' अरे ! कुठला कोरोना आणि कुठलं काय सार थोतांड आहे. उलट मास्क घातल्यावरच कोरोणा वाढतो. ' ....... बेफिकिरी
कृष्णा आणि वारणा नदीकाठचा पूर ओसरला , लोक स्वतःला सावरत आहेत. लोकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
परंतु कोरोना मात्र अद्याप मागे हटायला तयार नाही .कोरोणाचे शेपूट हळूहळू वाढत चालले. आणि कोरोणामध्ये मृत्यूचे प्रमाण ही तस चिंताजनकच आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक नवीन रुग्ण संख्या सांगली जिल्ह्यातच आढळत आहे.
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अशा जिल्ह्यांचा संसर्ग कमी झाला आहे. महाराष्ट्रातील या व अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सांगली जिल्ह्यातील संसर्ग मात्र वाढत आणि लांबत चालला आहे.
याचे बारकावे पाहिले, निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल की समाजामध्ये काही निष्काळजी लोकांची वाढलेली बेफिकिरी.
परवा एका ठिकाणचे दृश्य पाहिले आणि त्या ठिकाणांचे संभाषण ऐकले , त्यावेळीच ही समाजातील काही लोकांची बेफिकिरी प्रकर्षाने जाणवली.
ते संभाषण खूपच बोलके उदाहरण होतं ,
' अरे ! कुठला कोरोना आणि कुठलं काय सार थोतांड आहे. उलट मास्क घातल्यावरच कोरोणा वाढतो. '
किती ही बेफिकीरी ❓
एका बाजूला कोरोनाने सार जग हैराण आहे. साऱ्या जगाने या विषाणुसमोर गुडघे टेकले आहेत. प्रगतशील देश असतील किंवा विकसनशील देश असतील सर्वचजण हतबल झाले आहेत.
गेल्या दोन वर्षामध्ये कोट्यावधी लोक या विषाणुमुळे बाधित झाले. आणि लाखो लोकांचा मृत्यू यामध्ये झाला. अजूनही हे सत्र सुरूच आहे कोरोणा चे विविध व्हेरियंट (प्रकार) समोर येत आहेत .लोक बाधित होत आहेत आणि मृत्यू पावत आहेत. ही साखळी अविरत सुरूच आहे.अनेक कुटुंब दुःखाच्या खाईत लोटली गेली.अनेक ठिकाणी कुटुंबच्या कुटुंब या खाईत लोटून त्या कुटुंबातील सर्वांचाच मृत्यू झाला.हे सर्व डोळ्यासमोर घडत असताना, याचे लोन मोठमोठ्या शहरांपासून गावा- गावा पर्यंत गल्ली- गल्लीपर्यंत घरापर्यंत पोहोचले. तरीही काही महाभागांना शहाणपण सुचत नाही. आणि वरील बेफिकीरीचे हे संभाषण काही निष्काळजीपणे वागणाऱ्या लोकांच्या तोंडातून आजही ऐकायला मिळते.
असे लोक स्वतः बाधित होतातच पण आपल्या बेफिकीरीने कोरोणाची साखळी वाढवत राहतात. आणि समाजात कोरोणाच्या संकटांना आमंत्रण देतात.
सर्व काही प्रशासनानेच करावे या भावनेने लोकांच्या मध्ये स्वयंशिस्त राहिलेली नाही असे निरीक्षणातून दिसत आहे. कोरोणाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासन आटोकाट प्रयत्न करत असतं.
प्रशासनातील पोलीस, प्राथमिक , माध्यमिक शिक्षक , आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी व विशेष करून वैद्यकीय क्षेत्रातील लोक यासाठी गेली दोन वर्ष अविरत झटत आहेत. रात्रंदिवस राबत आहेत आपला जीव धोक्यात घालून लोकांना सावरत आहेत.
तरीही काही लोक बेफिकीर वागून प्रशासनावरचा तान, आणि कोरोणाचा प्रसार करीत कोरोणाचे शेपुट वाढवतच आहेत.
लोकांनी आपल्या जीवाची बाजी न लावता संयम, स्वयं- शिस्त बाळगुन कोरणा बाबत प्रत्येक गोष्टीचे पालन केले, तर ही चिंताजनक संख्या आटोक्यात येईल.लोकसंख्येची घनता असणाऱ्या मोठ्या शहरांच्या ठिकाणीही कोरणा आटोक्यात आला आहे .कारण या ठिकाणच्या लोकांनी घेतलेली काळजी ,स्वयंशिस्त , लोकांनी याबाबत त्रिसूत्रीचा वापर केला आहे असं दिसतं. योग्य पद्धत पद्धतीने घालने . साबणाने वेळोवेळी हात धुणे.सोशल डिस्टंसिंग. विनाकारण गर्दी टाळणे. सार्वजनिक गर्दीचे कार्यक्रम याला फाटा देणे.
या स्वयंशिस्तीनेच कोरणा वाढायचा थांबत असतो. असं तज्ज्ञांचं मत आहेआणि अशा नियमांची पायमल्ली ज्याठिकाणी होते, काही बेफिकीर लोकांची बेफिकिरी वाढते आणि अशा मुळेच कोरोणा पुन्हा डोकं वर काढतो.
त्याचा संसर्ग वाढत राहतो.
याच्या वरती सर्वात चांगला पर्याय.... स्वयंशिस्त हीच आहे. सर्वांनी जर स्वयंशिस्त बाळगून काळजी घेतली तर, सांगली जिल्ह्यात वाढणारा कोरोणा आपण अशा स्वयंशिस्तीनेच कमी करू शकतो हे मात्र निश्चित !
धनाजी माने....✍️

1 comment:
वास्तव लेख
Post a Comment