🎯 लोकशाहीच्या यज्ञात माणुसकीचा सुगंध (वाळवा तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेचा प्रेरणादायी अनुभव ) 🎯
===========================
सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती वाळवा येथील निवडणूक प्रक्रिया ही केवळ एक प्रशासकीय कामगिरी न राहता, लोकशाहीच्या यज्ञातील सेवाभावाची आहुती ठरली.
या संपूर्ण प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी मा. प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन साहेब व मा. तहसीलदार रास्कर मॅडम तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी जी नियोजनबद्धता, संवेदनशीलता आणि माणुसकी दाखवली, ती प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनात कायमची कोरली गेली.
निवडणूक म्हणजे केवळ मतदान नव्हे, तर हजारो कर्मचाऱ्यांच्या संयमाची, कष्टाची आणि जबाबदारीची परीक्षा असते.
निवडणूक साहित्य देणे व परत जमा करणे ही प्रक्रिया अनेकदा तणाव निर्माण करणारी ठरते.
मात्र यावेळी ही प्रक्रिया सुसूत्र, शिस्तबद्ध आणि वेळेवर पार पडली.
कोणताही गोंधळ नाही, कोणतीही धावपळ नाही —
फक्त नियोजन, संयम आणि समन्वय.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे,
प्रत्येक झोनसाठी अभ्यासू व प्रशिक्षित झोनल अधिकारी नेमण्यात आले.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली ९ ते १० मतदान केंद्रांचे काम🎯 वेळेत🎯शांततेत🎯 आणि अत्यंत सुरळीत पार पडले.
यामुळे केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांवरील मानसिक ताण मोठ्या प्रमाणात कमी झाला.संवेदनशील भागांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ आदेश देणारे अधिकारी म्हणून नव्हे,तर
👉 आधार देणारे मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली.
👉 कर्मचाऱ्यांना धीर दिला.
👉 त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
👉 आणि “आपण एकटे नाही” ही भावना निर्माण केली.
तसेच,
✔️ हव्या तेवढ्याच कागदपत्रांची गरज,
✔️ लखोट्यांची मर्यादित व सुटसुटीत व्यवस्था,
✔️ अनावश्यक औपचारिकतेचा बोजा टाळणे,या सगळ्यामुळे केंद्राध्यक्षांचे काम हलके झालेआणि जबाबदारी आनंदाने पार पडली.
या प्रक्रियेत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनात एकच भावना होती —
“आपल्यावर विश्वास ठेवणारे अधिकारी आहेत.”
लोकांच्या भोजनाची योग्य काळजी घेतली गेली.कामाचे मानधन वेळेत व योग्य मिळाले.ही केवळ आर्थिक बाब नव्हती,तर कर्मचाऱ्यांच्या श्रमांचा सन्मान होता.
या निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याने मनापासून भावना व्यक्त केली की —
“अशी नियोजनबद्ध, पारदर्शक आणि माणुसकी जपणारी प्रशासन व्यवस्था अनुभवायला मिळणे हे आमच्यासाठी भाग्याचे आहे.”
आजच्या काळात निवडणूक म्हणजे
➡️ लोकशाहीवरचा विश्वास,
➡️ प्रशासनावरचा विश्वास,
➡️ आणि समाजावरचा विश्वास.
हा विश्वास मा. प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन साहेब,मा. तहसीलदार रास्कर मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण सहकारी वर्गाने
आपल्या कार्यातून अधिक दृढ केला आहे.
🙏 कृतज्ञता आणि सलाम
या निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी, केंद्राध्यक्ष व पोलिंग स्टाफला मनापासून सलाम.
तुमच्या सेवाभावामुळे लोकशाही अधिक बळकट झाली आहे.
ही निवडणूक प्रक्रिया फक्त एक शासकीय कामकाज न राहता,ती माणुसकीने सजलेली प्रशासनाची प्रेरणादायी गाथा ठरली आहे.
- धनाजी माने…..✍️
“अशी नियोजनबद्ध, पारदर्शक आणि माणुसकी जपणारी प्रशासन व्यवस्था अनुभवायला मिळणे हे आमच्यासाठी भाग्याचे आहे.”
आजच्या काळात निवडणूक म्हणजे
➡️ लोकशाहीवरचा विश्वास,
➡️ प्रशासनावरचा विश्वास,
➡️ आणि समाजावरचा विश्वास.
हा विश्वास मा. प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन साहेब,मा. तहसीलदार रास्कर मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण सहकारी वर्गाने
आपल्या कार्यातून अधिक दृढ केला आहे.
🙏 कृतज्ञता आणि सलाम
या निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी, केंद्राध्यक्ष व पोलिंग स्टाफला मनापासून सलाम.
तुमच्या सेवाभावामुळे लोकशाही अधिक बळकट झाली आहे.
ही निवडणूक प्रक्रिया फक्त एक शासकीय कामकाज न राहता,ती माणुसकीने सजलेली प्रशासनाची प्रेरणादायी गाथा ठरली आहे.
- धनाजी माने…..✍️
https://dhunt.in/13nZXV
dhanajimane.blogspot.com
dhanajimane123@gmail.com
🎯निवडक प्रतिक्रिया -
🎯 [07/02, 10:18 pm] +91 79729 36116:
या वेळेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मुद्देसूद कागदपत्रे जमा करण्याचे फॉरमॅट व इतर कागदपत्रे वेस्टेज न जाता आवश्यक तेवढीच दिल्याने काम करताना त्याच्यामध्ये अचूकता निर्माण झाली व काम सोपे झाले
यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी मतदार नोंदणी अधिकारी क्षेत्रीय अधिकारी व यांचे सोबत असलेला संपूर्ण स्टाफ यांचे
नियोजनबद्ध कामकाज अनुभवायला मिळाले तसेच माळी मॅडम व 39/17 सहकारी सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त करू इच्छितो🙏💐💐
🎯 [07/02, 10:32 pm] Pt Vijay Habale Ashta:
यावेळी खूप चांगले नियोजन होते अजिबात त्रास झाला नाही परफेक्ट नियोजन होते श्रीनिवास अर्जुन साहेब यांचे अभिनंदन....
[07/02, 10:35 pm] +91 99601 31682: यावेळी खूप चांगले नियोजन होते अजिबात त्रास झाला नाही परफेक्ट नियोजन होते श्रीनिवास अर्जुन साहेब यांचे अभिनंदन....🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐👍👍👍
🎯 [08/02, 6:26 am] +91 98238 47947:
या वेळेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मुद्देसूद कागदपत्रे जमा करण्याचे फॉरमॅट व इतर कागदपत्रे वेस्टेज न जाता आवश्यक तेवढीच दिल्याने काम करताना त्याच्यामध्ये अचूकता निर्माण झाली व काम सोपे झाले
यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी मतदार नोंदणी अधिकारी क्षेत्रीय अधिकारी व यांचे सोबत असलेला संपूर्ण स्टाफ यांचे
नियोजनबद्ध कामकाज अनुभवायला मिळाले तसेच माळी मॅडम व 39/16 सहकारी सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त करू इच्छितो🙏🙏🙏🙏
🎯 [08/02, 9:00 am] +91 98815 50149: 🙏🏻🙏🏻
जिल्हा परिषद सांगली व पंचायत समिती वाळवा निवडणूक प्रक्रियेमध्ये केंद्राध्यक्ष म्हणून निवडणूक कर्तव्य पार पाडण्याची संधी मिळाली.
या निवडणूक प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी, त्यांनी दिलेले ट्रेनिंग आपल्या झोनचे क्षेत्रीय (झोनल) अधिकारी मा. अभिजीत घोरपडे साहेब यांनी अतिशय उत्तम नियोजन व सहकार्य केले. तसेच प्रत्येक केंद्रावर घोरपडे साहेब यांनी दिलेला वेळ यामुळे काम करताना कोणतीही अडचण आली नाही त्यामुळे निवडणूक प्रक्रिया शांततेत व संविधानिक पद्धतीने पार पडली.
आम्ही यापूर्वी अनेकवेळा निवडणूक प्रक्रियेत निवडणूक कर्मचारी म्हणून सहभागी झालो आहे; मात्र यावेळी BU, CU तसेच इतर साहित्य जमा-वाटपाची प्रक्रिया अत्यंत सुव्यवस्थित व सुयोग्य नियोजनाने पार पडली, हा एक अतिशय चांगला आणि समाधानकारक अनुभव ठरला.
तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी जेवणाचे उत्कृष्ट नियोजन, कोणताही त्रास न होणे आणि मानधन योग्य पद्धतीने व वेळेत देण्यात आल्याबद्दल संबंधित सर्व प्रशासनाचे मनःपूर्वक आभार.
रेठरे हरणाक्ष गट ३६ व किल्लेमच्छिंद्रगड गण ७१
केंद्र क्रमांक -३ (कि.म.गड)
केंद्रप्रमुख श्री रमेश पाटील व सर्व सहकारी मतदान अधिकारी व कर्मचारी यांचेवतीने सर्व प्रशासनाचे
मनःपूर्वक आभार व्यक्त करीत आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻
🎯 [08/02, 11:02 am] +91 86682 75094: 🙏🏻🙏🏻
सांगली जिल्हा परिषद (३६ रेठरे हरणाक्ष) व पंचायत समिती वाळवा (७१ किल्लेमच्छिंद्रगड) निवडणूक प्रक्रियेमध्ये केंद्राध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या निवडणूक प्रक्रियेतील सर्व प्रशासकीय निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उत्कृष्ट ट्रेनिंग दिले. आमच्या झोनचे क्षेत्रीय (झोनल) अधिकारी मा. अभिजीत घोरपडे यांनी अतिशय उत्तम नियोजन, मशीन केंद्राच्या ठिकाणी मतदान सुरू होण्यापूर्वी व मतदान संपल्यानंतर मशीनचा वापर करण्याबाबत योग्य ती माहिती दिली व सहकार्य केले. तसेच केंद्रावर घोरपडे साहेब यांनी वेळोवेळी भेटी देऊन मतदानाची नोंद व मशीनचे कार्य याबाबत विचारपूस केली. वाळवा तालुक्यातील निवडणूक विभागातील सर्व प्रशासकीय सेवकांनी/अधिकाऱ्यांनी योग्य ते नियोजन केले म्हणून काम करताना कोणतीही अडचण आली नाही. निवडणूक प्रक्रिया शांततेत व संविधानिक पद्धतीने पार पडली.
मी १९९४ पासून प्रत्येक लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत केंद्राध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. यावेळी BU, CU तसेच इतर साहित्य जमा-वाटपाची प्रक्रिया अत्यंत सुव्यवस्थित व सुयोग्य नियोजनाने पार पडली, हा एक अतिशय चांगला आणि समाधानकारक अनुभव ठरला.
तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी जेवणाचे उत्कृष्ट नियोजन, कोणताही त्रास न होणे आणि मानधन योग्य पद्धतीने व वेळेत देण्यात आले. संबंधित सर्व प्रशासनाचे मनःपूर्वक आभार.
रेठरे हरणाक्ष गट ३६ व किल्लेमच्छिंद्रगड गण ७१
केंद्र क्रमांक -२ किल्ले मच्छिंद्रगड
केंद्रप्रमुख प्रा.डॉ. रमेश महादेव गेजगे व सर्व सहकारी मतदान अधिकारी व कर्मचारी यांचेवतीने सर्व प्रशासकीय सेवकांचे व अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🎯 28 वर्षाच्या नोकरीत पहिल्यांदा निवडणूक ड्युटीचा असा सुखद अनुभव आला प्रत्येक वेळी एक विशिष्ट प्रकारचे टेन्शन असायचे साहित्य घेताना आणि जमा करताना खूप गोंधळ आणि गडबड व्हायची पण यावेळी साहित्य जमा करून घेणारे कर्मचारी पण हसत खेळत साहित्य घेत होते त्यामुळे हसत हसत आनंदात कर्तव्य पार पाडता आले झोनल ऑफिसर श्री.बुवा साहेब तर भारी माणूस फोन केला की लगेच फोन उचलायचे आणि अडचण दूर करायचे सर्वच निवडणूक विभागाचे कर्मचारी,अधिकारी,अर्जुन साहेब यांनी अत्यन्त शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक यंत्रणा राबविली आमचे महागडे जर्किन गाडीत विसरले होते पण ड्रायव्हर रास्कर यांनी दुसऱ्या दिवशी आल्यानंतर आम्हाला परत दिले म्हणजे यावेळी खूप भारी अनुभव आला आता महिन्याला एक निवडणूक झाली तरी हरकत नाही...सर्व टीमचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन !
-विजय हाबळे
🎯 नमस्कार 🙏🏻🙏🏻
जिल्हा परिषद सांगली व पंचायत समिती वाळवा निवडणूक प्रक्रियेमध्ये केंद्राध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली.यापूर्वी मी २०१९ मध्ये काम केले होते.
या निवडणूक प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी, त्यांनी दिलेले ट्रेनिंग खूप चांगले होते.पृथ्वीराज पाटील यांनी खूप दर्जेदार ट्रेनिंग दिले होते.कुरळप क्षेत्रीय अधिकारी मा.शरद पाटील साहेब यांनी अतिशय उत्तम नियोजन व सहकार्य केले. त्यांनी दिलेला पूर्णवेळ यामुळे काम करताना कोणतीही अडचण आली नाही. निवडणूक प्रक्रिया शांततेत व संविधानिक पद्धतीने पार पडली.
आम्ही यापूर्वी अनेकवेळा निवडणूक प्रक्रियेत निवडणूक कर्मचारी म्हणून सहभागी झालो आहे; मात्र यावेळी BU, CU तसेच इतर साहित्य जमा-वाटपाची प्रक्रिया अत्यंत सुव्यवस्थित व सुयोग्य नियोजनाने पार पडली, हा एक अतिशय चांगला आणि समाधानकारक अनुभव ठरला.
एकूण सर्व कामकाजाबाबत मा.प्रांतसाहेब,मा. तहसीलदार,इतर
संबंधित असणारे सर्व प्रशासन अधिकारी आणि कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन !
कुरळप ४३/८६/२८ या आमच्या केंद्रामधील माझे सहकारी अरुण कांबळे सुनीता पाटील मॅडम राहुल पाटील स्थानिक कर्मचारी धोंडीराम मुळीक यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.
गावातील स्थानिक पोलिंग एजंट, प्रशासन,पोलीस विभाग, मतदार यांनीही चांगले सहकार्य दिले त्यांचेही आभार.
अशाच पद्धतीने सहकार्य राहिले तर लोकशाही भक्कम आणि आश्वासक करण्याचे पवित्र कार्य करण्यात आपले योगदान देता येईल.
मनःपूर्वक आभार ! 💐🙏🏻
प्रा डॉ बी के माने
आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कासेगाव
🎯 जिल्हा परिषद सांगली, पंचायत समिती वाळवा या निवडणूक 2026 प्रक्रियेत 36/72/17 भवानीनगर मध्ये केंद्राध्यक्ष म्हणून संधी मिळाली.
आजपर्यंतच्य १५ वर्षाच्या शालेय सेवेमधील झालेल्या निवडणूकीतील सर्वात चांगला आणि समाधानकारक अनुभव आम्हाला या निवडणुकीत मिळाला. साहित्य वाटप ते साहित्य जमा करून घेईपर्यंत सर्व अगदी सोईस्कर करून ठेवले.
निवडणूक झाल्यावर काल एसटी बस मध्ये मनात हाच विचार होता की साहित्य जमा करून घेताना अजून कोणते कोणते डॉक्युमेंट मागतात आणि कोणते सील करून मागून घेतात आणि कोणते खुले मागतात ही एक मनात धाकदुक होती ( हा आज पर्यंतच्या निवडणुकीत आलेला दुःखद अनुभव) परंतु कालचे झालेले साहित्य वाटप आणि जमा करून घेण्याची प्रक्रिया चा अनुभव अत्यंत चांगला समाधानकारक ठरला.
याबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी झोनलऑफिसर व त्यांच्या सर्व टीमच्या सहकार्यांना मनःपूर्वक आभार!
💐💐💐🌹🌹🌹👍👍
खालिद बागवान
एम.ए.उर्दू हायस्कूल, आष्टा
🎯यंदाच्या निवडणुकीच सर्वात मोठं वैशिष्ट्य....
*निवडणूक घेतलीय असंच वाटेनाच..*
ना ढीगभर कागदपत्र, ना पेट्या जमा करताना दंगा, ना मंडपात सिलिंग करतं बसलेलं दृश्य...
🤪🤪😃😃😃
नेहमी असंच असावं ही विनंती...
डॉ. देवेंद्र पाटील
