Saturday, January 24, 2026

बाबासाहेब परीट - ग्रामीण कथाकार

 



बाबासाहेब परीट



मराठी साहित्यात “कथाकथन” म्हटलं की केवळ कथा लिहिणं नाही, तर ती जिवंतपणे सांगण्याची कला अभिप्रेत असावी लागते. अशीच या क्षेत्रात लेखन,निवेदनशैली या दोन्ही अंगांनी प्रभाव टाकणारी काही मोठी नावं समोर येतात.

यामध्ये पु.लं .देशपांडे. ,व.पु.काळे. ,ग.आ. कुलकर्णी ,मतकरी-धारप,शंकर पाटील,आप्पासाहेब खोत अशा दिग्गजांनी हे क्षेत्र विविध  अंगांनी आणि रंगांनी समृद्ध केले.

असेच एक नव्यापिढीतील नाव समोर येत

बाबासाहेब परीट .

बाबासाहेब परीट हे ग्रामीण कथाकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. आतापर्यंत सात मराठी साहित्य संमेलनामध्ये सहभागी होण्याची आणि कथा सादर करण्याची त्यांना संधी मिळाली आहे. त्यांनी स्वतःच लिहिलेल्या कथा सादर केल्या आहेत व त्या गाजल्याही आहेत. त्यांची 'शिकार ' ही कथा चांगलीच गाजली आहे. 

सिंगापूर येथे झालेल्या तिसऱ्या विश्व साहित्य संमेलनाम ध्येही सहभागी होण्याची त्यांना संधी मिळाली होती. दोन वेळा दिल्ली येथे झालेल्या साहित्य अकादमीच्या संमेलनातही त्यांना संधी मि ळाली होती. गेल्या वर्षी दिल्ली येथे झालेल्या साहित्य संमेलनात शिकार कथा सादर केली होती. यावर्षी सातारा येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनात त्यांना निमंत्रित केले होते. त्यांनी गस्त ही कथा सादर केली.त्यांच्या कथांमधून वारणा खोऱ्यातील ग्रामीण जीवनाचे यथार्थ दर्शन घडते.

बाबासाहेब परीट हे केवळ एक प्राथमिक शिक्षक नसून ते कथालेखक व ग्रामीण साहित्याचे अभ्यासक म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील साहित्य परंपरा आणि जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाला आहे. शिक्षक वर्गाची मान अभिमानाने उंचावली आहे.


महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शिक्षक, अधिकारी व कर्मचारी कथाकथन स्पर्धेत शिराळा तालुक्यातील बिळाशीचे सुपुत्र, जिल्हा परिषद शाळा, धसवाडीचे उपक्रमशील शिक्षक, ख्यातनाम ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट यांनी कथेचे बहारदार सादरीकरण केले. त्यांनी प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

यावेळी त्यांनी स्वलिखित 'गस्त' ही कथा उत्तमरित्या सादर केली. सामाजिक व्यंगावर भाष्य करून जीवनाची मूलभूत तत्वे त्यांनी आपल्या कथेतून मांडली आणि उपस्थितांची मने जिंकली.


महाराष्ट्रातून सुमारे चाळीसहून अधिक अधिकारी, कर्मचारी व शिक्षक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धा तालुकास्तर, केंद्र, जिल्हा, विभाग व नंतर राज्यस्तरावरील अंतिम स्पर्धा गडचिरोली येथे घेण्यात आल्या.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था. गडचिरोली येथे ही स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली. महाराष्ट्रातून निवडक कथाकारांनी यात सहभाग नोंदवला होता. परीट यांनी आपल्या कथेतून ग्रामीण जीवनाचा अस्सल गाभा, लोकसंस्कृतीची ताकद आणि समाजात दडलेली संवेदनशीलता यांचे अत्यंत प्रभावी चित्रण केले. त्यांच्या शब्दांनी आणि सादरीकरणाच्या शैलीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.


श्री. परीट यांच्या यशाबद्दल सातारा येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील, भारत सरकारचे दिल्ली येथील उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षणाचे अतिरिक्त सचिव आनंद पाटील, महाराष्ट्र राज्य लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त आयुक्त विश्वास नांगरे - पाटील, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, रायगडचे उप-वन संरक्षक राहुल पाटील, गडचिरोलीच्या उपजिल्हाधिकारी स्मिता पाटील - बेलपत्रे, सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड, सांगली शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. विकास सलगर, सांगलीच्या उपशिक्षणाधिकारी डॉ. श्रीमती विमल माने,  गटशिक्षणाधिकारी,अजिंक्य कुंभार, सुनिल आंबी, पोपटराव मलगुंडे, शिक्षण विस्तार अधिकारी छाया माळी, बाजीराव देशमुख, रविंद्र लोंढे केंद्रप्रमुख प्रफुल्ल काळे,सुधाकर पाटील, पोपट जाधव या शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व शिक्षक तसेच साहित्य वर्तुळातून ,आप्पासाहेब खोत, दि.बा.पाटील,रमजान मुल्ला, स्वाती शिंदे, दीपक स्वामी ,महादेव माने,हिम्मत पाटील, धनाजी माने  तसेच राजकीय क्षेत्रातील नेत्यांच्याकडूनही त्यांचे अभिनंदन  होत आहे.

राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत त्यांनी मिळवलेल्या यशामुळे सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे हे निश्चित . यावेळी बोलताना , बाबासाहेब परीट म्हणाले की 

" हे यश केवळ माझ्या एकट्याचे नसून, माझे आई-वडील, सहकारी शिक्षक अधिकारी, विविध क्षेत्रातील कार्यरत मित्र परिवार आणि क्रांतिकारी भूमीचे आहे."

 - धनाजी माने.....✍️


Saturday, January 17, 2026

कोरेगांवच्या मातीचा अभिमान













“खेळात जिंकलेले उपविजेतेपद आणि गावकऱ्यांच्या प्रेमाने जिंकलेली मने – 

जिल्हा परिषद शाळा कोरेगांव.”

================================

🏆 कोरेगांवच्या मातीचा अभिमान : जिल्हा परिषद शाळा कोरेगांवच्या चिमुकल्यांची झेप जिल्हास्तरावर 🏆


कोरेगांव गाव आज अभिमानाने उभे आहे. कारण या गावातील जिल्हा परिषद शाळा कोरेगांव येथील चिमुकल्या खेळाडूंनी खो-खो या पारंपरिक भारतीय खेळात छोट्या गटात जिल्हास्तरीय उपविजेतेपद पटकावत केवळ पदकच नाही, तर संपूर्ण गावाचे मन जिंकले आहे.

ही कामगिरी फक्त एका स्पर्धेतील यश नाही, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जिद्दीची, चिकाटीची आणि आत्मविश्वासाची जिवंत साक्ष आहे. मातीवर खेळत मोठी होणारी ही मुले आज जिल्ह्याच्या क्रीडामंचावर चमकली आणि “आम्हीही कुणापेक्षा कमी नाही” हे ठामपणे सिद्ध केले.

🎶 वाद्यांच्या गजरात ,फटाक्यांची जोड अभिमानाची मिरवणूक

या ऐतिहासिक यशाचा आनंद व्यक्त करण्यासाठी कोरेगांव गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने ढोल-ताशा,हालगी-घुमके , टाळ्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढली. गावात रांगोळी काढून ठिकठिकाणी या खेळाडूंचे औक्षण केले.पेढे भरवले.एक भावनिक व मन भरुन टाकणारे क्षण या बालचमु खेळाडूंनी अनुभवले.गावकऱ्यांच्या मोठ्यामनाची प्रचिती या विद्यार्थ्यांना आली.

 गावातील प्रत्येक गल्ली, प्रत्येक चौक आज आनंदाने फुलून गेला होता.

"एक- दोन कोरेगांव ", "आमची शाळा - जिल्हा परिषद शाळा " असा जिल्हा परिषद शाळा कोरेगांवचा जयघोष करत खेळाडूंच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यांत चमक स्पष्ट दिसत होती.

या मिरवणुकीत शाळेचे सर्व शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही मिरवणूक केवळ खेळाडूंचा सन्मान नव्हती, तर शाळा आणि गाव यांच्यातील अतूट नात्याचा सुंदर उत्सव होती.

 शिक्षकांचे ,क्रिडाप्रेमींचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची जिद्द

या यशामागे विद्यार्थ्यांचे नियमित सराव, शिस्तबद्ध जीवन आणि शिक्षकांचे ,क्रिडाप्रेमींचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन हे प्रमुख कारण ठरले. मर्यादित सुविधा असूनही शिक्षकांनी मुलांमधील गुणवत्ता ओळखून त्यांना योग्य दिशा दिली.

उन्हा-पावसाची तमा न बाळगता, अभ्यासासोबत खेळाचा समतोल राखत या मुलांनी केलेली मेहनत आज फळाला आली आहे.

 ग्रामीण शाळेचा आत्मविश्वास

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा म्हणजे केवळ शिक्षणापुरती मर्यादित नसून, ती संस्कार, आत्मविश्वास आणि सर्वांगीण विकासाची शाळा आहे, हे या यशाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

ही कामगिरी कोरेगांव गावातील इतर विद्यार्थ्यांसाठी नवी प्रेरणा ठरणार असून, खेळ, शिक्षण आणि संस्कार यांची सांगड घालणाऱ्या शाळेची भूमिका अधिक ठळक झाली आहे.

 भविष्याकडे आशेने पाहताना

आज उपविजेतेपद मिळाले असले, तरी या चिमुकल्यांच्या डोळ्यांत विजेतेपदाची स्वप्ने चमकत आहेत. गावकऱ्यांचे प्रेम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे पाठबळ असेच कायम राहिले, तर उद्या हीच मुले राज्य व राष्ट्रीय पातळीवर कोरेगांवचे नाव उज्वल करतील, यात शंका नाही.

कोरेगांवच्या मातीत जन्मलेल्या या चिमुकल्यांनी दाखवलेली जिद्द आणि यशाची भूक हीच या गावाची खरी ओळख आहे.

🌼 जिल्हा परिषद शाळा कोरेगांवच्या या गौरवशाली यशाला मनापासून सलाम! 

आज या चिमुकल्या खेळाडूंनी केवळ एक उपविजेतेपद मिळवलेले नाही, तर आत्मविश्वास, एकजूट आणि मेहनतीचे मोल संपूर्ण गावासमोर उभे केले आहे. जिल्हा परिषद शाळा कोरेगांव ही केवळ शाळा नसून, ती स्वप्न घडवणारी आणि भविष्याला दिशा देणारी एक संस्कारशाळा आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

कोरेगांवच्या मातीत वाढलेली ही मुले उद्या मोठ्या मैदानांवर झळकतील, हा विश्वास आज अधिक दृढ झाला आहे. शिक्षकांचे ,क्रिडाप्रेमींचे मार्गदर्शन, पालकांचे आशीर्वाद आणि गावकऱ्यांचे प्रेम असेच कायम राहिले, तर यशाची ही मिरवणूक थांबणार नाही.

🌟✌️ही सुरुवात आहे… कोरेगांवच्या नावाला उज्वल करणाऱ्या अनेक सुवर्णक्षणांची! 🌟

   - धनाजी माने.....✍️





बाबासाहेब परीट - ग्रामीण कथाकार

  बाबासाहेब परीट मराठी साहित्यात “कथाकथन” म्हटलं की केवळ कथा लिहिणं नाही, तर ती जिवंतपणे सांगण्याची कला अभिप्रेत असावी लागते. अशीच या क्षेत्...