Wednesday, May 12, 2021

🐱टिली - मिली🐱

 











 📌 माणुसकीच्या नात्याने माणूस केवळ माणसाशीच नव्हे, तर प्राण्यांशी नातेसंबंध जोडत असतो. ज्यांच्या घरात पाळीव प्राणी असेल, तर तो त्या कुटुंबाचा एक सदस्यच होतो. घरातील एखाद्या लहान मुलाला ज्याप्रमाणे जिव्हाळा लावला जातो, प्रेम दिले जाते, त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यावर प्रेम केले जाते. घरोघरी पाळले जाणारे पाळीव प्राणी हे जेव्हा आपल्या घरच्या सदस्यासारखे घरात वावरतात तेव्हा आपल्या जवळच्या माणसासारखीच आपण त्यांची काळजी घेतो, #लळा लावतो ,प्रेम देतो.आणि तेवढाच किंबहूना त्यापेक्षाही जास्त ते लळा लावतात.मग ते #गाय, #बैल,#म्हैस, #कुत्रा ,#मांजर किंवा अन्य प्राणी.......आणि हे परस्परांत जिव्हाळ्याचे, मैत्रीचे नाते अगदी घट्ट होते.असेच नाते घट्ट झाले ' टीली- मिली ' यांच्याशी.ते तसे शब्दात नाही मांडता येत ,  अनुभवावेच लागते.........✍️

📌 सत्यघटनेवर आधारित......

टिली - मिली 

'टिली' गेली ......😥आणि मिलीसह सारेच बेचैन झाले....

४ फेब्रुवारी २१ ची ती रात्र...टिली त्या दिवशी खूप खेळली , घराच्या परिसरामध्ये खूप बागडली.त्या रात्री ती आमच्या घरातील आई, पत्नी ,मुलगा , मुलगी यांच्याबरोबर खूप बोलली (तिच्या भाषेत..मँव~मँव~) आणि आम्हीही.कुणालाच कुणाची भाषा  कळतं नव्हती पण आम्ही तिच्याशी आणि ती आमच्याशी बोलत होतो.

ती एक महिन्याची असल्यापासून बोलतचं होतो.(ती तिच्या #मातृभाषेतून....आम्ही आमच्या मातृभाषेतून...) 

आम्हाला तिने लावलेला लळा  आणि आमचा तिच्याशी निर्माण झालेला  लळा, यामुळे आमचा आणि तिचा #भावनिक #गुंता खूप निर्माण झाला होता.आणि त्याचमुळे तिची आम्हाला आणि आमची तिला भाषा कळत होती.

' जर आपण एखाद्यावर #जीवापाड प्रेम करत असु तर, समोर कोणीही असो , त्याची आपल्याला मुकी भाषाही सर्वकाही समजते याचे प्रत्यक्ष प्रत्यंतर त्या दिवशी आले.

तिचे बोलून झाले ..... ती खेळतच होती.

शेवटी ती येईल,नेहमीसारखी दारावर #आवाज करेल अशी आशा ठेऊन  तिच्यासाठी ति घरात येणारे घराचे दार उघडे ठेऊन,आम्ही सर्वजण झोपण्यासाठी घरी आलो.

तास.... दोन....तीन तास झाले. रात्रीचे १२ …...१.....२ झाले.  त्या रात्री 'टिली' घरी आलीच नाही.

आम्ही ती खेळत असलेल्या जागेवरुन जाऊन आलो तिथेही 'टिली'  दिसली नाही.

 मग मात्र....

आमच्या मनात कालवा- कालव सुरू झाली.ति रात्र खूप झालेने आम्ही तशीच काढली.सकाळपासून मात्र तिचा शोध सुरू झाला.तो दिवस ती #रात्र गेली. 'टिली' काही घरी परत आली नाही. आसपास शोधूनही सापडलीच नाही.

दुसऱ्या दिवशी आम्ही , राहतो त्या परिसरात इस्लामपुरातील, महादेवनगर मद्धे बरेच फिरलो. .परिसर,परिसरातील सोसायट्या मधून शोध घेतला.अनेकांना टीलीचे फोटो दाखवले.ती आमच्या बरोबर गेल्या सात महिन्यात आंगा ,खांद्यावर  खेळलेले video दाखवले. आणि कुठे दिसली सापडली तर कळवा.सोबत आमचा संपर्क फोन दिला.

 तिचे वैशिष्ट्ये म्हणजे टिली रंगाने अगदी सावळी नव्हे तर काळीकुट्ट , पण तिचे गुण मात्र माणसाच्या भावनांना साद घालणारे ,मनाला पाझर फोडणारे होते.....त्यावेळी समजले की एखाद्याच्या काळ्या किंवा गोऱ्या रंगापेक्षाही , अंगभूत असणारे माणुसकीचे ,आपलेपणाचे गुणच श्रेष्ठ असतात.

"आमची लाडकी काळी कुट्ट गुणवान टिली.....त्या दिवशी ती, तिच्या गैरहजेरीत खूप मोठी वाटली."

खरचं.....एखाद्या गोष्टीचे ,वस्तुचे,व्यक्तीचे महत्व आणि मोल ती नसतानाच  जाणवते.शेवटी.......ती रात्रही तशीच गेली.गेली दोन दिवस घरातील वातावरण अगदी उदास होते.कुणाला #अन्न गोड लागले नाही. आई ,पत्नी, मुलगा, मुलगी कोणीच समाधानकारक जेवले नाहीत.

घरचा ,आपल्याच कुटुंबातील एक सदस्य तोही सर्वावर निस्वार्थ भावनेणे प्रेम करणारा हरवला होता ,की..... कायमचा सोडून गेला होता ही घालमेल आमच्या प्रत्येकाच्या मनात होती.

टिलीला एखाद्या कुत्र्याने  खाल्ले तर नसेल ना ? तिला काहीतरी खाऊन #विषबाधा तर झाली नसेल ना ? असे नको ते प्रश्न मनात काहूर माजवू लागले.तिच्या आठवणी येऊन आम्ही सर्वच व्यथित झालो.

टिलीच्या बहिणीने 'मिलीने' तर , एक घास नाही तर तिने पाणीही वर्ज केले. 'टिलीच्या ' नसण्याने 'मिलीची' घालमेल आम्हाला पाहावत नव्हती. सारखे तिचे मँव~~~ मँव ~~~~दोन्ही बहिणींच्या विरहाचा संकेत देत होते.

तीची ती नि:शब्द घालमेल आम्हाला बरच काही सांगून जात होती.डोळ्यातून  पाणी आल्यासारख .आवाज कापरा #दर्दभरी झाला होता. तिच मँव~ मँव काय थांबत नव्हत.

माझ्या मुलाचे - मुलीचे तिचे ते बोल  ऐकूण  डोळे पाणावले.तिला जवळ घेतले , त्यांनी तिला गोंजारले।मग आमच्याही डोळ्याच्या कडा.आपोआपच पानावल्या.

आम्हाला टिलीची #उणीव खूपच भासू लागली.कारण ,कोरोणाच्या महामारीच्या काळात सार जग थांबलं होते.माणसचं माणसाजवळ जात नव्हती.कुणालाच कुणाचा कसलाच भरोसा नव्हता.

आपल्या डोळ्यादेखत आपलीच माणसं आपल्याला सोडून जात होती.कायमची नजरेआड होत होती.प्रत्येकालाच आपला मृत्यू समोर दिसत होता.आणि याचा पहिला मोठा फटका इस्लामपूरला बसला होता.भारतात आणि भारताबाहेरही दखल घ्यावी अशी अवस्था इस्लामपूरमद्धे झाली होती.

ऑगस्ट २०२० तर इस्लामपूर व सांगली जिल्हा कोव्हिडने घडणाऱ्या मृत्युच्या दरात जगात आघाडीवर होता.सांगली जिल्ह्यात हाहाःकार माजला होता.डोळ्यादेखत आपल्याच गोतावळ्यातील आपली माणसं आपल्याला सोडून जात होती , परत कधीच न येण्याच्या प्रवासाला निघून जात होती.मनात सर्वांच्याच काहूर माजल होत.काळोख दाटून आलं होतं.........

आणि अशा भितीदायक वातावरणातच काळ्याकुट्ट 'टिलीचा ' आणि 'पांढऱ्या रंगाच्या ' मिलीचा आमच्या घरात प्रवेश झाला होता.

मुलाच्या मित्राने  , ही टिली , मिलीची जोडी  आम्हा घरी पोहच केली होती.'माणसाने, माणसाशी , माणसासम वागणे !'या न्यायाने , जगात माणुसकी हाच फक्त एकमेव धर्म आहे .प्रेमाने जग जिंकता येते.माणुसकी जपता येते.प्रेम हीच भाषा सर्व काही देऊन जाते .हे या सर्व विविध प्रसंगातून समजले.

 या टिली - मिलीने गेल्या सात महिन्याच्या सानिध्यात ,अशा #भयाण काळात, आम्हाला लळा लावला.जीव लावला.एका पॅनिक - भितीदायक अशा वातावरणात ज्याची खूप गरज होती  त्या प्रेमाची,मायेची ,आपुलकीची मोठी साथ माणसाणपेक्षाही या आमच्या ' टिली-मीलीने ' दिली होती .

माणसचं माणसाजवळ येत नव्हती तेव्हा टिली- मिली या दोघीच आमच्या सोबत , सावलीसारख्या सोबत देत राहिल्या होत्या.खेळत होत्या ,त्यांच्या भाषेत का असेना काहीतरी बोलत होत्या.जवळ येऊन अंगाला घासायच्या ,पायाजवळ येऊन हट्ट करायच्या काही तरी मागायच्या.

आणि म्हणूनच टिलीचे आमच्यात आता नसने हे, मिलीबरोबरच आम्हालाही #बेचैन करुन गेले होते.घरातलंच एक माणूस निघून गेल्याचं जाणवत होतंं.

घरात मयतं व्हाव आणि आपलं माणूस परत कधी येणार नाही या विषन्न अवस्थेत आमचं कुटूंब होतं.घरात अन्न शिजत होत पण ,घशाखाली उतरत नव्हतं.मिलीनेही दोन-तीन दिवस काहीच खाल्ले नव्हते.

टिलीच्या आवाजाचा... घरातून फिरण्याचा... बोलवल्यानंतर जवळ #मांडीवर...खांद्यावर बसल्याचा.... भास होत होता.पण टिली काही दिसत नव्हती....

नुसता तो भासचं होता.

आम्ही मात्र गेली तीन दिवसं 'टिली ' कुठून ना कुठून येईलं या आशेने, ती दारातून घरात प्रवेश करेल एवढं घराचं दार , रात्रनं - दिवसं उघड ठेवल होतं.१७ तारखेची ती पहाटं, घड्याळात #पहाटेचे सव्वाचार वाजले होते.आम्ही जागेच होतो.

'आपलं प्रेम करणार, आपलं माणूस, आपल्यातं नसतं... तेव्हा आपल्याला झोप लागते का हो ? आम्हाला तर कशी लागेलं...?

 मिलीचीही घालमेल सुरुच होती.ती गेली दोन-तीन दिवस बेचैनच होती.ती ही जागीच राहत होती.फक्त तीला  तिच्या भावना शब्दात व्यक्त करता येत नव्हत्या.

तिची सख्खी बहिण तिला सोडून गेली होती ना!

शेवटी नियतीलाही हे पहावले नसेल , तीन दिवसापासून कठोर झालेल्या नियतीने , दया दाखवली असेल......#चमत्कार व्हावा तशीच घटना घडली.

आणि अचानक...... टिलीचा आवाज कानावर आला.आम्ही झोपेतच पत्नीने -मुलाला,मुलाने-मला, मी- मुलीला ,मुलीने-आईला सांगितले टिलीचा आवाज येतोय..... टिली आली की कायं?

घरातील #लाईट लावल्या तर काय #आश्चर्य

आवाजा बरोबर टिलीही समोर दिसत होती.डोळ्यावर विश्वासच बसेना. हे पहाटेचे स्वप्न तर नाही ना? असेच काही काळ वाटले.टिली अचानक समोर असल्याचे काही क्षण मन स्वीकारतच नव्हते.

पण....ते वास्तव सत्यच होतं , आमची टीली समोर होती.सर्वांच्या आनंदाचा पारावार राहिला नाही. ती पहाट आनंदाने उजळून निघाली.तो  आनंदाचा #माहोल काही वेगळाच होता.....

' आपलं घरच कोणीतरी सिरीयस पेशंट , व्हेंटिलेटरवर शेवटच्या #घटिका मोजत निपचीत पडल असावं ,आणि आपण फक्त बाहेर त्याच्यासाठी #प्रार्थना करत बसाव ,व दोन तीन दिवसांनी धोका टळून ,आपल माणूस आता ,बोलू लागलय, खाऊ लागलयं ही गोष्ट डॉक्टरांनी सांगावी आणि आपल्या आनंदाला पारावार न उरावा . तसचं काहीस टीलीच्या अचानक येण्याने. अगदी तसाच आनंद टिली आल्याने झाला.

प्रत्येकाने तिला कवटाळले.मगं मिलीने तिला जवळ घेतले.मिली तिला तिच्या बहिणीला टीलीला चाटू लागली.त्यांच्या भाषेत त्या बोलू लागल्या.

मिली तिला सांगत असावी, ' टिली तू कुठे गेली होतीस गं? तिन दिवस झाले ! आग वेडे मला सांगून तर जायचेस ना !'

'अगं टिले ,आम्ही प्रत्येक क्षण कसा काढला , तुला काय कळणार '

त्यावर 'टिली ' ही सांगत असावी ,"आगं माझीही तिच अवस्था झाली होती. मलाही घरचा रस्ता सापडत नव्हता, मी खूप भटकत होते बाई , खूप दमले ग मी."

" मी तर कुठे तीन दिवसं झाले, कुठे काय नाही खाल्ले गं ?.चला मला काही तरी खायला द्या !"

बेजार झालेली ,दमलेली, अशक्त झालेली टीली , आपल्या बहिणीला असचं काही सांगत असावी.

टिलीला.... मुलीने दुधाचा वाडगा भरुन दिला.पोटभर #दुध प्यायली आणि ती पुन्हा आमच्या #छत्र छायेत विसावली !

खरचं , #मुक्या प्राण्याला आपण प्रेम दिलं ,#लळा लावला तर तीही आपल्याला तेवढच नव्हे तर त्याहूनही अधिकच भरभरून प्रेम देतात आणि लळाही लावतात.......माणसापेक्षाही जास्त. 

या  प्रण्यांना बोलता येत नसल तरी, त्यांच निस्वार्थी प्रेम, माया ,आपुलकी आणि लावलेला लळा ते अगदी बरोबर ती आपल्या कृतीतून व्यक्त  करतात हे नक्की !

फक्त ते माणुसकीच्या व मानवतेच्या नात्याने माणसाला जाणता यायला हवं ,पाहता यायला हवं एवढंच !



- धनाजी माने........✍️


dhanajimane.blogspot.com


9 comments:

Manoj patil said...

Khupp mast Kaka 🥰

JAYHO-DHANANJAYA said...

🙏Thanks

Umesh said...

Heart touching and Loveable

Unknown said...

मस्त आहे 👌👌

किरण सुभाष चव्हाण said...

मुक्या प्राण्यांच्यावरच्या मायेचं हा उत्कट नमुना आहे..मायेला बंधन नाही..जीवलगांच्या बरोबरीने आपण मुक्या प्राण्यांवरही जीवापाड प्रेम करताय त्यांची काळजी घेताय याचे हे सुंदर उदाहरण आहे.. टिली जाते आणि सगळ्यांची उलाघाल होते..पुन्हा येते आणि स्वर्गसुखाची अनुभूती येते...जीवनात प्रेम असेल तर मुके जीव ही आपले सहप्रवासी होऊ शकतात..खुप सुंदर कथा👌👌👌

Unknown said...

👌👌👍👍🌹🌹

JAYHO-DHANANJAYA said...

🙏

Unknown said...

खूपच छान हृदयस्पर्शी

Unknown said...

छानच शब्दांकन

भैरवनाथ यात्रा अंकोली ता.मोहोळ जि.सोलापूर

भैरवनाथाच्या नावानं चांगभल....... #मोहोळ तालुक्यातील मौजे #अंकोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी शुक्रवार ...