👌ऑनलाइन शिक्षण ही चांगल्या पद्धतीने घेता येईल आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेमध्ये निर्माण होणारे अडथळे दूर करता येतील.यासाठी.....✍️
जस-जशी जून महिन्याची १५ तारीख जवळ येते, त्यावेळी आपणाला आपल्या शाळेचे वेध लागतात. कधी एकदा आपण शाळेत जातो आणि आपल्या जुन्या मित्रांना भेटतो. हे सगळे वेध आपल्या मनाला लागलेले असतात. तर इयत्ता पहिली चे विद्यार्थी नव्याने दाखल होऊन या नवीन वातावरणात येत असतात.
इयत्ता पहिलीचे विद्यार्थी एका अनौपचारिक वातावरणातून एका औपचारिक वातावरणात येतात.आणि त्यांनाही वेध लागलेले असतात आपल्या शाळेचे .काही रडतातही त्यांना आपल्या घरची आई -वडिलांची आठवण येत असते. त्यांची मनधरणी करावी लागते. या सर्वांची मनधरणी आमच्या शिक्षक भगिनी- बंधू करत असतात. आणि ती पोकळीहि आई-वडिलांची भरून काढत असतात.
प्रत्येक वर्षी या नवागतांचे स्वागत पुष्पगुच्छ, चॉकलेट, कॅडबरी असे विविध खाऊचे पदार्थ देऊन केले जाते परंतु गत वर्षापासून कोरोणाच्या महामारी मुळे हे सर्व थांबले आहे. सर्वांच्याच मनावर मान्सूनच्या ढगा प्रमाणेच या कोरोनामुळे निराशेचे ढग ☁️ दाटले आहेत. प्रत्येकालाच आपल्या पाल्याच्या भविष्याची काळजी वाटत आहे. जे शिक्षण आपल्या जीवनाला आकार देते ते सर्व शिक्षणच प्रत्यक्ष थांबले आहे.
परंतु यावरती शासनाने सर्वतोपरी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. या क्षेत्रातले शिक्षणतज्ञ ,शासन स्तरावर राबणारे अधिकारी ,तंत्रस्नेही शिक्षक,
सर्व शिक्षक बंधू -भगिनी यासाठी रात्रंदिवस झटत आहेत.
याठिकाणी शासनाने टीव्ही वरती विविध कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे.गतवर्षीही शासनाने विविध उपक्रम राबवले. आणि या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेमध्ये खंड पडू नये यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न केले.
यामध्ये काही पालकांना आपल्या परिस्थितीमुळे भाग घेता आला नाही .अनेकांना मोबाईल वरती किमती मोबाईल डाटा घेता आला नाही. तर अनेकांना किमती मोबाईल खरेदी करता आले नाहीत. त्यामुळे अशा कुटुंबातील पाल्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेमध्ये अडथळा आला.
उद्यापासून सुरू होणारे शैक्षणिक वर्षही अशाच काही आव्हानांना सामोरे जात आहे.
अद्यापही कोरणाचे संकट दूर झालेले नाही याच्यावरती निश्चित असा अजून उपाय नाही.
सारे जगच यावरील उपायात अद्याप तरी चाचपडत आहे.
आणि शहरीभागा बरोबरच ग्रामीण भागात तर हा कोराना जास्तच फोफावू लागला आहे.
आणि यामुळेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेमध्ये हा मोठा अडथळा ठरत आहे. पण यावरती ही उपाय म्हणून ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यासाठी शासनाने आदेश दिले आहेत. आणि त्याचे नियोजन शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे सर्व अधिकारी आणि शिक्षक ,पालक, शाळाव्यवस्थापन समित्या आपापल्या पातळीवरती सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
या विषयाच्या अनुषंगाने
ऑनलाइन शिक्षणाच्या वेळी कोणती काळजी घ्यावी यासंदर्भात काही टिप्स आवर्जून सांगाव्या वाटतात त्या सर्वाचा अंमल केला तर आपल्याला ऑनलाइन शिक्षण ही चांगल्या पद्धतीने घेता येईल .आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेमध्ये निर्माण होणारे अडथळे दूर करता येतील.
यासाठी.....
📌आपल्या कार्यक्षेत्रात इंटरनेट सुरळितरित्या सुरु आहे की नाही याची खात्री करुन घ्यायला हवी.
यासाठी कोणत्या कंपनीची पुर्ण क्षमतेने रेंज असते हे माहिती करुन घ्यायला हवे.
📌कधी -कधी पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे सदर क्षेत्रातील नेटवर्क बंद पडते यासाठी घरात वेगवेगळ्या कंपनीचे कार्ड वापरणे सोयीचे होते.
📌ज्या वेळी ऑनलाईन तास सुरू असतात अशा वेळी आपल्या घरात ज्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने रेंज येते अशा ठिकाणी ऑनलाइन तासासाठी बसण्याचे नियोजन करावे.
📌ऑनलाईन तास सुरू होण्यापूर्वी आपला लॅपटॉप ,मोबाईल पूर्णक्षमतेने चार्जिंग आहे का याची खात्री करून घेणे गरजेचे असते. काही वेळेला बाजारात उपलब्ध असणाऱ्या योग्य पॉवर बँकेचाही आपण वापर करू शकतो.
📌ऑनलाइन शिक्षण असल्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण होऊन काही मुद्दे न समजण्याची शक्यता असते. अशा वेळेला न समजलेला मुद्दा आपल्या शिक्षकांना तास संपल्यानंतर वैयक्तिक फोन करून विचारणे व आपली शंकानिरसन करून घेणे गरजेचे असते.
📌तांत्रिक शिक्षणाला काही मर्यादा असतात यामुळे तुम्हाला शिक्षकांनी पाठवलेल्या लिंक वरती वेळेवर जॉईन होऊन अध्यापन केलेल्या भागाचा पुरेपूर लाभ घेणे महत्त्वाचे असते.
📌काही वेळेला घरामध्ये एकच मोबाईल आणि दोन -दोन पाल्य शिक्षण घेणारे असतात .अशा वेळेला तुमच्या वर्ग शिक्षकांशी संपर्क साधून वेळेचे योग्य नियोजन करून घेणेही गरजेचे असते.
📌काही पालकांच्याकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी ही साधने उपलब्ध नसतात अशा वेळेला कोरोणाची त्रिसूत्री वापरून ( सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर आणि योग्य लेअरचा मास्क वापर) आपल्या शेजारी संबंधित वर्गातील विद्यार्थी कोण आहे का हे पाहून त्या ठिकाणी आपल्या पाल्याची बैठक व्यवस्था करणे गरजेचे असते.
📌शाळेकडून ,शिक्षकांच्या कडून ऑनलाइन तासाच्या पूर्व नियोजनासाठी दिलेल्या सूचनेनुसार त्या -त्या विषयाचे क्रमिक पुस्तक आपल्याजवळ असणे गरजेचे असते. तसेच शिक्षकांच्या कडून शिकवले जाणारी मुद्दे व त्यातील काही ठळक मुद्दे लिहून घेण्यासाठी आपल्याजवळ कागद, पेन, पेन्सिल जवळ ठेवणे गरजेचे असते.
वर दिलेल्या सगळ्या गोष्टींचे पालन आपण व्यवस्थित केले तर ऑफलाइन शिक्षणाऐवजी ऑनलाइन शिक्षण सुरु असणाऱ्या या प्रक्रियेमध्ये आपणाला पूर्ण क्षमतेने सहभागी होता येईल. व आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रक्रियेमध्ये निर्माण होणारे अडथळे दूर करता येताल. व आपली ही शैक्षणिक प्रक्रिया सुरळीत सुरू राहून आपणाला या प्रवाहात राहता येईल.
◾एकूणच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जशी खंत आहे तशी तमाम शिक्षकांनाही आपण प्रत्यक्ष भेटत नसल्याची, प्रत्यक्ष अध्ययन - अध्यापन प्रक्रिया होत नसल्याची खंत आहे.
आपल्या सर्वांच्याच गैरहजेरीमुळे किंवा आपल्याला प्रत्यक्ष शाळेत जाता येत नसल्यामुळे सगळ्या शाळा कशा सुन्यासुन्या झालेल्या आहेत. पण कोरोणाच्या जागतिक महामारी मुळे आपल्यासमोर पर्याय नाही .जे जे पर्याय उपलब्ध आहेत ते पर्याय शोधून आपण आपली शैक्षणिक प्रक्रिया कशी सुरळीत पार पडेल याची सगळ्यांनीच काळजी घेऊया एवढेच !
आपल्या या नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनी, विद्यार्थी ,पालक, शाळा व्यवस्थापन समित्या, या क्षेत्रात कार्य करणारे सर्व कर्मचारी ,अधिकारी या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
काळजी करू नका , मात्र काळजी जरुर घ्या !सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर आणि योग्य लेअरचा मास्क वापर या त्रिसूत्रीचा अंमल करा.ही सर्वांना विनंती,कारण दिवस खूपच वाईट आहेत.सर्वांना आधार देत राहूया !
- धनाजी माने.....✍️





















