Wednesday, May 12, 2021

विकी राठोडचा केक



विद्यार्थी शिक्षकाचे नाते खरचं....एक वेगळ नात असतं.हे नात जो तो आपापल्या परीने सांभाळत असतो

........... ✍️

◾#विकी  राठोड चा #केक !◾

    प्रिय ! विकी तू आनलेला वाढदिवसाचा #केक ! मला हिऱ्या मोत्यांच्या आणि #सोन्या-चांदीच्या तुलांनपेक्षाही #मौल्यवान वाटला !

 तुझ्या मनाचा मोठेपणा खूप #मोठा आहे !

खरचं ! वाढदिवस प्रत्येकाच्या जीवनात येतात, आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने #साजरे केले जातात. कोणाचे वाढदिवस   हे त्या व्यक्तीच्या वजनाएवढे #सोने-चांदी ,पैसे - यांच्या तुला करून करतात .काही जणांच्या अशाचप्रकारे अनेक पद्धतीच्या तुला करतात ,आणि वाढदिवस साजरा करतात.

 त्या प्रत्येकाच्या पाठीमागे प्रेम असतं पण.... स्वार्थही असतो. पण आपण मुलांनी निष्पाप ,निरागस , निरपेक्ष भावनेने केलेला #वाढदिवस मला खूप मोठा वाटतो , त्यामागे तुमचा कोणताही #स्वार्थ नसतो. .असते ते फक्त  प्रेम ,माया,आपुलकी आणि जिव्हाळा.

विद्यार्थ्यांनी #निरपेक्ष  भावनेने व्यक्त केलेले #प्रेम हे खरोखरच शिक्षकांच्या जीवनात खूप #मौल्यवान असतं , त्याची बरोबरी जगातील कोणतीच मौल्यवान वस्तू  त्याच मोल करु शकत नाही. अस मला वाटतं. किमान आम्हा शिक्षकांना तरी हा विद्यार्थ्यांचा लळा खूप मोठा वाटतो.आणि याचे प्रत्यंतर प्रत्येक शिक्षक बंधु-भगिनींच्या #जीवनात कधीना कधी वाट्याला येते. माझ्या जीवनात नोकरीच्या निमित्ताने असे अनेकवेळा प्रसंग आले.चंदगड ,शिरोली, घुणकी या ठिकाणीही विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रेम दिले.

तसाचं काहीसा पण वेगळा प्रसंग कामेरीतही घडला .....निमित्त माझ्या वाढदिवसाचे, काही दिवसापुर्वी मी माझ्या इ.५वी मधील आर्यन या विद्यार्थ्याचा वाढदिवस साजरा केला. 

असे  वाढदिवस केक न कापता विद्यार्थ्यांना  किमान फुल देऊन आम्ही परिपाठावेळी सर्वच शाळामधून शुभेच्छा देऊन असे विद्यार्थ्याचे वाढदिवस हा उपक्रम घेतोच.

 त्यावेळी शाळेतील  ५ वी ते ७ वी चे विद्यार्थी- विद्यार्थ्यींनी उपस्थित होते. त्यावेळी मुलांनी विचारले होते ,' सर !तुमचा वाढदिवस कधी आहे हो?'

त्यांना मी त्यावेळी सांगितले , माझा कागदोपत्री #नोंद केलेला ,आमच्या गुरूजींनी लावलेली जन्मतारीख १ जून आहे.पण माझा #जन्मदिवस  तो #२१ जुलै  त्यामुळे खरा #वाढदिवस २१ जुलै हाच आहे.

त्यांनी बरोबर हे लक्षात ठेवले होते. याचा अनुभव त्या दिवशी आला.

त्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळेचा #परिपाठ सुरु होता.

त्यादिवशी मात्र परिपाठाच्या वेळी  #टेबल आणि काही खुर्च्या  , बाहेर दिसत होत्या आम्ही शिक्षक आपसात चर्चा करत होतो हे टेबल ,खुर्च्या का? कोण येणार आहे का?.हे वेगळेपण आज होतं.दोन -तीन  विद्यार्थी शाळेच्या गेटजवळ घुटमळत होते.त्यांना माईकवरुन बोलवले तर ते शाळेच्या आत येत नव्हते. बाजुला जायचे आणि थांबायचे.

परिपाठ झाला आजचा परिपाठ मुलींनी उत्कृष्ट घेतला होता, पण लगेच माईकचा ताबा एका मुलाने घेतला.त्याने सर्वांना त्याच्या #मोडक्या - तोडक्या शब्दात सांगून टाकलं , " आज , आमच्या माने सरांचा वाढदिवस आहे.आम्ही तो साजरा करणार आहोत." हे जाहीर होताचं 

त्या टेबलावर एक केक एका विद्यार्थ्यांने आनून ठेवला , सोबत काही छोट्या- छोट्या #मोमबत्त्या आनल्या. विद्यार्थ्यांनी मला खुर्चीवर बसण्यास सांगितले. ज्यांनी #आयोजन केले होते ते विद्यार्थी वरती आले.विद्यार्थ्यांनी केक कापला ,मला भरवला,शुभेच्छा दिल्या आणि गेटसमोर  असणाऱ्या रस्त्यावरुन फटाक्यांचा #आवाज आला.काही वेळापुर्वी ते #विद्यार्थी का तिथे घुटमळत होते , त्याचा प्रत्यय सर्वांनाच आत्ता झाला.

काहींनी #छोट्या- छोट्या #भेटवस्तू दिल्या.काहींनी आपल्या मोडक्या- तोडक्या शब्दात लिहलेली ,पण प्रेमाने #ओतप्रोत भरलेली पत्र दिली.

यावेळी दोन्ही शाळेतील मुख्याध्यापिका आदरणीस सौ.सूरेखा पाटील मँडम , सौ.संजिवनी गर्जे मँडम दोन्ही शाळेचे सर्व शिक्षक,शिक्षिका हजर होते.

मी या प्रसंगाने भारावून गेलो. तो कार्यक्रम सर्व विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी ,शिक्षक सहकारी यांच्या समोर पार पडला.

पण......

यापुढचा #वर्गात घडलेला प्रसंग खूपच वेगळा होता.

५ वी ते ७वी चे विद्यार्थी एका वर्गात एकत्र झाले होते. फळ्यावर आगोदरच त्यांनी लिहून ठेवलेले ,

 🎂 ' HAPPY BIRTHDAY MANE SIR ! '🎂

' Many many happy returns of the Day ! '

अनेक विद्यार्थ्यांनी माझ्याप्रती असणाऱ्या त्यांच्या भावना आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या.

मी त्यांना सहज म्हटलं , कशाला तुम्ही दोन - दोन केक आनले रे !

तेव्हा त्यांनी  जे सांगितले तो प्रसंग ......खूपच भावनिक जिव्हाळा निर्माण करणारा होता.विद्यार्थी- शिक्षक नातं एका निस्वार्थी भावनेने किती आपुलकीने भरलेले असतं हे दाखवणारा होता.त्या प्रसंगात त्यांचा माझ्या प्रती असणारा जिव्हाळा ,निस्वार्थी प्रेम ,माया ,आपुलकी, आत्मीयता ,आदरभाव या सर्व माणुसकीच्या ओलाव्यांनी ओतप्रोत भरलेला, तो सुखद क्षण होता 

ती निष्पाप ,निरागस मूले आनंदाने आणि भावनिक होऊन ,उत्साहाने सांगत होती..... एक केक आम्ही प्रत्येकी १० रु. वर्गणी काढून आणला.शाळा सुटली की आम्ही एकत्र यायचो आणि वर्गणी गोळा करत होतो तूम्हाला काय कळू दिल  नव्हत.आर्यनच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही सांगितलेली तुमच्या वाढदिवसाची खरी तारीख २१ जुलै आम्ही लिहून ठेवली होती.

तर दुसरा केक विकी राठोड ने एकट्याने आणला आहे सर !.तो सुट्टी दिवशी कामाला गेला होता. आणि त्या पैशाचा केक त्याने आणला !

ते ऐकून मी गलबलून गेलो विकीला जवळ घेतला.त्याला घट्ट मिठी मारली ! त्याला कवटाळले.माझ्या अश्रूंना आपोआपच वाट मोकळी झाली , मला ते आवरताच आले नाहीत.काही मुलांच्याही डोळ्यातून पाणी आले.

त्या मिठीत तो मला खूप मोठा दिसला.त्याचे अंतरंग मला दिसले , जाणवले.जवळ काहीचं नसताना त्याने मला त्या केकच्या माध्यमातून सर्व काही दिले होते.

अपुऱ्या अभ्यासाच्या प्रसंगात मी त्याला अनेकवेळ  रागावलोही असेल तरीही ते मनात न ठेवता ,( अलिकडे अनेक मुले आणि पालकही असे शिक्षकांचे रागावने मनात धरतात त्याला शासनाच्या GR चा आधार घेतात.)

विकी मात्र या सर्वाहून वेगळ्याच आदर्श उंचीवर दिसला. हातावर पोटभरणाऱ्या कुटुंबात जन्मलेला विकी ,  त्यावेळी माझ्यासाठी, तो जगातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या 'बिलगेट्स , झुकेसबर्ग , अंबानी बंधूपेक्षाही मोठा श्रीमंत वाटला.माझा मलाचं हेवा वाटला.आणि त्याच्या या उंचीच्या समोर मी ही खूप खुजा वाटलो.

इतक्या गरिबीतही त्याचे हे मोठपण, मनाची श्रीमंती, माझ्याप्रती व्यक्त केलेले प्रेम, माया, आपुलकी, आणि केक आणन्यासाठी कामाला जावून केलेले त्याचे कष्ट ,मला त्या दिवशी तो प्रसंग जीवन जगण्याची कला शिकवून गेला. एक वेगळाच संस्काराचा परिपाठ शिकवून गेला.

पुढे काही दिवसांनी विकीच्याही वाढदिवसाला त्याला माझ्याकडून छानशी कपडे घेतली.त्याच्या त्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला. पण....विकीच्या त्या केक समोर सारचं शुन्य असल्याच जानवलं,एवढा मौल्यवान त्याचा तो केक मला आजही अमुल्य असल्याचे जाणवते आणि त्याच्या ऋणात असल्याचे जाणवते.

विकीला चार अक्षर भलेही कमी वाचता येत असली , तरी जीवनाच्या वाटचालीत संस्काराच्या आणि माणुसकीच्या धड्यामद्धे तो अनेक पावले पुढेच वाटला. ( आज सर्व क्षेत्रात याचीच कमतरता आहे.)

एकूणच, प्रिय विकी तू आनलेला वाढदिवसाचा केक ! मला हिऱ्या मोत्यांच्या आणि सोन्या-चांदीच्या तुलांनपेक्षाही मौल्यवान वाटला !

राष्ट्रपती पुरस्कारा पेक्षाही , तू आनलेला केक सर्वांत मोठा पुरस्कार देऊन गेला.

नम्रपुर्वक सँल्युट तुला विकी  ! तुझे ऋण मी व्यक्त करणार नाही ! तुझ्या ऋणातच मला राहूदे ! या तूझ्या ऋणातच मानवतेचा मान आणि सन्मान , ओतप्रोत भरला आहे रे विकी  !  

- धनाजी माने  ....✍️


 


1 comment:

amolmane.blogspot.com said...

खरंच ...विकी म्हणजे मनापासून गुरुजींना जीव लावणारा ,त्यांचा आदर राखणारा मुलगा आहे हे नकळतरित्या त्याच्या कृती वरून समजून येते. त्याने माने गुरुजीं साठी आणलेला केक जसा गोड होता तसं विकीच जीवन ही गोड व्हावं हीच सदिच्छा💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹👍👍

भैरवनाथ यात्रा अंकोली ता.मोहोळ जि.सोलापूर

भैरवनाथाच्या नावानं चांगभल....... #मोहोळ तालुक्यातील मौजे #अंकोली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा सालाबादप्रमाणे याही वर्षी शुक्रवार ...