवस आजही आठवतो. इस्लामपूर येथील सुश्रुषा हॉस्पिटल मध्ये एकच गर्दी जमली होती. अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आपला बाप माणूस आज आपल्यात नाही याची उणीव सगळ्यांना त्यादिवशी जाणवत होती .कारण नानांचं अचानकच एक्झिट त्यादिवशी झालेलं होतं. नेहमीच सर्वसामान्य माणसांमध्ये रमणारे नाना, सर्वांचे नाना, त्यादिवशी सर्वांना सोडून कायमचे निघून गेले होते , पुन्हा कधीही न परत येण्याच्या प्रवासाला !
आज तीन वर्ष झाली. नानांना जाऊन, परंतु ते आजही आपल्यातच आहेत असं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं.
कारण माननीय राहुल महाडीक ( दादा ) व सम्राट महाडिक ( बाबा )यांच्या रुपाने प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आधारवड हे दोन्ही सुपुत्र झाले आहेत. नाना हे नानाच होते . नानांची बरोबरी करता येत नसली तरीही ही भावंड मात्र सर्वसामान्यांसाठी झटत आहेत नानांचा वारसा पुढे चालवत आहेत.
नाना हे सर्वसामान्य कुटूंबात जन्माला येवून , सर्वसामान्य माणसांच्या सुखदुःखात सहभागी होणारे ,आणि सतत सामान्य कार्यकर्त्याला पाठबळ देऊन त्याला मोठ करणारे,
मोठ्या मनाचा दिलदार माणूस म्हटल की , नानासाहेब महाडीक यांचे व्यक्तीमत्व आजही सर्वांच्या डोळ्यासमोर उभ राहतं !
मुळचे येलूर ( ता.वाळवा) गावचे ,पण व्यवसामुळे पेठ नाका येथेच स्थायिक झाले होते.
त्यांचा जन्म१ जून १९५० रोजी कै. रामचंद्र मसोजी महाडिक यांच्यासारख्या सर्वसामान्य अशा शेतकरी कुटुंबात झाला.त्यांच्या कुटूंबामद्धे एकूण ७ जण भाऊ व ५ बहिणी नानासाहेब यांचा १२ वा क्रमांक, सर्वात छोटे असल्यामुळे ते सर्व भावा बहिनींचे लाडके होते.
त्यांचे नाव मारुती ऊर्फ बटुपंत असले तरी नानासाहेब या नावानेच ते सर्वपरिचित होते.
१९६६ मध्ये नानासाहेब भारत सरकारच्या नेव्ही - नौदलामध्ये भरती झाले आणि देशसेवेला वाहून घेतले. ९ वर्षाची देशसेवा केल्यानंतर , शेती,व्यवसाय यामुळे त्यांनी राजीनामा देऊन व्यवसायात लक्ष केंद्रित केले.१९७८-७९ पासून ते पेठ नाका येथे व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आणि शेती ,व्यवसाय ,राजकारण, समाजकारण या क्षेत्रात त्यांनी वाहून घेतले.
१९८४ पासून ते फोंडा येथील जवळपास १०० एकर शेतजमीनीवर विविध शेतीचे प्रयोग करत होते . विशेष करून त्यांचे झाडानवरं विशेष प्रेम होते .त्यांनी आपल्या आयुष्यात हजारो झाडे जगवली आणि वनराई फुलवली.
त्यांनी फोंडा येथील शेतजमिनीवर केलेल्या विविध शेती प्रयोगांची शासनाला दखल घ्यावी लागली आणि याच कामासाठी महाराष्ट्र शासनाने १९९० मद्धे त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री मा.सुधाकराव नाईक यांच्या हस्ते वनश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
भीमा सहकारी साखर कारखाना उभारणी होत असताना जेष्ठ बंधू कै. पै .भिमराव महाडिक यांच्या बरोबर पंढरपूर येथे राहून जातीने लक्ष घातले. त्यांच्या बरोबर बंधू शामराव महाडिक व विष्णुपंत महाडिक हे ही होते. कारखाना उभारणीत नानासाहेबांचा मोलाचा वाटा होता.
पेट्रोल पंप, हॉटेल व्यवसायामुळे पेठ नाक्याची ओळख नानासाहेबांच्यामुळे सर्वत्र होती.
राजकीय क्षेत्रात त्यांचा वेगळा दबदबा होता.
अनेकांना आमदार, खासदार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी एखाद्या नेत्याला शब्द दिला की ते पुर्ण शक्तीनिशी त्या नेत्याच्या पाठीशी राहयचे.अनेक नेत्यांच्या राजकीय कारकिर्द घडवण्यात त्यांचे मोलाचे योगदानहोते.
शिराळा विधानसभा मतदार संघात नानासाहेबांची नेहमीच किंगमेकर ची भूमिका राहिली होती.
वाळवे तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांनी
२००३ साली श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे स्थापना केली.२००८ साली त्यांनी अल्पावधीत एका मोठ्या आकर्षक अशा शैक्षणिक संकुलाची पेठ नाका येथे उभारणी केली. डिप्लोमा, MBA, अभियांत्रिकी, ITI, B. SC, पब्लिक स्कूल, ज्युनिअर कॉलेज अशा विविध शाखा निर्माण करुन अनेक सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली.
फी विना शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांना मदत करुन ,पाठबळ दिले.
नानासाहेब महाडिक मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य शेतकरी , गरजू लोकांना आर्थिक सोय उपलब्ध करून देण्यात मोलाची कामगिरी बजावून मोलाचे मार्गदर्शन केले.सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात अनेक शाखांद्वारे या संस्थेच्या रुपाने सेवा सूरु आहे.
महाडिक परिवाराचे कुस्तीवर नेहमीच प्रेम राहिले . मल्ल क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मल्लांच्या पाठीशी नानासाहेब नेहमीच राहात होते.व सर्वप्रकारची मदत करत होते.अनेक मल्ल घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
महाडिक कुटुंबातील व्यक्तींनी राजकारणात ग्रामपंचायत सदस्य ते खासदार अशी विविध पदे स्वतःच्या ताकतीवर भूषविली आहेत.
यामद्धेही नानासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे.
देशसेवा, निसर्ग प्रेम ,राजकारण, समाजकारण, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात कार्य करणारे नानासाहेब अष्टपैलू व्यक्तीमत्व होते.त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन !🙏
- धनाजी माने…..✍️
Sunday, May 08, 2022
सांगली जिल्हा परिषदेचा डिजिटल शाळा प्रोजेक्ट असो की....
सांगली जिल्हा परिषदेचा डिजिटल शाळा प्रोजेक्ट असो की,वाळवा पंचायत समितीचा डिजिटल स्टुडिओ असो , खेराडेवांगीचा भोंगा असो की बागणी परिसरातील विद्यार्थ्यांचा मोफत शिष्यवृत्ती तासाचा उपक्रम असो एकूणच जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक प्राथमिक शाळांचा अंतर्बाह्य चेहरा-मोहरा बदलण्यासाठी या शैक्षणिक यज्ञात झोकून देऊन काम करत आहेत.
याची सुरुवात झाली ती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी साहेब यांच्या आदर्श शाळा या संकल्पनेतून ........
जिल्हा परिषद शाळेमध्ये शुद्ध पाणी, शौचालय, संगणक कक्ष, ग्रंथालय, डिजिटल वर्ग , क्रीडांगण, परसबाग, संरक्षक भिंती ,स्वागत कमानी, CCTV,अशा अनेक भौतिक सेवा-सुविधा विविध फंडातून, लोकवर्गणीतून उपलब्ध करण्यात आल्या.
एकेकाळी पडक्या इमारतीत ,कुठल्यातरी देवळात भरणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा आता अधिकाऱ्यांच्या प्रेरणादायी ऊर्जेतून आदर्श शाळा बनत आहेत.जिल्हा परिषदेच्या शाळा आपले रुपडे बदलत आहेत.नामांकित खासगी शाळांनाही लाजवतील अशा जिल्हा परिषदेच्या शाळा सांगली जिल्ह्यातआकाराला येऊ लागल्या आहेत.
हे सारे बाह्य रुप बदलत असतानाच , विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी वाळवा पंचायत समितीने पुढाकार घेतला, गटविकास अधिकारी मा.आबासाहेब पवार , गटशिक्षणाधिकारी मा.अजिंक्य कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली
विविध फंडातून शाळांना टी.व्ही संच पुरवले, पंचायत समितीच्या इमारतीत अत्याधुनिक डीजीटल स्टुडिओ उभारला.येथून तालुक्यातील शिष्यवृत्ती मार्गदर्शन करणारे शिक्षक मार्गदर्शन करु लागले.
वाळवा तालुक्यात ई-लर्निंग डिजिटल स्टुडिओ सुविधा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने वाळवा पंचायत समिती शिक्षण विभागाकडून राबवली आहे.या उपक्रमाचा जिल्हा परिषदेचे सर्व विद्यार्थी लाभ घेत आहेत.मे महिन्यातही दररोज सकाळी १०.३० ते ११.३० रविवार वगळता शिष्यवृत्तीचे हे तास अखंड सुरू राहणार आहे. रविवारी ही यात खंड पडू नये म्हणून रविवारीही शाळेतून offline शिष्यवृत्ती तासांचे शिक्षकांनी नियोजन केले आहे.शिष्यवृत्तीत जास्तीत-जास्त विद्यार्थी यशस्वी व्हावेत यासाठी अतिशय जाणीवपूर्वक वाळवा पंचायत समितीकडून हा उपक्रम राबवला जात आहे.
यासाठी गटविकास अधिकारी आदरणीय डॉ. आबासाहेब पवार सो., शिक्षणाधिकारी मा.मोहनराव गायकवाड सो. यांच्या मार्गदर्शनाने गटशिक्षणाधिकारी मा.अजिंक्य कुंभार सो, विस्तार अधिकारी मा.सौ.छायादेवी माळी सो. , मा.श्री .सुनिल आंबी डाटा operator मा.भालचंद्र कोळी व तालुक्यातील शिष्यवृत्ती मार्गदर्शन करणारे तज्ञ शिक्षक एप्रिल महिन्यापासून अविरतपणे परिश्रम घेत आहेत.
सकारात्मक विचारातून सकारात्मक आचार तयार होतात आणि ते प्रत्यक्ष कृतीत उतरतात.
अशाच सकारात्मक विचारातून खानापूर तालुक्यातील खेराडेवांगी येथे दररोज सात वाजता भोंगा वाजतो आहे.देशाचे भवितव्य ज्या तरुण पिढीच्या हातात असते त्या तरुणांना , बालचमूंना एका चांगल्या कामात गुंतवण्याचा एक स्तुत्य उपक्रम सुरू आहे. त्याचे सर्वत्र तोंड भरुन कौतुक होत आहे.खेराडेवांगी गावातील प्राथमिक शाळेवर एक भोंगा बसविला आहे.हा भोंगा दररोज सात वाजता वाजविला जातो. सर्व घरातील टीव्ही बंद होतात .इतरही करमणुकीची साधने बंद केली जातात. सर्व मुले अभ्यासाला बसतात. एक तास म्हणजे आठपर्यत ही सर्व मुलं शांत वातावरणात अभ्यासात मग्न असतात.हा भोंगा गावात काही महिन्यापासून वाजवला जातो आहे.एका विधायक विचारातून समोर आलेला हा साधा उपक्रम मुलांचं अमुल्य असे भवितव्य घडवत आहे.गावकऱ्यांनी मुलांसाठी सुरू केलेल्या या उपक्रमाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
हे सारे होत असतानाच पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कामेरी, बागणी ,आष्टा परिसरातील शिक्षकांनी मोफत शिष्यवृत्ती वर्गाचे आयोजन केले पाचवीत प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक प्रयत्न करीत आहेत.
जिल्ह्यातील नामवंत शिक्षक व तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत. या मार्गदर्शन वर्गाचा भागातील जि. प. खासगी अनुदानित संस्थेत शिक्षण घेणारे विद्यार्थी या सुवर्ण संधीचा लाभ घेऊ शकणार आहेत. भागातील पालक वर्ग आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी भेट घेऊ लागले आहेत.या उपक्रमासाठी तालुक्यातील तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शक कार्यरत आहेत.
एकूणच सांगली जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्रांतीचे गतवर्षी प्रज्वलित झालेले स्फुल्लिंग हळूहळू ते सर्व जिल्हाभर अशा विविध रुपाने प्रज्वलित होत आहे.भौतिक सुविधा बरोबरच , शैक्षणिक दर्जाही सुधारत आहे .
यावर पालकांचा विश्वास निर्माण झाल्याने, या वर्षी जिल्हा परिषदेच्या शाळांमधून मोठ्या प्रमाणावर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरच हजारो मुलांनी १ली साठी प्रवेश घेतला आहे.अनेकांनी आपल्या आयुष्याचा श्रीगणेशा जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच केला आहे. अनेक खासगी शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे.
या अशा आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदचे सर्व पदाधिकारी, सर्व विभागाचे अधिकारी, शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी ,गटशिक्षणाधिकारी ,विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख ,मुख्याध्यापक, SMC समित्या ,शिक्षणप्रेमी , तरुण मंडळे, सामाजिक संस्था,आणि जिल्ह्यातील तमाम हजारो शिक्षक ,शिक्षिका अविरतपणे झटत आहेत.विद्यार्थ्या विना ओस पडू लागलेल्या जिल्हापरिषदेच्या शाळा पुन्हा गजबजू लागल्या आहेत.
एकूणच सांगली जिल्ह्याचा शैक्षणिक इतिहास लिहिला जाईल त्यावेळी... ही प्राथमिक शाळांचा चेहरा-मोहरा बदलणारी शैक्षणिक क्रांती , भविष्यात एक दीपस्तंभ म्हणून, सर्वांच्या स्मरणात राहील हे निश्चित !
- धनाजी माने (इस्लामपूर)
Ⓜ️9403963934
. . .✍️
चला घारेवाडीस जाऊया !
🙏🏻चला घारेवाडीस जाऊया !
प्रत्येक वर्षी जानेवारीत वेळ काढूया !
#घारेवाडी , महाराष्ट्रातील तरुणांची #पंढरी आणि #तमाम तरुणांचे #विठ्ठल,#माऊली आमचे आदरणीय #काकाजी #मा.इंद्रजित देशमुख ( मा.अतिरिक्त #मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.#कोल्हापूर)
आदरणीय काकाजी एका विधायक ध्येयाने #प्रेरित होऊन ,स्वत: अनेक गोष्टींचा #त्याग करून अविरतपणे झटताहेत.महाराष्ट्रातील आणि भारतातील प्रत्येक तरुणांच्यामद्धे #स्वामी विवेकानंदांच्या आचार ,विचारांचे रोपण होऊन त्याचा #वटवृक्ष व्हावा यासाठी ते #अहोरात्र कष्ट घेत आहेत.
' शिवम प्रतिष्ठानच्या ' माध्यमातून ते बलशाली युवा घडावेत यासाठी प्रत्येकवर्षी '# युवा ह्रदय संमेलनाचे ' #घारेवाडी ता.#कराड येथे आयोजन करतात.
अनेक #कर्तृत्ववान लोकांना एका छत्राखाली आणतात.ज्यांची करणी आणि कथनी समान आहे , अशा विधायक विचाराने वेड्या झालेल्या #ध्येयवेड्या लोकांना या युवा संमेलनात त्यांचे प्रेरणादायी विचार ऐकवतात.
ही #ऊर्जा घेऊन महाराष्ट्रातील तमाम #तरुण जातात.आणि काहीतरी चांगले बनून दाखवायचे याने झपाटून जातात.आणि करूनही दाखवतात. हे अनेकांनी ही घारेवाडीची #वारी करणारांनी आणि आदरणीय काकाजी यांच्या अमृतवाणीचे #श्रवण केले त्यांनी अनुभवले आहे.
भारताचा नवतरुण, म्हणजेच एक #ज्वलंत धमन्यांचे #स्पंदन आणि असे हे तरुण धाडशी ,खंबीरमनाचे #निर्व्यसनि,#भ्रष्टाचारमुक्त.देशभक्तीने भारावलेले #युवक इथे घडावेत.त्यांच्या मनांची चांगली मशागत व्हावी.भारताला बलशाली ,शक्तीशाली आणि पायमल्ली होत असलेल्या संस्कृतीची नव्याने आदर्शवत #बीजे रोवली जावीत या #ऊत्तूंग सद्विचाराने आदरणीय काकाजी ध्येयवेडे होऊन स्वत:चा #प्रपंच बाजूला ठेवून हा सारा #जगाचा प्रपंच करीत आहेत.
भरकटलेला तरुणांचा #जीवनरथ ,आणि सैरावैरा पळणारा #वारु जेव्हा या घारेवाडीच्या नवनिर्माण करणाऱ्या पुनित भूमित तीन दिवस स्थिरावतो आणि इथले अमृतवाणीतून पडणारे #अमृतकण वेचतो तेव्हा त्याला इथे निश्चितच जीवनाचे खरे ध्येय सापडते.त्याचा जीवनरथ आणि त्याचा वारु योग्य असेच मार्गक्रमण करतो.
यासाठी त्याने फक्त जानेवारी महिन्यात #स्वामी विवेकानंद #जयंती दरम्यानच्या काळात ,घारेवाडी या प्रतिपंढरीत वास्तव करून , बरसणाऱ्या या भुमितील अमृतकणांचे सेवन करायला हवे एवढेचं !
जय हो ! मंगल हो !!
धनाजी माने....✍️
आईचाच खून ? - मातृदिनाच्या दोन दिवस अगोदरची घटना !
आईचाच #खून ? - #मातृदिनाच्या दोन दिवस अगोदरची घटना !
#८ मे हा दिवस मातृदिन म्हणून आपण आई बाबत कृतज्ञता व्यक्त करतो.आज मातृदिन #व्हाट्सअप , #ट्विटर, #इन्स्टाग्राम,#फेसबुक, या #सोशल मीडिया वरती सर्वत्र आईची #माहिती,#महती सांगणारे अनेक मेसेज वाचनात आले .अनेकांनी आपल्या आई बाबतच्या आठवणींना उजाळा दिला. तिच्या सोबतचे कुटुंबासोबतचे फोटो , व्हिडिओ या सोशल मीडिया वरती #शेअर केलेले पाहिले.
हे पहात असतानाच मातृदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच दोन दिवसापूर्वी ६ मे रोजी एका #दुर्दैवी आईबाबतची घडलेली घटना वाचनात आली. एका दैनिकामध्ये
' #जेवण चांगले बनविले नाही म्हणून आईचा खून! '
या मथळ्याखाली ही #बातमी वाचली आणि मन खिन्न झाले.
#सांगली जिल्ह्यातील #कवठेमहांकाळ तालुक्यातील #आगळगावातील ही घटना.
#मायाक्का (नाव बदल) या सत्तर वर्षाच्या आईला #दशरथ या पोटच्या मुलांने मारहाण केली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.
कारण काय होते ? तर आईने जेवण चांगले बनवले नाही . म्हणून या पोटच्याच मुलाने आपल्या मातेला #लोखंडी #फुकणी आणि दगडाने मारहाण केली.त्यात ही माय #जखमी झाली. उपचारासाठी तीला मिरजेच्या शासकीय रुग्णालयात नेले. मात्र तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मुलाच्या पत्नीच्या मृत्यूनंतर मुलाचा आणि त्याच्या दोन मुलांना (नातवांना) मायाक्का ही #माय #काबाडकष्ट करून सांभाळ करत होती. वयाच्या सत्तरीत सुद्धा ही आपल्या मुलाला आणि नातवांना जगवण्यासाठी गरिबितही धडपडत होती.खरचं ही आई किती थोर होती.मुलगा व्यसनी होता तरी त्याकडे कानाडोळा करून ही माय मात्र काबाडकष्ट करतच राहिली आणि मुलाला आणि नातवांना सांभाळत राहिली .मात्र मातृदिनाच्या दोनच दिवस अगोदर हा पोटचा मुलगाच तिचा काळ ठरला . आणि या दुर्दैवी मातेचा यात मृत्यू झाला.
एका बाजूला मातृदिनाच्या दिवशी आईसाठी अनेक लेकरांनी आपल्या परीने आपल्या आईसाठी दिलेल्या शुभेच्छा! तीच्या आठवणींना दिलेला उजाळा....
तर दुसऱ्या बाजूला मातृदिनाच्या #पूर्वसंध्येला एका #क्षुल्लक कारणावरून आईच्याच मृत्यूला कारणीभूत ठरलेला मुलगा. या घटनांचा #पदर उलगडून पाहताना मनात विचार येतात की ,
कुठे तो 'श्यामच्या आई ' मधील #श्याम (#साने गुरुजी) आणि कुठे हा आगळगावचा आईच्याच मृत्यूचा कारण ठरलेला मुलगा !
खरंच आज समाजामध्ये अशा घटना का घडत आहेत? इतकं दुर्दैवी जीवन एखाद्या आईच्या वाट्याला का यावे ? याने मन विषण्ण होतं.
श्यामच्या आई मधील श्याम म्हणजेच साने गुरुजी आपल्या आईची महती सांगताना ,#सवंगड्यांना सांगताना,
गडयांनो ! माझ्यात जे काही चांगले आहे, ते माझ्या आईचे आहे.
आई माझा #गुरू, आई #कल्पतरू
सौख्याचा सागरु आई माझी ।।
तिने मला काय दिले नाही ? सारे काही दिले ! प्रेमळपणे बघावयास, प्रेमळ बोलावयास तिनेच मला शिकविले. मनुष्यावर नव्हे, तर गाईगुरांवर, फुलांपाखरांवर, #झाडामाडांवर, #प्रेम करावयास तिनेच शिकविले. अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्य तो आपले काम उत्कृष्टपणे करीत राहणे, हे मला तिनेच शिकविले. कोंडयाचा मांडा करून कसा खावा व दारिद्रयातही स्वत्व व सत्त्व न गमविता कसे राहावे, हे तिनेच मला शिकविले.
तीच #वास देणारी, #रंग देणारी, मी खरोखर कोणी नाही. सारे तिचे, त्या थोर #माउलीचे. सारी माझी आई!आई!!आई!!!'
असे म्हणता म्हणता श्यामला गहिवरून आले. त्याच्या डोळयातून घळघळा अश्रुधारा गळू लागल्या. भावनांनी त्यांचे #ओठ, त्यांचे हात, हाताची बोटे थरथरू लागली. गड्यांनो आईचे #गुणगान सांगून हे ओठ #पवित्र करीन. आईच्या आठवतील, त्या त्या गोष्टी सांगेन. तिच्या स्मृती आळवीन. असे श्याम म्हणाला ,आणि दररोज आपल्या आईची महती सांगत गेला. जवळजवळ ४२ रात्रीत श्यामने आपल्या आईची महती व गुणगान आपल्या सवंगडी मित्रांना सांगून आपले ओठ पवित्र केले.
या दोन्ही प्रसंगांचे पदर उलगडताना असे वाटते की , परमेश्वराला प्रत्येक घरात जन्म घेता येत नाही म्हणून तो आईच्या रूपात प्रत्येक घरात असतो. अस असताना पोटी येणारा मुलगाही.......तेवढ्याच #तोलामोलाचा जन्माला यावा !
म्हणजेच श्यामसारख्या मुलांचा सहवास घरोघरी प्रत्येक मातेला लाभावा,
गावाला ,माणुसकीला काळीमा लावणारा आईचाच बळी घेणाऱ्या असल्या मुलाचा #सहवास कोणत्याच मातेच्या वाट्याला न यावा !
हीच मातृदिना दिवशी #परमेश्वर चरणी #प्रार्थना !
- धनाजी माने ...✍️
Friday, May 06, 2022
📢 असे भोंगे गावागावात वाजायलाच हवेत....
■ शुभ वर्तमान ■
📢 असे भोंगे गावागावात वाजायलाच हवेत.....
आज सर्व महाराष्ट्रभर भोंग्या वरून राजकारण पेटलं आहे .वातावरणातील तापमानाबरोबर भोंग्याचे राजकारणही तापू लागले आहे.याचे लोण महाराष्ट्राबरोबरच सर्व भारतभर पसरू लागले आहेत.
समाजा -समाजामध्ये, जाती - धर्माच्या नावाखाली भेदा-भेद सुरू आहे. सामाजिक ऐक्याला कुठेतरी तडा जाताना दिसत आहे. यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर विनाकारण ताण वाढू लागला आहे.
जिल्हा- परिषद पंचायत समित्या, नगरपालिका ,महानगरपालिका यांच्या निवडणुक कार्यक्रमाचे बिगुल काही काळातच राज्यात वाजणार आहेत. आणि यामध्ये आपल्या पक्षालाच मतांचा गट्टा कसा मिळेल यासाठी प्रत्येक पक्षआत्तापासून वेगवेगळे डावपेच रचत असल्याचे दिसत आहे. यामध्ये वेगवेगळे पत्ते बाहेर काढले जात आहेत असे विश्लेषक, जाणकार नागरिक बोलत आहेत.
गेल्या दोन वर्षात कोरोणाने हाहाकार माजवला आणि अनेकांच्या घरातील कर्ते पुरुष निघून गेले .आणि त्या कुटुंबावरती आभाळ कोसळले. अजूनही महाराष्ट्रातील अशी हजारो कुटुंब या दुःखातून सावरलेली नाहीत. त्यांच्या समोर अनेक समस्या आवासून उभ्याआहेत.महापुरात अनेकांचे संसार वाहून गेले .शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. दरडी कोसळून गावेच्या गावे नामशेष झाली. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. पाण्याचा प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न, तरुणांच्या नोकऱ्यांचे प्रश्न.....असे अनेक प्रश्न राज्यासमोर आवासून उभे असताना त्याच्या वरती चर्चा होताना कुठेच दिसत नाही.
आपला पक्ष आणि आपणच कसे बरोबर आहोत, समोरचे कसे चुकीचे आहेत , यासाठी वैयक्तिक टिका -टिपणी ,वैयक्तिक शिंतोडे ,एक दुसऱ्याच्या संपत्तीचे मोजमाप ....याचीच चर्चा जाहीरपणे होताना दिसते.वरती उल्लेख झालेल्या सर्वसामान्यांच्या समस्यांवरती चर्चा होताना दिसत नाही .गोरगरिबांच्या दुःखावरती कशी फुंकर मारता येईल? त्याचे जीवनमान कसे सुधारेल? शेतकऱ्यांच्या संसारात कसे सुख येईल? तरुणांच्या हाताला कसा रोजगार मिळेल ?पेट्रोल दर गगणाला भिडलेत ,Gst मद्धे वह्या -पुस्तकांचे दरही वाढलेत सामान्य. कुटुंबातील गरिबाला याचा मेळ घालताना ससेहोलपट होते, महागाईमुळे मेहनतीचे, खताचेदर गगणाले भिडले पण शेतीमालाचे दर....? यामुळे बळीराजाच्या संसारातील मेळ बसेना...... अशा एक ना अनेक समस्यांबाबत चर्चा होताना दिसत नाही.नियोजन नाही.
आज प्रश्न असा पडतो राजर्षी शाहू राजांचा शंभराव्या स्मृतिदिनानिमित्त आपण वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या स्मृतींना उजाळा देत असताना. अभिवादन करत असताना त्या महान रा. शाहूराजांचा थोडा तरी आदर्श घ्यायला हवा.या राजाने जाती धर्माच्या पलीकडे जाऊन अठरा- पगड जातींना एकत्र बांधले. ज्या काळात सर्व समाज दलितांना अतिशय हीन वागणूक देत होता ; त्या काळात या माणसातील देव माणसाने , रयतेच्या- राजाने... राजर्षी शाहूंनी गंगाराम कांबळे सारख्या सर्वसामान्य दलित माणसाच्या हॉटेल वरती , चार घोड्याच्या बग्गीतून जाऊन चहा घेतला व घेत राहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान उच्चविद्याविभूषित व्यक्तीसाठी करवीर नगरीत स्वागत कमानी उभारुन आणि त्यांना पायघड्या घालून स्वागत केले .जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांसाठी काम केले. दुष्काळ, स्त्रीशिक्षण, सर्व समाजातील तरुणांना शिक्षण , सर्व स्तरातील सर्वसामान्यांची, गोरगरिबांची दुःख दूर करण्यासाठी हा राजा रात्रंदिवस झटला. आपल्या उण्यापुऱ्या अठ्ठेचाळीस वर्षांत आणि मिळालेल्या राजकीय कारकीर्दीच्या कालावधीत फक्त आणि फक्त रयतेची काळजी वाहिली. छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल टाकून ते आयुष्यभर चालले त्यांचा आदर्श त्यांनी समोर ठेवला आणि कार्य करत राहिले सर्वसामान्यांच्या साठी रात्रंदिवस झटत राहिले.
काल आणि आज ही तफावत आपण पाहत असतानाच , भोंग्यावरून चाललेल्या राजकारणात, राजकारण्यांना चपराक देणारे शुभवर्तमान सर्वसामान्य लोकांच्या कडूनच घडत आहे. कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन ज्यावेळी आपण बदलतो , त्यावेळी विधायक कार्य समोर येते .सकारात्मक विचारातून सकारात्मक आचार तयार होतात आणि ते प्रत्यक्ष कृतीत उतरतात.
अशाच सकारात्मक विचारातून खानापूर तालुक्यातील खेराडेवांगी येथे दररोज सात वाजता भोंगा वाजतो आहे.देशाचे भवितव्य ज्या तरुण पिढीच्या हातात असते त्या तरुणांना , बालचमूंना एका चांगल्या कामात गुंतवण्याचा एक स्तुत्य उपक्रम सुरू आहे. त्याचे सर्वत्र तोंड भरुन कौतुक होत आहे.
खेराडेवांगी गावातील प्राथमिक शाळेवर एक भोंगा बसविला आहे.हा भोंगा दररोज सात वाजता वाजविला जातो. सर्व घरातील टीव्ही बंद होतात .इतरही करमणुकीची साधने बंद केली जातात. सर्व मुले अभ्यासाला बसतात. एक तास म्हणजे आठपर्यत ही सर्व मुलं शांत वातावरणात अभ्यासात मग्न असतात.हा भोंगा गावात काही महिन्यापासून वाजवला जातो आहे.
एका विधायक विचारातून समोर आलेला हा साधा उपक्रम मुलांचं अमुल्य असे भवितव्य घडवत आहे.गावकऱ्यांनी मुलांसाठी सुरू केलेल्या या उपक्रमाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
युनिसेफचे पथक जिल्हा दौऱ्यावर आले तेव्हा पाहणी पथकाने हा उपक्रम पाहिला , तेव्हा पथकातील अधिकारी आदर्श शाळा आणि गावातील भोंग्याचा उपक्रम पाहून चकित झाले.
सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी साहेब यांच्या आदर्श शाळा या संकल्पनेतून ही शाळा शाळेतील शिक्षक आणि गावकऱ्यांनी आदर्श बनवली आहे.
या शाळेत शुद्ध पाणी, शौचालय,संगणक कक्ष, ग्रंथालय, डिजिटल वर्ग अशा अनेक भौतिक सेवा-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
एकेकाळी पडक्या इमारतीत ,कुठल्यातरी देवळात भरणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा आता अशा आदर्शअधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून निर्माण होणाऱ्या आदर्श शाळा बनत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा आपले रुपडे बदलत आहेत.नामांकित खासगी शाळांनाही लाजवतील अशा जिल्हा परिषदेच्या शाळा सांगली जिल्ह्यातआकाराला येऊ लागल्या आहेत.
या भौतिक सुविधा बरोबरच , शैक्षणिक दर्जाही सुधारत आहे .यावर पालकांचा विश्वास निर्माण झाल्याने, या वर्षी जिल्हा परिषदेच्या शाळांमधून मोठ्या प्रमाणावर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हजारो मुलांनी १ली साठी प्रवेश घेतला आहे आपल्या आयुष्याचा श्रीगणेशा जिल्हा परिषदेच्या शाळेतून केला आहे. अनेक खासगी शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतला आहे.
भविष्यातील दोन - चार वर्षात जिल्हा परिषद शाळेमद्धे प्रवेशासाठी पालकांना प्रतीक्षा करावी लागेल असे वातावरण सर्व जिल्ह्यात निर्माण होऊ लागले आहे.
या आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदचे सर्व पदाधिकारी, सर्व विभागाचे अधिकारी, शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी ,गटशिक्षणाधिकारी ,विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख ,मुख्याध्यापक, SMC,शिक्षणप्रेमी जिल्ह्यातील तमाम शिक्षक अविरतपणे झटत आहेत.
विद्यार्थ्या विना ओस पडू लागलेल्या जिल्हापरिषदेच्या शाळा पुन्हा गजबजू लागल्या आहेत. आणि हे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुड्डीसाहेब यांच्या संकल्पनेतून शक्य झाले आहे हे मात्र निश्चित !
एकूणच महाराष्ट्रात भोंग्या वरून राजकारण पेटले असतानाच , मुलांच्या उज्वल भविष्यासाठी खानापूर तालुक्यातील खेराडेवांगी येथे रोज भोंगा वाजत आहे.
म्हणूनच सर्वांनी इतर भोंगे वाजवून किंवा बंद करून राजकारण करण्यापेक्षा, गावागावात असे विधायक विचाराने प्रेरित झालेले भोंगे वाजवायलाच हवेत .
(न्यायालय निर्देशानुसार - डेसिबल मर्यादा नियम)
- धनाजी माने......✍️
Thursday, May 05, 2022
शाहू महाराज यांचा १०० वा स्मृतिदिन !
राजर्षी छत्रपती शाहू महाराज
■ 🙏 #६ मे २०२२ - शाहू महाराज यांचा १०० वा #स्मृतिदिन ! ■
लोकराजा #राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृतिदिनानिमित्त......
◆ शुक्रवार दि. ६ मे रोजी
◆ सकाळी १० वाजता १०० सेकंद
◆ स्तब्ध उभे राहून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करुयात..!
=================================
◆ 📑 राजांचा जीवनपट ....🎥 ◆
◆ शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी #कागल येथील घाटगे घराण्यात झाला.
◆पूर्ण नाव #यशवंत जयसिंगराव घाटगे .
◆ आईचे नाव #राधाबाई होते.
◆चौथे #शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर यशवंतला दत्तक घेतले. त्यांचे “शाहू” असे नामकरण करण्यात आले. #शाहू महाराज लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचेहोते.ते न्यायप्रेमी होते.
◆१ एप्रिल १८९१ साली ते #लक्ष्मीबाई खानविलकर यांच्याशी विवाहबद्ध झाले.#राजाराम व #शिवाजी हे दोन मुलगे व #राधाबाई व #अनुबाई या दोन कन्या होत्या .शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १८९४ साली त्यांचा #राज्याभिषेक करण्यात आला.
◆संस्थानातील सर्व मुलांना #प्राथमिक शिक्षण #मोफत दिले. स्त्री शिक्षणासाठी देखील ते नेहमी आग्रही होते.
◆#जातीभेद आणि #अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली. अस्पृश्यांच्या वेगळ्या #शाळा भरवणे बंद केले.
◆छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी १९१९ मध्ये भेट झाली ती #डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उच्च शिक्षणासाठी आणि #मूकनायक वृत्तपत्रासाठी सहकार्य केले
◆ #राधानगरी धरणाची उभारणी, #शेती तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड #अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ची स्थापना,#शाहुपुरी व्यापारपेठ, ,शेतकऱ्यांची सहकारी संस्था,अशा कामातून शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम राबवले.
◆आपल्या अधिकारांचा फायदा #बहुजन समाजाला मिळवून दिला. त्यांच्या न्यायासाठी आणि शिक्षणासाठी ते नेहमी झटले.
◆ १९१७ साली त्यांनी #पुनर्विवाहाचा कायदा करून#विधवा विवाहास कायदेशीर #मान्यता मिळवून दिली.
◆जातीव्यवस्थेची #शिकार झालेल्या अनेक #जमाती च्या लोकांना #गुन्हेगारी पासून परावृत्त करण्यासाठी #ब्रिटिश कालीन हजेरी पद्धत बंद करून त्यांनी कोल्हापूर संस्थानात नोकऱ्या दिल्या . त्यांना घरे बांधून दिली . ,वणवण भटकणाऱ्या लोकांची राहणाऱ्या पोटापाण्याची सोय झाली . गुन्हेगारी पासून मुक्ती होऊन त्या लोकांना समाजात #माणूस म्हणून सन्मानाने वावरता येऊ लागले .
◆शाहू महाराजांना #‘राजर्षी’ ही उपाधी कानपूरच्या कुर्मी #क्षत्रिय समाजाने दिली. #
◆इतिहासकारांनी त्यांची नोंद #लोककल्याणकारी #राज्यकर्ता म्हणून केली आहे.
◆६ मे १९२२ रोजी #मुंबई येथे त्यांचे निधन झाले
■ आपल्या ४८ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी #आरोग्य,#कृषी, #शिक्षण,#कला , #उद्योग, व #क्रीडा अशा अनेक क्षेत्रात अविरतपणे महत्त्वपूर्ण #योगदान दिले. अशा या #महान राजांना #विनम्रपणे #अभिवादन!
- धनाजी माने ......✍️
==================================
बाबासाहेब परीट - ग्रामीण कथाकार
बाबासाहेब परीट मराठी साहित्यात “कथाकथन” म्हटलं की केवळ कथा लिहिणं नाही, तर ती जिवंतपणे सांगण्याची कला अभिप्रेत असावी लागते. अशीच या क्षेत्...
-
“खेळात जिंकलेले उपविजेतेपद आणि गावकऱ्यांच्या प्रेमाने जिंकलेली मने – जिल्हा परिषद शाळा कोरेगांव.” ================================ 🏆 कोर...
-
कवी यशवंत एका ठिकाणी बैलपोळा सणाबाबत म्हणतात. शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली, चढविल्या झुली, ऐनेदार.... सण एक दिन, बाकी वर्षभर ओझे मर म...
-
✉️ एक अनाहूत पत्र..... ✍️ राज्यभर शिक्षक हे शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून अक्रोश का करत आहेत ? रस्त्यावर का येत आहेत ? 🔥 'आग रामेश...





.jpeg)
.jpeg)




.jpeg)
.jpeg)
