🌿#मराठा #आरक्षण 🌿
♨️ राज्यात आजपासून (ता.२३) मराठा सर्वेक्षण केले जाणार आहे. अधिकारी, कर्मचारी व शिक्षक यांना हे काम देण्यात आले आहे. यामुळे शैक्षणिक कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
२३ ते ३१ जानेवारी दरम्यान हे सर्वेक्षण चालणार आहे.
शिक्षण विभागातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांना या कामाला जुंपण्यात येणार असल्यामुळे शाळांतील बहुतांश शिक्षक सर्वेक्षणाच्या कामावर जातील. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होण्याची भीती आहे.
दि.२३ जानेवारी पासून सर्वेक्षण सुरू करण्याची जाहिरात राज्यभरातील वृत्तपत्रांमध्ये दि.२३ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यभरातील शिक्षक, मुख्याध्यापकांकडून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचा सर्वे केला जाणार आहे. प्रत्यक्षात आज दि.२३ सर्वेला सुरुवात झाली.तब्बल ४५ ते ४९ पानांमध्ये १६३ ते १८२ प्रश्नांची व त्यातील उपप्रश्नांची मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांना उत्तरे द्यावी लागणार आहेत. #सर्वे करण्यासाठी शिक्षकांवर अनेक अटी लादल्या आहेत.काल सुट्टीच्या दिवशी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शिक्षकांची एक दिवसांची कार्यशाळा घेतली गेली. कालावधी कमी असल्याने सर्वे पूर्ण करण्याचं शिक्षकांसमोर मोठं आव्हान उभं आहे.माध्यमिक, 'प्राथमिक #शिक्षक, #ग्रामसेवक आणि परिचारिकांच्या मदतीने हे सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत संपविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मराठा आरक्षणाच्या मांगणीसाठी मराठा नेते #मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईकडे कूच केल्याने शासनाने हे सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. या प्रश्नावलीमध्ये -मूलभूत माहिती, कौटुंबिक प्रश्न,सामाजिक स्थिती, आरोग्यविषयक माहिती संबंधित प्रश्न आहेत. शिवाय `कुटुंबातील सदस्यांची माहिती व शिक्षण स्थितीचे तक्ते भरून द्यायचे आहेत.
सर्वेक्षणात कुटुंबातील कुणाला #कुत्रा-माकड, #साप-विंचू चावल्यावर किंवा कावीळ झाल्यावर कुणाकडे उपचाराला घेऊन जाता या प्रश्नाला पहिला पर्याय तांत्रिक-मांत्रिकाचा दिला आहे. दुसरा पर्याय घरगुती उपचार आणि तिसरा पर्याय डॉक्टरचा दिला आहे.
तुमच्या समाजात लग्नामध्ये #हुंडा देण्याची पद्धत आहे का, विधवा स्त्रियांना कुंकू लावण्याची; मंगळसूत्र घालण्याची परवानगी आहे का, #विधुर पुरुषांचे आणि विधवांचे पुनर्विवाह होतात का, विधवांना शुभकार्यात बोलवले जाते का, त्यांना हळदी- कुंकवाचा मान दिला जातो का, विवाहित स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतला पाहिजे असे बंधन आहे का, मुलीचा विवाह कुणाबरोबर करायचा याचा निर्णय कोण घेते, असे प्रश्न -विचारण्यात आले आहेत. तुमच्या. समाजात पहिले अपत्य मुलगाच झाला पाहिजे अशी मानसिकता आहे का, अशी विचारणा ही प्रश्नावली करते. नवसाला कोंबड्या-बकऱ्याचा बळी देण्याची पद्धत आहे का, असेही त्यामध्ये विचारले आहे.
ही प्रश्नावली कुटुंबप्रमुखाकडून भरून घेतली जाणार आहे. खोटी किंवा चुकीची माहिती दिल्यास त्याच्या परिणामास तुम्ही जबाबदार राहाल असाही इशारा दिला आहे. त्याची सही, अंगठाही घेतला जाणार आहे.
सर्वेक्षणात १८२ प्रश्न, तीन तक्ते व तब्बल ३५ पानांची प्रश्नावली आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.त्यातील अनेक प्रश्न आरक्षण राहिले बाजूलाच, नवे वाद निर्माण करणारे आहेत.
तुमची जात कोणत्या जातीपेक्षा कनिष्ठ समजली जाते का..? कुटुंबात कोण आजारी पडले तर त्यास लवकर आराम पडावा म्हणून दृष्ट काढणे, अंगारा लावणे, गंडा बांधणे, आदी प्रकार करता काय, अशी विचारणा महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने आज, मंगळवार- पासून राज्यभरात होणाऱ्या मराठा व इतर खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणात केली जाणार आहे.
================★==================
🌿दि.२३ रोजी दैनिकातून प्रसिद्ध झालेली जाहिरात🌿 ⤵️
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग
नवीन प्रशासकीय इमारत खोली क्र. ३०७, तिसरा मजला, विधान भवना समोर, पुणे- ४११००१
दूरध्वनी क्र. ०२०-२६०५३०५६
ई.मेल, msbccpune@gmail.com
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
#मराठा समाज व #खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे दि. २३ जानेवारीपासून सर्वेक्षण महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत दि. २३ जानेवारी २०२४ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत हे #सर्वेक्षण होईल. या कालावधी दरम्यान नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबाची माहिती घेणार आहेत.नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आयोगामार्फत सर्वेक्षणासाठी ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. तसेच सर्वेक्षणासाठी खास अत्याधुनिक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे.सर्वेक्षणा दरम्यान केवळ मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबांची माहिती प्रश्नावलीद्वारे भरून घेतली जाईल. कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याची माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाची पुढील माहिती घेतली जाणार नाही.
सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने प्रगणक सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशिरा सर्वेक्षणासाठी येऊ शकतात.तरी नागरिकांनी त्यांना आवश्यक माहिती देऊन सर्वेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन आयोगामार्फत करण्यात येत आहे.
#सदस्य सचिव
#महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग
=============★===================
🌿 ठळक -
♨️सर्वेक्षणामध्ये अनेक शाळेतील शंभर टक्के शिक्षक गुंतल्यामुळे पालकांच्या तक्रारी सुरू झाल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या नुकसानीस जबाबदार कोण असे पालकांच्यातून प्रश्न विचारण्यात येऊ लागले.
आमच्या मुलांच्या अध्ययन -अध्यापनावर परिणाम होत असल्याने शिक्षकांना अशा अशैक्षणिक कामातून कायमस्वरूपी वगळा त्यांना फक्त अध्यापनाचे काम द्या !असे अनेक जागृत पालकांनी, शाळा व्यवस्थापन समितीने सुचवले. त्याचबरोबर गावामधील सुशिक्षित बेकारांना हे काम देण्यात यावे अशीही काही ठिकाणी मागणी करण्यात आली.
♨️ सर्वेक्षणाच्या App मध्ये #तांत्रिक बिघाड आल्याने दिवसभर केलेले सर्वेक्षण योग्य ठिकाणी Synchronized होणार की नाही ? याची सर्वे करणाऱ्या कर्मचारी, शिक्षकांना काळजी पडली.दिवसभर केलेल्या कामाचे काय होणार ? असे प्रश्न.....
♨️ #प्रगणक सर्वे करण्यासाठी गेल्यानंतर अनेक घरातून प्रगनकांच्या बरोबर वाद .... वरील काही प्रश्नावलीमधील काही प्रश्न विचारल्यानंतर प्रगनकांच्या बरोबर वाद झाल्याचे समोर आले......उदा.विधवांना शुभकार्यात बोलवले जाते का, त्यांना हळदी- कुंकवाचा मान दिला जातो का, विवाहित स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतला पाहिजे असे बंधन आहे का, मुलीचा विवाह कुणाबरोबर करायचा याचा निर्णय कोण घेते, असे प्रश्न -विचारण्यात आले आहेत. तुमच्या. समाजात पहिले अपत्य मुलगाच झाला पाहिजे अशी मानसिकता आहे का.
♨️ कुटुंबातील सदस्यांची माहिती व #शिक्षण स्थितीचे तक्ते भरून द्यायचे आहेत हे काम काही प्रमाणात वाढवल्याचा प्रगणकांच्यातून सुर.
♨️ App चे काम फास्ट आणि व्यवस्थित चालने गरजेचे.. प्रगणकांनी केली अपेक्षा व्यक्त.
♨️ खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती भरण्यासाठी अर्धा ते पाऊण तास वेळ लागत असल्याचे प्रगनकांच्यातून चर्चा...




