Sunday, August 15, 2021

'शब्दअंतर्यामी '-अनुत्तरित...धनाजी माने..✍️

◾'शब्दअंतर्यामी '-अनुत्तरित...धनाजी माने..✍️◾
📌 प्रकाशन सोहळ्याप्रसंगी - ज्येष्ठ साहित्यिक दि.बा. पाटील ,कार्यकारी संपादक ॲड. बी एस .पाटील,इस्लामपूरच्या माजी नगराध्यक्षा प्राध्यापिका सौ.अरुणादेवी पाटील,शिवाजी विद्यापीठाचे व्यवस्थापन समितीचे सदस्य ॲड.धैर्यशील पाटील,प्रा.डाॅ .दीपक स्वामी, आदी मान्यवर उपस्थित होते .
"नवोदित साहित्यिकांनी शाश्वत साहित्याची निर्मिती करावी हे साहित्य निरंतर राहील.असे मत ज्येष्ठ साहित्यिक दि.बा. पाटील यांनी व्यक्त केले.
 ते वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटी इस्लामपूर येथे वाळवा शिक्षण व साहित्य प्रकाशन संस्थेच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी , स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी समयी, केलेल्या शब्द अंतर्यामी विशेषांकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी इस्लामपूरच्या माजी नगराध्यक्षा प्राध्यापिका सौ.अरुणादेवी पाटील अध्यक्षस्थानी होत्या.
सौ.पाटील म्हणाल्या 'नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ निर्माण करून देण्याची काम संस्थेने केले आहे.'
यावेळी कार्यकारी संपादक ॲड. बी एस .पाटील म्हणाले ' साहित्यक्षेत्रात विद्यार्थी व शिक्षक यांनी लिहिते झाले पाहीजे अशा साहित्यातून दर्जेदार साहित्याची निर्मिती होऊन ती वाचकाच्या मनावर ठसा उमटवेल.'
यावेळी शिवाजी विद्यापीठाचे व्यवस्थापन समितीचे सदस्य  ॲड.धैर्यशील पाटील म्हणाले ' साहित्य निर्मितीसाठी केलेल्या व्यासपीठाच्या माध्यमातून नवोदित लेखक विचारवंत, यांचे साहित्य प्रकाशित करून समाजाला दिशा देण्याचे काम करावे.'

तर प्रा.डाॅ .दीपक स्वामी म्हणाले ' शब्दअंतर्यामी च्या माध्यमातून शब्द  प्रतिबिंब करण्याचे काम केले आहे.'शब्दअंतर्यामी' मधील धनाजी माने यांच्या 'अनुत्तरीत 'ने वास्तव उभे केले.त्यांनी आपल्या साहित्यामध्ये अशीच दर्जेदार लेखनाने भर घालत राहावे.'
यावेळी माजी मुख्याध्यापक कुमार निकम, सत्वशील पाटील प्राचार्य अंकुश बेलवडकर, प्राचार्य राम शिंदे, अरुण गायकवाड, कोमल श्रीखंडे, धनाजी माने आदी मान्यवर उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक विजय शिंदे यांनी केले सूत्रसंचालन मुख्याध्यापिका ईरफाना संदे यांनी केले. आभार दिलीप क्षीरसागर यांनी मांनले.
- धनाजी माने......✍️





 

Monday, August 09, 2021

वाढदिवस लेकीचा


 🎂लेकीचा #वाढदिवस अगदी साधेपणाने...! 


प्रिय जान्हवी 

२००३ साली ,आजच्याच दिवशी  तु  इवलीशी #चिमणी होऊन आमच्या घरात आलीस आणि माझे पूर्ण #आयुष्यच बदलले..!

आज त्याला १८ वर्षे पूर्ण झाली. हा- हा म्हणता वर्षामागून वर्षे  भरभर निघून गेली.

 तु मोठी होत गेलीस वयाने आणि #समजूतदार पणानेही.

तुझ्या जन्मानंतर जवळ- जवळ  ६ ते ७ महिने मी तुला हातात घेतले नाही.तुला हातात घ्यायची भीती वाटायची.  कारण , 'आपल्याला घ्यायला येईल का❓ तुझी मान तर दुखवणार नाही ना❓ अशी भिती ही तुझ्या काळजीपोटीच असायची.

लहानपणी #खेळणारी , बागडणारी तू , विविध वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन ,करारी भाषेत व्यासपीठ गाजवणारी तू.आज मात्र तू , माझी आई सारखी माया,प्रेम , आपुलकीने लळा लावतेस आणि काळजीही तशीच करतेस.

हे तुझे वय म्हणजे हे काही फार मोठे वय नाही, पण ....तु लहानपणा पासून आतापर्यंत कधीसुद्धा माझ्याजवळ -  हे पाहिजे ते पाहिजे म्हणून हट्ट केलेला मला आठवत नाही.किती समजूतदारपणा तुझ्याकडे एखाद्या परिपूर्ण व्यक्तीसारखा.proud of you !

तुझ्याच किलबिलाटाने पूर्ण घर भरून जायचे....जान्हवी... तू खेळण्यापेक्षा पुस्तकातच जास्त रमलीस.#अभ्यास , #वक्तृत्व या गोष्टींना तू प्राधान्य दिलेस.

तू तुझ्या #शालेय जीवनात अभ्यासात कधीच कमी पडली नाहीस.तू प्रत्येक वर्षी  तु  तुझ्या शालेय प्रगतीचा आलेख उंचावत ठेवलास.हे करत असताना , मी तुला कधीही अभ्यास कर म्हणून दरडावले किंवा सांगितले असे आठवत नाही, आणि तशी वेळही तु कधी येऊ दिली नाहीस.

इयत्ता दहावी मद्धे असताना  सुद्धा तू मला एकच वेळ सांगितलेस ,की, 

' बाबा मी दहावीमद्धे एवढे गुण मिळवणारच हे तुझे तुच #Target ठरवलेस ' 

आणि ते तू पुर्ण केलस किंबहुना जादाच गुण मिळवलेस.

९१% गुण मिळवून तू उज्ज्वल यश संपादन केलेस.

त्यावेळी तू दहा वर्षे घेतलेले कष्टाचे फळ मिळाले ,

 ' इस्लामपूर हायस्कूलच्या स्वागत कमानीवर यशस्वी विद्यार्थी- विद्यार्थ्यांनींचे फोटो झळकले, त्यामध्ये माझ्या लेकीचा ,तुझा फोटो बघून ऊर भरुन आला.'

यात सर्वस्वी तुझे कष्ट होते.पण , यावेळी तुझ्या सत्काराच्या कार्यक्रमाला वेळ देता आला नाही.त्या दिवशी तुला काय वाटले असेल?पण .....तरीही तुच आमची समजूत घातलीस , तु म्हणालीस , #बाबा ! यात तुमचा #आई- वडिलांचा काय दोष तुम्ही दोघेही #शिक्षक असल्याने तुम्हाला १५ जुन शाळेच्या पहिल्या दिवशी हजर राहवच लागतं हे माहिती आहे.आणि सत्काराचा कार्यक्रम हायस्कूलने त्यांच्या पुर्वपार पद्धतीने शाळेच्या पहिल्याच दिवशी घेतला ! असुदे ! Don't #worry ,Be #Relax ' असे तुच धीराचे शब्द दिलेस.

खरचं ! किती हा समजूतदारपणा !!

आणि ........

दोन दिवसांपूर्वी १२ वीचा निकाल जाहीर झाला.तू घेतलेल्या कष्टाचे फळ परमेश्वराने पुन्हा भरभरुन दिले.

तब्बल , ९६.३३ % गुण १२ वी सायन्स परिक्षेत मिळवलेस आणि ही यशाची कमान उंचावत ठेवलीस.

आणि तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तु ही सर्वात मोठी भेट आम्हा कुटूंबीयांना तु दिलीस.

खूप , #आनंद झाला ,ऊर भरुन आला.आनंदाश्रुंना आपोआपच वाट मोकळी झाली.

किती समजुतदार आहेस तू.... 

जन्मापासून ते आज पर्यंतचे अनेक  प्रसंग आठवले....

तुझ्या जन्माच्या वेळी #इस्लामपूर येथील #डॉ.पोरवाल हाॅस्पिटलमद्धे जागून काढलेली रात्र आठवली.

काळ कुणासाठीच थांबत नसला तरी ,#आठवणी जशाच्या तशा मनात रूंजी घालत असतात.

काही वेळा , असच एकट बसल की ,मनात  विचार 

येतात आणि #डोळे भरून येतात.

 आपल्यावर जीवापाड़ #प्रेम करणारी ही माझी लाडकी लेक एक दिवस लग्नानंतर आपल्याला सोडून जाणार या साध्या कल्पनेनेच मला रडू येते.

कारण माझ्या वडिलांच्या निधनानंतर , माझ्या बहिणींच्या लग्नामध्ये ही ताटातूट मी अनुभवली आहे.

बापापासून #मुलगी अलग होऊन सासुरवाशीन होते, 

तो क्षण काय असतो ,ते कन्यादान केलेल्या बापालाच माहित असते

तुझ्या कडे पाहिले की खरोखर लक्षात येते की खरच मूली खुप ग्रेट असतात...

#जान्हवी आज तू  मोठी झालीस हे अगदी खरे आहे...पण मुले कधीही आई - वडिलांसमोर मोठी असतात का ❓जान्हवी, तू खुप मोठी हो… किर्तीवंत हो…आमचा आशीर्वाद तर नेहमीच तुझ्या पाठीशी आहे...!

वाढदिवसानिमित्त खूप - खूप  शुभाशिर्वाद...

तुझा #बाप म्हणून अशा लाडक्या लेकी सोबत वाढणे हे ही खूप आनंददायी आहे...

वाढदिवसाच्या खूप -खूप शुभेच्छा बेटा...

Happy Birthday JANHAVI !

- आई- बाबा

Thursday, August 05, 2021

बेफिकिरी.......










' अरे ! कुठला कोरोना आणि  कुठलं काय सार थोतांड आहे. उलट मास्क घातल्यावरच कोरोणा वाढतो. ' ....... बेफिकिरी

कृष्णा आणि वारणा नदीकाठचा पूर ओसरला , लोक स्वतःला सावरत आहेत. लोकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
परंतु कोरोना मात्र अद्याप मागे हटायला तयार नाही .कोरोणाचे शेपूट हळूहळू वाढत चालले. आणि कोरोणामध्ये मृत्यूचे प्रमाण ही तस चिंताजनकच आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक नवीन रुग्ण संख्या सांगली जिल्ह्यातच आढळत आहे.
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अशा जिल्ह्यांचा संसर्ग कमी झाला आहे. महाराष्ट्रातील या व अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सांगली जिल्ह्यातील संसर्ग मात्र वाढत आणि लांबत चालला आहे.

याचे  बारकावे पाहिले, निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल की समाजामध्ये काही निष्काळजी लोकांची वाढलेली बेफिकिरी.
परवा एका ठिकाणचे दृश्य पाहिले आणि त्या ठिकाणांचे संभाषण ऐकले , त्यावेळीच ही समाजातील काही लोकांची बेफिकिरी  प्रकर्षाने जाणवली.
ते संभाषण खूपच बोलके उदाहरण होतं ,
' अरे ! कुठला कोरोना आणि  कुठलं काय सार थोतांड आहे. उलट मास्क घातल्यावरच कोरोणा वाढतो. '
किती ही बेफिकीरी ❓
एका बाजूला कोरोनाने  सार जग हैराण आहे. साऱ्या जगाने या विषाणुसमोर गुडघे टेकले आहेत. प्रगतशील देश असतील किंवा विकसनशील देश असतील सर्वचजण हतबल झाले आहेत.

गेल्या दोन वर्षामध्ये कोट्यावधी लोक या विषाणुमुळे बाधित झाले. आणि लाखो लोकांचा मृत्यू यामध्ये झाला. अजूनही हे सत्र सुरूच आहे कोरोणा चे विविध व्हेरियंट (प्रकार) समोर येत आहेत .लोक बाधित होत आहेत आणि मृत्यू पावत आहेत. ही साखळी अविरत सुरूच आहे.अनेक कुटुंब दुःखाच्या खाईत लोटली गेली.अनेक ठिकाणी कुटुंबच्या कुटुंब या खाईत लोटून त्या कुटुंबातील सर्वांचाच मृत्यू झाला.हे सर्व डोळ्यासमोर घडत असताना, याचे लोन मोठमोठ्या शहरांपासून गावा- गावा पर्यंत गल्ली- गल्लीपर्यंत घरापर्यंत पोहोचले. तरीही काही महाभागांना शहाणपण सुचत नाही. आणि वरील बेफिकीरीचे हे संभाषण काही निष्काळजीपणे वागणाऱ्या लोकांच्या तोंडातून आजही ऐकायला मिळते.
असे लोक स्वतः बाधित होतातच पण आपल्या बेफिकीरीने कोरोणाची साखळी वाढवत राहतात. आणि समाजात कोरोणाच्या संकटांना आमंत्रण देतात.
सर्व काही प्रशासनानेच करावे या भावनेने लोकांच्या मध्ये स्वयंशिस्त राहिलेली नाही असे निरीक्षणातून दिसत आहे. कोरोणाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासन आटोकाट प्रयत्न करत असतं.
प्रशासनातील पोलीस, प्राथमिक , माध्यमिक शिक्षक , आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी व विशेष करून वैद्यकीय क्षेत्रातील लोक यासाठी गेली दोन वर्ष अविरत झटत आहेत. रात्रंदिवस राबत आहेत आपला जीव धोक्यात घालून लोकांना सावरत आहेत.
तरीही काही लोक बेफिकीर वागून प्रशासनावरचा तान, आणि कोरोणाचा प्रसार करीत कोरोणाचे शेपुट वाढवतच आहेत.
लोकांनी आपल्या जीवाची बाजी न लावता संयम, स्वयं- शिस्त बाळगुन कोरणा बाबत प्रत्येक गोष्टीचे पालन केले, तर ही चिंताजनक संख्या आटोक्यात येईल.लोकसंख्येची  घनता असणाऱ्या मोठ्या शहरांच्या  ठिकाणीही कोरणा आटोक्यात आला आहे .कारण या ठिकाणच्या लोकांनी घेतलेली काळजी ,स्वयंशिस्त , लोकांनी याबाबत त्रिसूत्रीचा वापर केला आहे असं दिसतं. योग्य पद्धत पद्धतीने घालने . साबणाने वेळोवेळी हात धुणे.सोशल डिस्टंसिंग. विनाकारण गर्दी टाळणे. सार्वजनिक गर्दीचे कार्यक्रम याला फाटा देणे.
या स्वयंशिस्तीनेच कोरणा वाढायचा थांबत असतो. असं तज्ज्ञांचं मत आहेआणि अशा नियमांची पायमल्ली ज्याठिकाणी होते, काही बेफिकीर लोकांची बेफिकिरी वाढते आणि अशा मुळेच कोरोणा पुन्हा डोकं वर काढतो.
त्याचा संसर्ग  वाढत राहतो.
याच्या वरती सर्वात चांगला पर्याय.... स्वयंशिस्त हीच आहे. सर्वांनी जर स्वयंशिस्त बाळगून काळजी घेतली तर, सांगली जिल्ह्यात वाढणारा कोरोणा आपण अशा स्वयंशिस्तीनेच कमी करू शकतो हे मात्र निश्चित !

 धनाजी माने....✍️

बाबासाहेब परीट - ग्रामीण कथाकार

  बाबासाहेब परीट मराठी साहित्यात “कथाकथन” म्हटलं की केवळ कथा लिहिणं नाही, तर ती जिवंतपणे सांगण्याची कला अभिप्रेत असावी लागते. अशीच या क्षेत्...