विशेष संवर्ग भाग दोन चे निकष
विशेष संवर्ग भाग दोन चे निकष
जनता म्हणते.......
#नेते आणि #राज्यकर्ते हवेत,
माझ्या #शाहू -फुले....
#आंबेडकरान सारखे आणि
#छत्रपती शिवबान सारखे
नकोत नुसतेच एक - दुसऱ्यावर ,
ओरडून तेढ निर्माण करणारे.
#मना-मनात आणि #जाती-धर्मात
#भिंती घालून ,आपली #पोळी भाजणारे.
घ्यावेत #आदर्श थोडेतरी #शिवछत्रपतींचे,
अठरा #पगड जातींना एकत्र बांधण्याचे.
व्हावे त्यांच्याच सारखे #रयतेचे राजे ,
रयतेसाठी #जगणारे ,आणि रयतेसाठीच #मरणारे.
असे नेते नको आहेत जनतेला,
#भेदाभेद निर्माण करून,
#सुरुंग लावतात ऐक्याला.
#संघर्ष माजवून,खतपाणी घालतात #दुहीला
संघर्ष जरूर असावा ....
तो बाबासाहेबांनी सांगितलेला,
#शिका, #संघटीत व्हा ! आणि #लढा!
या पावलावर #पाऊल टाकणारा
#जनता म्हणते नेते हवेत असे आम्हाला.
मंदिरातील देवाइतकेच, #अल्लालाही माणणारे.
आणि........
मशीदीतील #अल्लाप्रेमी, #चालीशात #रमणारे.
लोक म्हणतात नेत्यांनी,
जरूर ओढावेत #आसूड,
#महात्मा फुल्यांच्या आसूडांनसारखे,
चुकीच्या परंपरांनवर #प्रहार करणारे.
आहो , #भोंगे काढून किंवा #चालीसा म्हणून,
जनता कधीच सुखी होणार नाही.
#शाहू राजांनसारखी , रयतेची काळजी केल्याशिवाय,
#सर्वसामान्य ,#गोरगरीब #सुखी कधीच होणार नाही.
- #धनाजी माने ....✍️
9403963934
dhanajimane123@gmail.com
#पावनखिंडीकडे रवाना झालो. या भूमीत #बाजीप्रभू देशपांडे धारातीर्थी पडले आणि स्वराज्यासाठी कामी आले त्या रोमांचकारी इतिहासाची साक्ष असणाऱ्या धारातीर्थी भूमीत पोहचलो.
११ मे रोजी संयोजकांचे सूचनेप्रमाणे आम्ही कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे पोचलो. त्या ठिकाणी देवेंद्र #जावडेकर यांनी आमचे फॉर्म भरून घेतले. बँगवर लावण्यासाठी नंबरचा टॅग व टोपी दिली. ओंकार गवळी, पारस जाधव यांची भेट झाली. उदय गायकवाड यांनी आम्हा पर्यटकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आणि दोन आरामबसमधून पहिल्या दिवशीचा प्रवास सुरू झाला.
काही वेळातच आम्ही कोल्हापूरच्या उत्तरेला #जोतिबाच्या डोंगरकुशीत पोहाळे येथे पोहोचलो. त्याठिकाणी प्राचीन बौद्धकालीन गुहा पाहिली. पाण्याची दोन टाके, चैत्यगृह, पाठशाळा हा परिसर पाहून आम्ही
पावनखिंडीकडे रवाना झालो. या भूमीत बाजीप्रभू देशपांडे धारातीर्थी पडले आणि स्वराज्यासाठी कामी आले त्या रोमांचकारी इतिहासाची साक्ष असणाऱ्या #धारातीर्थी भूमीत पोहचलो.
पुढे आमचा प्रवास अनुस्कुराकडे सुरू झाला. त्या ठिकाणी आम्ही #फरसबंदी 'सातवाहन कालीन मार्ग पाहिला. #सातवाहनाच्या काळात बांधल्या गेलेला फरसबंदी मार्गावरून घोडा, गाढवाच्या पाठीवरून त्या काळात येथून वाहतूक होत होती. घाटाच्या तोंडाशी त्या काळात करवसुली केली जात असे. या ठिकाणी एक #शिलालेख, पाण्याचे कुंड व #उगवाईचे मंदिर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी मुख्य रस्त्यापासून काही भाग जंगलातून चालत जावा लागला. यावेळी #करवंदे, #आंबा, #फणस, #काजू, #अंजन, #कांचन वृक्षांची #घनदाट वृक्षराईतून प्रवेश केला. यावेळी निसर्गाचा वेगळा आविष्कार अनुभवता आला.
पहिल्या दिवशीच्या सहलीनंतर आम्ही रात्री सव्वा सातच्या दरम्यान बसमधील साहित्य घेऊन एका मधल्या मार्गाने चालत जंगलातून वाट काढत - सर्वांच्या हातात #मोबाइल #टॉर्च लावून काळम्मवाडी येथील विश्रामगृहावर मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो. टॉर्च लावून रात्रीच्या वेळी केलेला एक किलोमीटरचा प्रवास रोमांचकारी आणि अविस्मरणीय होता. मुक्कामाच्या ठिकाणी जेवणाची, रहाण्याची व्यवस्था संयोजकांनी खूपच चांगली केली होती.
दुसऱ्या दिवशी पहाटे उठून सगळ्यांनी सकाळी साडेसहा वाजता नाष्टा केला.त्या दिवशीचा प्रवास बरोबर सात वाजता सुरू झाला. या दिवशीची पहिली भेट #शिवडाव येथील देवराई येथे दिली. त्या ठिकाणी विविध वनस्पतींनी व्यापलेला परिसर, विविध पक्ष्यांचे #आवाज वेगळा अनुभव देऊन जातात. या परिसराची उदय गायकवाड यांनी माहिती दिली.
यानंतर आम्ही मौनी महाराजांच्या आणि #छत्रपती शिवरायांच्या सानिध्याने पुनीत झालेल्या #भुदरगड तालुक्यातील #वेदगंगा नदीच्या काठावर असणाऱ्या #पाटगाव मधील #मौनी महाराजांच्या समाधी स्थळी पोहोचलो याठिकाणी महाद्वार, सभामंडप,कोरीव खांबांच्या सजावटी पाहिल्या. हा परिसर शांततेचे आणि पावित्र्याचे प्रत्यंतर देत होता.
या पवित्र भूमीनंतर आमचा प्रवास सुरू झाला........
#नेसरी येथील #सरसेनापती #प्रतापराव गुजर यांच्या युद्धभूमी स्मारकाकडे या परिसरामध्ये बाग बगीचा, ऐतिहासिक प्रतिकृती, प्रतापराव गुजर यांचे #स्मारक पाहिले.
त्यानंतर आजरा तालुक्यातील शिरसंगी या गावात असलेल्या महाकाय वटवृक्षाच्या छायेत काही काळ व्यतीत केला. शेकडो वर्षाचा हा साक्षीदार वसुंधरेचं संरक्षण करत अनेक पक्ष्यांचा निवारा बनत, आपली मुळे पारंब्या घट्ट जमिनीत रोवून खड़ा आहे. या वडाच्या झाडाच्या पारंब्या जमिनीपर्यंत पोचल्या आहेत आणि त्याला पुन्हा खोडाचा आकार प्राप्त झाला आहे. जवळजवळ एक एकरापेक्षाही जास्त जागेत या वटवृक्षाने आपल्या पारंब्या जमिनीत घट्ट रोवल्या आहेत. व आपल्या आक्राळ-विक्राळ रुपाचे दर्शन देत आहे. असा #वटवृक्ष माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच पाहिला. प्रत्येकाने आयुष्यात येऊन निसर्गाच्या शक्तीचे व वडाच्या महाकाय रूपाचे दर्शन घ्यायचे असेल तर हा वृक्ष पाहिलाच पाहिजे असे मला वाटते.
पुढे आम्ही अवघड घाट चढत कोल्हापूरपासून दक्षिणेस ५० किमी अंतरावर व #गारगोटी पासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या #पुष्पनगर गावाजवळून प्रवास करत #भुदरगड किल्ल्यावर पोहोचलो. या किल्ल्यावरून चारी बाजूंचे निसर्गाचे सौंदर्य पाहता येते. या ठिकाणी शिवमंदिर, भैरव मंदिर, तटबंदीचे काही अवशेष व दूधसागर तलाव अशी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.
या ठिकाणी सर्व पर्यटकांना एकत्र घेऊन समारोपाचा छोटासा कार्यक्रम झाला. पर्यटकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भुदरगडगड ते कोल्हापूर परतीचा प्रवास सुरू झाला.
रात्री साडेआठच्या दरम्यान आम्ही कोल्हापुरात पोहोचलो आणि आमची सहल संपली.
या दोन दिवसांमध्ये प्राचीन #गुहा, #गड, #शिल्पे, #युद्धभूमी, मंदिरांचे व #जंगल दर्शन झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील #हातकणंगले, #शिरोळ, #कागल हे तीन तालुके वगळता इतर सर्व नऊ तालुक्यांचा जवळजवळ चारशे ते पाचशे किलोमीटरचा प्रवास झाला.
या पैकी ९० ते १०० किलोमीटर प्रवास निसर्गाच्या सान्निध्यात जंगलातून झाला. दोन ते तीन किलोमीटर घनदाट #जंगल ट्रेकचा अनुभव घेतला.
या प्रवासात आम्हाला नाचणीची #भाकरी, #मेतकुट, आमटी-भात, पिटले, #दही-खर्डा, कैरीचे लोणचे, #पापड यांचा आस्वाद घेता आला.
प्रवासामध्ये पर्यटकांच्या सेवेसाठी संयोजक प्रमोद पाटील, उदय गायकवाड, ओमकार गवळी, पारस जाधव, ऋतू काशिद, तनिष्का बेंडके, रणजित पाटील, गणेश व विविध बचत गट या सर्व टीमने आम्हा पर्यटकांना पर्यटणातील प्रत्येक टप्यावर चांगली सेवा दिली.
एकूणचं ही दोन दिवसाची आडवाटेवची सहल, महाराष्ट्रातील विविध तालुक्यातील सहभागी शेकडो साथिदारांच्या साक्षिने अविस्मरणीय ठरली.
- धनाजी माने .....✍️
( माझा हा.लेख ...पूर्वप्रकाशित- महाराष्ट्र टाईम्स )
वाहन म्हटल की वाहतुकीसाठी किंवा प्रवासासाठी असलेले #साधन. वाहनांचे विविध प्रकार आहेत.
#सायकल,#दुचाकी,#स्कूटर,#मोटार कार
मराठीत अनेक प्रकारे वाहनांची ओळख अहे
#वडाप म्हटल की, दहा - वीस लोकांनी खचाखच भरलेली प्रवासी वाहतूक करणारी गाडी.#टूरटूर - ऑटो रिक्षा,$फटफट यामध्ये #बाईक, #दुचाकी,#स्कुटी
#टमटम ,डुग /#डूगडूग ,#लाल परी ,#आराम गाडी - #लक्झरी बस ,#मुंगळा ,#छोटा हत्ती असे अशी अनेक विविध प्रकारचे बिरुद घेऊन ही वाहन आपल्या सभोवताली इकडून -तिकडं मिरवत असतात यातून अनेक #प्रवासी #प्रवास करत असतात.........
माझा गाडी घेण्याचा प्रवास तसा #सायकल पासून झाला. आयुष्यात मी पहिल्यांदा सायकल घेतली २२ इंची हिरोची . सायकलवरून प्रवास करताना आपल्याला कधी #मोटारसायकल मिळेल का? आपल्यालाही चारचाकीमधून कुटुंबासमवेत फिरता येईल का? असे प्रश्न पडायचे. कारण घरची परिस्थिती गरिबीची, #वडिलार्जित शेती भरपूर असूनही तीसुद्धा कोरडवाहू त्यावेळी इरिगेशन व्हायचे होते त्यामुळे शेती रामभरोशे........ आता त्याच शेतीमुळे मोठी स्पप्नेही पाहू शकतो , कारण बागायती झाली शेकडो टणाचे ऊसाचे उत्पन्न देते.
पण....त्यावेळी दुचाकीचीही अशी स्वप्ने बघणेही तसे आवाक्याबाहेरचे होते.
रोजच्या जगण्यासाठी संघर्ष सुरु होता आणि यासाठी तरतूद नव्हती.
पण #प्राथमिक शिक्षक म्हणून #कोल्हापूर $जिल्हा परिषदेच्या $चंदगड तालुक्यातील $उत्साळी येथे शाळेत नोकरी लागली. आणि जीवनाला थोडी कलाटणी मिळाली ,इकडे गावातही #इरिगेशन आले कोरडवाहू शेती हळूहळू हिरवा शालू नेसू लागली . तीन वर्षे अशीच निघून गेली कारण पगाराचा बेसिक १२०० आणि वर्षाची वेतनवाढ ३० रु. मेळ घालण्यात हा काळ निघून गेला.शेतीही चांगली पिकू लागली,भरघोस #उत्पन्न सुरु झाले .
अखेर #दुचाकी घेण्याचे पहिले स्वप्न सत्यात उतरवले.
आमच्या घराण्यात तशी ती पहिलीच गाडी. २१ व्या शतकाला नुसतीच सुरुवात झाली होती. त्या काळात #Bajaj स्कूटर, M-80, HERO - HONDA (त्यावेळी या कंपण्या एकत्र होत्या) अशा मोटारसायकली त्या काळात लोक वापरत. मित्रांबरोबर चर्चा केली, लोकांच्या गाडीबाबतच्या प्रतिक्रिया ऐकल्या आणि हिरो होंडा कंपनीची स्प्लेंटर गाडी घ्यायचे निश्चित झाले.
२००१ चा मे महिना होता. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागली होती.चंदगड वरुन गावी आलो, सांगली ,कोल्हापूरची वेगवेळी शोरुम पाहिली,गाडीचे रंग पाहिले आणि काळ्या रंगाची गाडी घ्यायचे निश्चित झाले. शेवटी ' रंगावर काय असते हो , सारे काही मेळ गुणावरुनच जुळतात ना ! ' अखेर तिचे अन् माझे गुण जुळलेत व जुळले होते हे तिने आजही दाखवून दिले आहे ! '
१९ तारीख उजाडली माझी पहिली हिरो होंडा स्प्लेंडर गाडी दारात आली. घरात आनंदी- आनंद झाला. पूजन झाले , गाडी घरात आली .
एखाद्याच्या आपल्या आयुष्यात येण्याने आपली भरभराट होते प्रगती होते अशी श्रद्धा अनेकांच्या मनात असते. तशी ती माझ्याही मनात रुजली.आणि ती भावना तिच्याबाबत (माझ्या #Splender 5755 ) आजही माझ्या मनात असल्याने तब्बल २१ वर्षे झाली तरी आजही माझ्याकडे माझी $हिरो - होंडा #स्प्लेंडर पूर्वीसारखीच सेवा देत आहे..
तिच्यावरून आजअखेर मी लाखो किलोमीटरचा प्रवास केला. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी तिच्यासोबत प्रवास केला; पण कधीही तिने दगा दिला नाही. मित्रासोबत, पत्नी , मुलांसोबत कोकण दर्शन ,#गणपतपुळे, नोकरीनिमित्त प्रवास केला.
कोल्हापूर ( चंदगड,#दाटे ,#आडकूर,#विंझणे,#आलबादेवी,#नेसरी, #पन्हाळा,
#जोतिबा,#नरसिंहवाडी,आळते,#हातकणंगले,#शिरोली,#घुणकी) #सोलापूर (#पंढरपूर,#बार्शी ,#अंकोली ) #औदुंबर.... अशा अनेक ठिकाणी गेल्या २१ वर्षांत लाखो किलोमीटरचा प्रवास केला; पण तिने कधीही मला धोका दिला नाही.
'सजीव माणसं #धोका देतील आणि देतात ही ,पण तिने नाही दिला ! '
आज तिच्याच पायगुणामुळे घरात दसऱ्या दुचाकी, #चारचाकी गाड्या आहेत. पण तीच्यावरची-स्प्लेंडरवरची #श्रद्धा आजही कमी झाली नाही. तिने दिलेल्या आतापर्यंतच्या #निर्धोक सेवेमुळे ती आजही तेवढीच माझ्या मनात घर करून आहे. तिच्यावरच प्रेम थोडही कमी नाही झाले.आपण जशी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतो, तशी तिच्याही आरोग्याची काळजी मी घेतली आणि आजही घेतो.
वेळच्या वेळी धुणे, #सर्व्हिसिंग, जुना झालेला पार्ट वेळच्यावेळी बदलणे अशी काळजी घेतल्यामुळे आजही ती सुस्थितीत आहे. रंग थोडा फिक्का पडला आहे. तरीही इंजिन आजही चांगले आहे. कागदोपत्रीही तिचा परवानाही १५ वर्षांचा संपल्यानंतर पुन्हा पाच वर्षांचा वाढवून घेतला आहे. एकूणच वेळच्यावेळी मी तिची काळजी घेतल्याने तिनेही माझी काळजी घेतली.
आजही पुर्वीप्रमाणे तिचे अन् माझे #गुण जुळलेलेच आहेत.दुसऱ्या नव्या दुचाकी, चारचाकी गाड्या दारात आल्या म्हणून मी तिला नाही मी विसरलो कि अंतर दिले. तिने दिलेल्या या सेवेबद्दल मी तिचा खूप-खूप आजही #ऋणी आहे.आणि असायलाच हव ना?
कारण ' माणसानं कृतज्ञ असावे कृतघ्न असू नये ! ' हो ना ?
- धनाजी माने. .....✍️
( माझा हा लेख पुर्वप्रकाशित ...महाराष्ट्र टाईम्स )
नराधम आणि......आपल्या लाडक्या लेकी,बहिणी .....?
१ नोव्हेंबर २१ चे दैनिक उघडले आणि या दैनिकामध्ये ' रिजन अपडेट ' मध्ये एक बातमी वाचनात आली मन सुन्न करणारी बातमी ....
आपण राहत असलेल्या #वाळवा तालुक्यालगतच्या #हातकणंगले तालुक्यातील #खोची येथील ही दुर्दैवी घटना वाचून मन सुन्न झाले .
सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण खून केल्याची घटना खोची (ता. हातकणंगले) येथे घडली. या #दुर्दैवी आणि धक्कादायक घटनेने सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे .
त्या कुटुंबातील एकुलती एक आणि लाडाची लेक अशा अवस्थेत पाहून तीच्या आईवडिलांनी अक्षरशः #आक्रोश केला होता . हृदय पिळवटून टाकणारी घटना खरंच माणुसकीला काळीमा फासणारी आहे .
ती मुलगीसर्वांना आपुलकीने बोलवणारी
बोलकी, हुशार होती. लहान मुलांसोबत ती गल्लीत हसतखेळत असायची. एकुलती एक असल्याने प्रेमळ, लाडकी होती. घटना घडली त्या दिवशी त्या ६ वर्षाच्या लेकिने सकाळी आपल्या वडिलांना जेवणाचे ताट दिले होते.व जेवावयास सांगितले आणि घराबाहेर गेली होती. गेली ती गेलीच...ती परत आलीच नाही. ...
म्हणून , तिचा शोध सुरू झाला आई-वडील शेजारी-पाजारी यांनी सर्वत्र तिला शोधले. अखेर गावाच्या प्रवेश द्वाराजवळ असणाऱ्या. जुन्या दफनभूमीच्या झुडपात तिचा #मृतदेह आढळून आला. तिच्या चेहऱ्यावर व पायाला जखमेचे व्रण दिसून आले होते. अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
याप्रकरणी संशयित त्या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले .त्यावेळी त्या नराधमाने निर्लज्जपणे गुन्ह्याची कबुली दिली होती.
पोलिसांनी आपली कामगिरी कितीही चोख बजावली .याबाबतचे #कायदे कितीही कडक झाले तरीही अशा घटना समाजात घडतच आहेत .
#महिला, #मुली ,अल्पवयीन मुली यांच्यावर असे व यापेक्षाही भयावहअत्याचार घडण्याचे प्रमाण खरोखरच खूपच मन सुन्न करणारे आहे .
▪️१६ डिसेंबर २०१२ मध्ये दिल्लीच्या 'वसंत विहार ' भागात तरूणीवर #पाशवी #बलात्कार करून तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर अतिशय वाईट परिस्थितीत तिने #झुंज दिली व तिचा #मृत्यू झाला. दिल्लीमध्ये फिजिओथेरपीचे #शिक्षण घेत असलेल्या २३ वर्षीय निर्भयावर दोषींनी चालत्या बसमध्ये पाशवी बलात्कार करून तिला तिच्या मित्रासह मरणासन्न अवस्थेत महामार्गावर फेकून दिले होते. या प्रकरणाने पूर्ण देश हादरला होता.
▪️नगर - जिल्ह्यातील #कोपर्डी (ता. #कर्जत)येथे १३जुलै २०१६ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास असाच गुन्हा घडला होता. येथील शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याच्या गुन्ह्यत सामील असणाऱ्या तीन नराधमांना विशेष #जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची #शिक्षा ठोठावली होती.
▪️ ऑक्टोंबर २१ मधील वणी येथील अशीच घटना. वणी येथे #बसस्थानक परिसरात एका ४० वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचाराची घटना घडली.मानवतेवर घाला घालणारी ही #गुन्हेगारी #प्रवृत्ती
समाजात सर्वत्र फोफावताना दिसत आहे.
महिला, तरुणींच्या छेडछाडीच्या घटनांत अलिकडे वाढ झाली आहे. अशा घटना आपल्या आजूबाजूला दररोज घडू लागल्या आहेत. अशा प्रवृत्तीविरोधात कारवाई करण्यासाठी आणि महिला, मुली, तरुणींच्या मदतीसाठी पोलिसांनी निर्भया पथकाची स्थापना केली आहे. 'जेथे भय तेथे निर्भया ' हे ब्रिदवाक्य घेवून स्थापन करण्यात आलेल्या या पथकांच्या कारवाईने चांगलाच दबदबा निर्माण झाला असला आणि पोलीस आपले काम चोख बजावत असले तरी अशा घटना आपल्या आजूबाजूला घडतच आहेत.
अशा घटनांची आकडेवारी पाहिली म्हणजे खरोखरच #समाज नेमका कुठे चालला आहे? समाजातील ही नराधम प्रवृत्ती कोणत्या टोकाला जाऊन पोचलली आहे असे वाटते.
भारतात एकूण गुन्हेगारीमध्ये बलात्कार हा गुन्हा अव्वल क्रमांकावर येतो. दरवर्षी साधारण तीस ते चाळीस #हजार बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद देशात होते. हे झाले #नोंद झालेल्या गुन्ह्यांबद्दल; पण समाजातील लोक काय म्हणतील या भीतीपोटी अनेक प्रकरणात बलात्काराची नोंददेखील केली जात नाही.अजून एक दुर्दैवी बाब म्हणजे, बलात्काऱ्यांना शिक्षा मिळण्याची आकडेवारी फारशी समाधानकारक नाही. दुर्दैवाने दिवसेंदिवस या गुन्ह्याची आकडेवारी कमी होण्याऐवजी वाढत चालली असल्याचे एनसीआरबीच्या (#राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग) अहवालातून स्पष्ट होत आहे.
एकूणच #निर्भया प्रकरणानंतर अशा बाबतीत अनेक कडक कायदे करण्यात आले. विविध पथकांची #स्थापना करण्यात आली. विविध #हेल्पलाइन #नंबर देण्यात आले .तरीही अशा घटना समाजात घडतच आहेत. की ज्या तुम्हा आम्हाला सर्वांनाच मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत.
आणि त्याच बरोबर अशा घडणाऱ्या घटना पाहून, ऐकून, मनात एक भीतीची #पाल चुकचुकते की आपल्याही लाडक्या लेकी,बहिणी शिक्षणाच्या निमित्ताने ,काही कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडल्या तर ,त्या पुन्हा घरी सुरक्षित येतील ना?
- धनाजी माने ......✍️
===================🇮🇳=================== 🇮🇳 जनगणना … आकड्यांच्या पलीकडे दिसलेला भारत 🇮🇳 ========================== पहाट अजून पूर्ण उज...