माणुसकीचे दर्शन...............
सुमन बालविकास संस्थेच्या अध्यक्षा ,सौ.प्रतिभा शिंगारे यांच्यातील माणुसकीचे दर्शन.......
' दिन भुकेला दिसता कोणी, घास मुखीचा मुखी घालुनी,जो भजतो मानवतेला .........'
या काव्यपंक्ती माणसातील माणुसकीचे दर्शन घडवतात.
आणि असेच माणुसकीचे दर्शन घडवणारा प्रसंग बुधवारी रात्री कोल्हापूर येथील कावळा नाका ,एस.टी स्टँड परिसरातील मंदिर ,व रेल्वे स्टेशन या परिसरात
अनेकांना पाहायला मिळाला.
या परिसरामध्ये अनेक निराधार वार्धक्यातील अबालवृद्ध,
अनेकांच्या नजरेस रोजच पडतात.
थंडीच्या या दिवसांमध्ये थंडीने कुडकुडत बसलेले असतात.
या मार्गावरून जाणारी माणसं ते रोजच पाहतात आणि निघून जातात. लोक आपापल्या विश्वात गुंग असतात.
पण त्यांचं दुःख थोडं का असेना आपण हलकं करावं.
अस कितीजनांच्या मनात येत असेल?
आणि जर ते आलेच तर ते प्रत्यक्ष कृतीत किती येत असेल ?
पण......
बुधवारी रात्री कोल्हापूर येथील कावळा नाका ,एस.टी स्टँड परिसरातील मंदिर ,व रेल्वे स्टेशन या परिसरातील निराधार स्त्री- पुरुष वृद्धांना तर काही निराधार व्यंक्तींना
माणुसकीच दर्शन घडल.
बोचऱ्या थंडीत कुडकुडत बसलेल्या या लोकांना कोणीतरी अनोळखी व्यक्तींने मायेची उब दिली.
त्यांची विचारपुस करत त्यांना नवी कोरी स्वेटर देण्यात आली.नुसती देण्यात नाही आली तर , त्या अबाल स्त्री- पुरुष वृद्धांच्या अंगात स्वतः घालण्यासाठी मदत करण्यात आली.त्यांना ती घालण्यात आली .त्यांना चार घास खाऊही घातले.
यातील एका व्यक्तीचे अंग तर तापाने फणफणत होते .म्हणून त्या व्यक्तीला खाऊ - पिऊ घालून त्याला औषध दुकानातील प्राथमिक उपचार म्हणून औषध देण्यात आली.
खरंच आज हे चित्र दुर्मिळ आहे .ही माणुसकी सुद्धा दुर्मिळ आहे।
पण हे माणुसकीचं दर्शन घडवलं ' सुमन साळी महिला व बालविकास संस्था सांगलीच्या ' अध्यक्षा सौ. प्रतिभा सिंगारे यांनी.
याबाबत त्यांना विचारला असता त्यांनी सांगितलं की " मी गांधीनगरला माझ्या वैयक्तिक खरेदीसाठी जात असता. मी वरील ठिकाणी हे दृश्य पाहिलं आणि मन हेलावले .
आणि गांधीनगरला जातानाच ठरवलं की येताना आपण यांना स्वेटर देऊ , जेणेकरून या थंडीपासून थोडा तरी त्यांचा बचाव होईल म्हणून दोन गाठोडी स्वेटर खरेदी केली आणि या परिसरातील या लोकांना दिली ,एवढचं "
खरच ! प्रतिभा शिंगारे यांच हे काम अगदी निस्वार्थी भावनेने चाललेले हे काम अनेकांच्या नजरेतून सुटल नाही.
ते अनेकांच्या मोबाईल मद्धे क्लिक झालं.
खरचं , सौ.प्रतिभा सिंगारे यांच हे काम ' जरी छोट वाटत असलं तरी ते मोठ्या मनाने , निराधार लोकांना योग्य वेळी आधार देणार ठरलं , मायेची उब देणार ठरलं असचं म्हणावे लागेल.
■ शब्दांकन - धनाजी माने....✍️
