📌 २६ जुलै २००५ च्या महाप्रलयंकारी पावसानंतर २९ ऑगस्ट २०१७ च्या धुवाँधार पावसाने मुंबईसह राज्याला तोच वाईट अनुभव दिला. आणि १९ सप्टेंबर २०१७ च्या पावसाने तीच धडकी भरवली. मुंबई, ठाण्यासह कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला धुवाँधार पावसाने धुऊन काढले.
◾वारणा व कृष्णा...... अशा महाराष्ट्रातील अनेक नद्यांना महापुर आला. आणि सर्वत्र महापुराची गंभीर स्थिती निर्माण झाली ,अनेक लोकांना ,दावणीच्या जनावरांना आपले प्राण गमवावे लागले ,अनेकांचे संसार उघड्यावर पडले........
ही व्यथा आणि ज्यांच्यामुळेचे धरती सुजलाम् -सुफलाम् त्यांच्याच मगरमिठीत
हा भाग सापडला.......
पंचगंगा ,वारणा आणि कृष्णामायं.......
सांगा आम्ही ,पाप असं केल कायं?
काठावरच्या तुमच्या गावांना,
विळखा तुम्ही दिलायं,
मगरमिठीचा फास तुम्ही,
असा घट्ट आवळलायं.
सांगा ,पाप असं केल कायं?
गुराढोरांचा , दावणीच्या जणावरांचा,
पोटच्या पोरांचा,हजारो लोकांचा,
जीव तुम्ही टांगणीला लावलायं,
काहींच्यातर ,तुम्ही जीवाव बेतलायं.
सांगा ,पाप असं केल कायं?
इंचाइंचाने , फुटाफुटाने ,
सारा भागचं , तुम्ही कवेत घेतलायं
पुराच्या पाण्यात, आमची आसवचं,
दिसणार नाहीत ,असा डावं खेळलायं.
सांगा ,पाप असं केल कायं?
ती गाई-गुर आणि दुभती जनावरं,
सोबत तुम्ही घेऊन जाताना,
हतबलं होऊन पाहतो आहे,
अक्रोश आमचा आजून सुरुच आहे.
ब्रम्हनाळ मद्धे तर, खूपच कोपला,
कुणाची मायं ,कुणाच लेकरु
आपल्या कवेत घेऊन गेला.
कायमची ताटातूट अशी का,करुन गेला.
विनवनी एवढीच , आमची तुम्हाला,
या विळख्यातून सोडवा आम्हाला.
पुन्हा नका असे घेऊ , कवेत कुणाला,
खूप वर्षे लागतात हो, यातून सावरायला !!
- धनाजी माने ....✍️

2 comments:
मस्तच सर
👌
Post a Comment